Pune: अनेक वर्षांनंतर रात्रीच्या वेळी हडपसरच्या मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास; आमदार चेतन तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे अनधिकृतपणे खासगी बसेसची होणारी पार्किंग आणि खासगी बसेसचा हडपसर परिसरातील थांबे आता शेवाळेवाडी (मांजरी बुद्रुक) येथे पीएमपीएमएल बस डेपोच्या जागेत हलवण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या विळख्यात असणारा रस्ता मोकळा मिळत आहे. याबाबत नागरिकांनी आता समाधान व्यक्त केले आहे. आमदार चेतन तुपे यांनी  रविवारी(दि. ९) रोजी स्वतः … Read more

Diwali 2023 : शेवाळेवाडीत रंगला दिवाळी पहाट संगीत महोत्सव; नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

मांजरी – पहाटेचे झुंजूमुंजू, मंद वारा आणि हळूहळू अंधाराची चादर दूर करीत होणारा अरूणोदय, अशा प्रसन्न वातावरणात शेवाळेवाडी येथील दोन दिवसांच्या दिवाळी पहाट संगीत महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. श्री शंभूराजे सांस्कृतिक व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी दिली. … Read more

शेवाळेवाडी गावाला महापालिकेने बंद नळांद्वारे पाणीपुरवठा करावा, राहुल शेवाळे यांची मागणी

मांजरी (पुणे) – महापालिकेत समाविष्ठ असलेल्या शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली आहे. महापालिका पाणी पुरवठा अधिकारी अनिरुद्ध पावसकर, इंद्रभान रणदिवे ,सुभाष पावरा यांना तसे निवेदन देण्यात आले आहे. भैरोबा पंपिंग स्टेशन मधील मैला मिश्रित पाणी या परिसरात सोडले जायचे, त्यामुळे येथील … Read more

समाविष्ट गावांतील खड्डे बुजविण्यात आल्याचा पुणे महापालिकेचा दावा फोल

मांजरी – महापालिकेने शहरातील तसेच समाविष्ठ गावांतील ९० टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने सात दिवसांपूर्वी केला होता. मात्र, समाविष्ट गावांतील खड्डे तसेच आढळल्याने ९० टक्के खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा फोल ठरल्याची चर्चा या समाविष्ट गावांत रंगली आहे. पहिल्या पावसातच प्रमुख रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत संपूर्ण शहर व उपनगर खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खड्डे … Read more

Pune Crime: पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविले; शेवाळवाडी – स्वारगेट प्रवासादरम्यानची घटना

पुणे  – पीएमपी प्रवासी महिलेकडील 50 हजारांचे दागिने लांबविल्याची घटना स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला शेवाळवाडी ते स्वारगेट या मार्गावरील पीएमपी बसने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 50 हजारांचे मंगळसूत्र लांबविले. पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कांबळे तपास करत आहेत.

भाजपने जाणून घेतल्या शेवाळेवाडी गावातील समस्या

हडपसर – शेवाळेवाडी गाव नुकतेच महापालिकेत समाविष्ट झाले आहे. भारतीय जनता पार्टीने या समाविष्ट गावाच्या समन्वयाची जबाबदारी नगरसेविका कालिंदा पुंडे यांच्यावर दिली आहे. त्यानुसार पुंडे यांनी शेवाळेवाडी गावाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभारी म्हणुन त्यांची नेमणुक झाली आहे. शेवाळेवाडी गावातील रस्ते, लाईट,पाणी आणि इतर समस्या जाणुन घेण्यासाठी त्यांनी गावात … Read more

शेवाळेवाडी गावातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरु करावे – राहुल शेवाळे

हडपसर – शेवाळेवाडी गाव नुकतेच महापालिकेत समाविष्ट झाले आहे. त्याठिकाणी महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ तसेच महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर यांना निवेदन देऊन राहुल शेवाळे यांनी ही मागणी केली आहे. भाजपा पदाधिकारी सुनील शेवाळे, हवेली युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेश … Read more

शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी चुरस?

विवेकानंद काटमोरे मांजरी  (पुणे) – महापालिकेत गाव समावेशामुळे शेवाळेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या निर्णयाचे स्वागत होत असताना आज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी एका वॉर्डातील एका जागेसाठी निवडणूक रंगणार असल्याचे स्पष्ट झाले.  11 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 10 जागेसाठी एकही अर्ज आलेला नाही, केवळ एकाच जागेसाठी आता चुरशीची निवडणूक होणार का? अशी … Read more

शेवाळेवाडी ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

विवेकानंद काटमोरे मांजरी (पुणे) – शेवाळेवाडी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. त्यातच गाव महापालिकेच्या हद्दीत समावेश होण्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यामुळे संभ्रम अवस्थेत असलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. गावच्या हनुमान मंदिरात आज सकाळी एकत्र येऊन घेतलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.       बुधवारी 23 डिसेंबर … Read more

विरोधक कमी करण्यासाठी इच्छुकांचा ‘फंडा’

पालिका समावेश आणि ग्रामपंचायत निवडणूक यामुळे ग्रामस्थांत संभ्रम शेवाळेवाडीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव – विवेकानंद काटमोरे मांजरी – जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षण सोडतीने निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महापालिका प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या शेवाळेवाडी गावाचाही यामध्ये समावेश असून येथील सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी पडले आहे. मात्र, गाव निवडणुकीपूर्वी पालिकेत समाविष्ट होणार की निवडणुकीला तोंड द्यावे … Read more