नगर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी

 नगर -जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून, 27 ते 29 सप्टेंबर रोजी विजेच्या कडकडाट व वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीची शक्‍यता वर्तविण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे. जिल्ह्यात सध्या गोदावरी, भीमा नदीत मोठ्या प्रमाणात विर्सग सुरू आहे. येत्या तीन दिवसांत अतिवृष्टी होण्याची … Read more

नगर – बंदला पाठिंबा; जिल्ह्यात आंदोलन

नगर – शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी लेबर व इतर लोकशाही विरोधी धोरण रद्द करावी, आदी मागण्यांसाठी भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा व शेतकरी संघर्ष समन्वय समितीतर्फे नगर-पुणे रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. याच बरोबर जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव ऍड. कॉ. सुभाष लांडे, … Read more

यूपीएससी परीक्षेत कोपरगावच्या दिव्या गुंडेने चमकवला यशाचा दिवा

कोपरगाव -कोपरगाव तालुक्‍यातील चांदगव्हाण येथील रहिवासी दिव्या अर्जून गुंडे हीने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून दिव्याने आपल्या यशाचा दिवा देशात चमकवला. मागील वर्षी झालेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.त्यात दिव्या गुंडे हिने 338 वा क्रमांक पटकावला. दिव्या ही गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना अर्जुन गुंडे (खांडेकर) व नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी … Read more

साथीचे आजार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात

कोपरगाव -आठ दिवसांपासून करोना आजाराशी झुंजणाऱ्या आ. आशुतोष काळे यांची प्रकृती सुधारत आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतांना देखील कार्यकर्ते व जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मतदारसंघाची माहिती ते जाणून घेत होते. मतदार संघातील काही गावात डेंग्यू सदृश्‍य बाधित रुग्ण आढळल्याची माहिती समजली. त्यावेळी आ. काळे यांनी तातडीने तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी आदी जबाबदार अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन बैठक … Read more

कोणी रेंज देते का रेंज? आमदारांच्या गावात रेंज गुल

अकोले -कोणी रेंज देते का रेंज?आमदार महोदयांच्या गावात रेंज गुल असा प्रकार उघड झाला. काल अकोले तालुक्‍यातील कोहणे, कोथळे आदिवासी सोसायटीची वार्षिक सभा अर्धी डोंगरावर, अर्धी रस्त्यावर घेण्याची नामुष्की संचालक मंडळावर आली. सहकार विभागाच्या अधिसुचनेनुसार करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या वर्षापासून ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे. पण काही भागात … Read more

व्हर्टिगो किंवा चक्‍कर येण्याची कारणे

व्हर्टिगो ही एक मेडिकल कंडिशन असून त्यात रक्‍तदाब कमी होण्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. व्हर्टिगोचा अर्थ चक्‍कर येणे, फिरणे. या स्थितीत रुग्णाला डोळ्यासमोर अंधारी येऊ लागते. अशावेळी रक्तदाब कमी होण्याची भीती असते. अस्थिर किंवा असंतुलित जाणवणे, उंचीची भीती वाटणे, कमी ऐकू येणे, पडण्याची भीती वाटणे, अधिक आवाजाने डोकेदुखी, चक्‍कर येणे. व्हर्टिगोची समस्या ही साधारण व्यायामातूनही दुरुस्त … Read more

जोश अन्‌ जल्लोषपूर्ण स्वराज्य ध्वज गीताची युवकांवर मोहिनी

ओंकार दळवी जामखेड – आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भगव्या स्वराज्य ध्वजाने लहानथोरांपासून सर्वांनाच भारून टाकले आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या स्वराज्य ध्वजाचे कौतूक केले.सध्या शिवरायांच्या स्वराज्य धर्माच्या शिकवण आणि महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाची सर्वांना आठवण करून देण्यासाठी स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून तसेच इतर सहा राज्यांतून फिरते आहे. या प्रेरणादायी मंगल … Read more

नगरपरिषदेतील दोन सदस्य पद्धतीने इच्छुकांचे स्वप्न भंगले

बाळासाहेब सोनवणे राहाता  – आगामी नगरपरिषदेच्या निवडणूका एका प्रभागात दोन सदस्य पद्धतीप्रमाणे होणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने दोन सदस्य पद्धत नेत्यांसह इच्छुक उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. महाविकास आघाडी सरकार आगामी नगरपरिषदेच्या निवडणूका छोट्या प्रभाग रचनाप्रमाणे घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये एक उमेदवार देईल, असा अनेक राजकीय नेत्यांना अंदाज होते. परंतु दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने मागील पंचवार्षिक … Read more

पद्मश्री पोपेरे यांना लक्ष्मीबाई जीवनगौरव पुरस्कार जाहीर

 अकोले -कोंभाळणे (ता अकोले) येथील बीजमाता राहीबाई पोपेरे यांना सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर ‘लक्ष्मीबाई जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला. रयत शिक्षण संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची घोषणा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त 22 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये या पुरस्काराची घोषणा त्यांनी केली.राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात भरीव … Read more

राहुरीतील निकम टोळीतील पाच जणांना मोक्‍का

 नगर -नगर जिल्ह्यात संघटित गुन्हे करणाऱ्या राहुरीतील कात्रड येथील कुख्यात गुन्हेगार सुरेश रणजित निकम याच्यासह त्याच्या टोळीतील पाच जणांवर मोक्काची कारवाई झाली आहे. या टोळीविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी संघटित गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली आहे. तडीपार, मोक्कानुसार कारवाई केली जातच आहे. त्यानुसार … Read more