nagar | कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम – काटे

शेवगाव, (प्रतिनिधी) – सध्याचा लोकसभा निवडणुकीचा माहोल लक्षात घेऊन भाजप सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केली. मात्र, ती अत्यंत फसवी आहे. उलट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळण्याचेच काम भाजपने याद्वारे केले असल्याची टीका केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी येथे केली. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ तालुक्यात ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या कोपरा बैठकीत … Read more

nagar | आता फक्त देश विकायचा बाकी आहे

शेवगाव (प्रतिनिधी) – भाजप सरकार शेतकरी, गरिबांच्या विरोधी आहे. शेतीसाठी लागणारी खते, बी-बियाणे, औषधांवर अठरा टक्के जीएसटी असून, हिऱ्यावर मात्र चार टक्के जीएसटी आकारली जाते. शेतकऱ्यांकडून १८ टक्के जीएसटी वसूल करून त्यातील ६ हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली भूलभूलैया केला जातो. या सरकारने महत्वाचे सर्व सार्वजनिक उद्योग व्यवसाय विकले असून आता फक्त देश विकायचा … Read more

nagar | तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक

शेवगाव (प्रतिनिधी) – शहरटाकळी येथील तरुणाच्या खूनप्रकरणी शेवगाव पोलिसांनी चार तरुणांना अटक केल्याने भातकुडगाव फाट्यावरील रास्ता रोको आंदोलन स्थगित करत गावबंद आंदोलन आटोपते घेतले. शहरटाकळीत लक्ष्मीमाता देवीची छबीना मिरवणूक चालू असताना अक्षय संजय आपसेटे (वय २४) यास गावातील ७ ते ८ जणांनी घातक शस्त्रांनी मारहाण करून जबर जखमी केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. … Read more

nagar | कामगार आयुक्त कार्यालयावर समाधी बांधो आंदोलन

शेवगाव (प्रतिनिधी) – आचारसंहितेचे कारण दाखवून शासनाकडून असंघटीत क्षेत्रातील इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांची वेबसाईट बंद केली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांवर मोठा अन्याय होत आहे. शासनाला याबाबत दि. २१ मार्चला निवेदन देऊनही त्यावर कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर दि.१ मे रोजी ‘कामगार दिनी’ बांधकाम कामगार सर्व साहित्य घेऊन “ … Read more

nagar | अपह्रत तीन मुलींची ९ दिवासानंतर सुटका

नगर (प्रतिनिधी) – शेवगाव तालुक्यातील अपहरण झालेल्या तीन मुलींची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला ९ दिवसानंतर यश आले आहे. गुन्हे शाखेने एका आरोपीस ताब्यात घेतले त्याला शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखीच्या दोन्ही पथकांनी पुणे, मुंबई, धाराशिव, बीड, जालना, परभणी, छ. संभाजीनगर, पिंपरी चिंचवड या जिल्ह्यामध्ये जावुन आरोपीचे मित्र, नातेवाईक यांचा शोध घेताला. … Read more

nagar | शेवगावात जय श्रीरामचा जयघोष

शेवगाव, ( प्रतिनिधी)- शेवगाव व तालुक्याच्या ग्रामीण परिसरात सर्वत्र श्रीरामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने त्यात सहभाग घेतला. शेवगावात सकल हिंदू समाजाच्या वतीने आखेगाव रस्त्यावरील स्वराज्य मंगल कार्यालयापासून प्रभू श्रीरामचंद्र , लक्ष्मण व सीतामाई यांच्या मूर्तीच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी … Read more

nagar | डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्त शेवगात मिरवणूक

शेवगाव, (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सोहळा शेवगावसह तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ठिक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . शेवगावात सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील क्रान्ती चौकात उभारण्यात आलेल्या भव्य मंचावर रविवारी सकाळपासून डॉ. आंबेडकराच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली. सकाळी दहाचे दरम्यान येथील … Read more

नगर | शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी विकास नवाळे

शेवगाव, (प्रतिनिधी) – शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावरून सचिन राऊत यांची फेब्रुवारीमध्ये बदली झाल्याने रिक्त झालेल्या मुख्याधिकारीपदी विकास नवाळे यांची नियुक्ती झाली. त्यांनी गुरुवारी (दि.७ ) पदभार स्वीकारला आहे. नगरपरिषदेच्या विभाग प्रमुखांनी मुख्याधिकारी नवाळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारताच मुख्याधिकारी नवाळे यांनी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ओळख करून घेतली. नगरपरिषदेच्यावतीने सुरूअसलेल्या … Read more