पुणे जिल्हा | शिक्रापूर परिसरात चासकमानचे आवर्तन सोडा

शिक्रापूर, (वार्ताहर)- शिक्रापूर (ता. शिरुर) परिसरातील राऊतवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने चासकमान कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे शिरूर तालुकाध्यक्ष रोहीत खैरे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देत केली आहे. शिक्रापूर, राउतवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी येथील नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असून सध्या … Read more

Pune Crime: ज्येष्ठ महिलेची हत्या करून दागिने लुटणारी दरोडेखोर टोळी गजाआड; शिक्रापूर परिसरात टाकला दरोडा

पुणे – शिक्रापूर परिसरातील जातेगावमध्ये ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणार्‍या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. दरोडेखोरांकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी टोळीप्रमुख अविनाश उर्फ लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे (वय 28, रा. कोळगाव मोहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), प्रवीण दीपक भोसले (वय 21, रा. जातेगाव फाटा, ता. शिरुर, जि. … Read more

पुणे जिल्हा | शिक्रापूर परिसरात वंचितची आज बैठक

शिक्रापूर, (वार्ताहर)- वंचित बहुजन आघाडीसह वंचितच्या समविचारी संघटनांची बैठक (दि.५) रोजी शिक्रापूर चाकण रोड परिसरात होणार असून यावेळी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा व निवडणूक आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी वंचित बहुजन पक्षासह अन्य संघटनाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, मात्र यावेळी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या बांदल यांच्या उमेदवारीला विरोध होण्याची शक्यता असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने सांगितले … Read more

पुणे जिल्हा : शिक्रापूरसह परिसरात मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत

शिक्रापूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केलेली असताना त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केलेला असताना ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे फलक लागून गावागावात मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन आज मनोज जरांगे पाटील हे रांजणगाव ते वाघोली असा प्रवास करत असताना त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत … Read more

पुणे जिल्हा : शिक्रापूर परिसरात डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ

शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरामध्ये अनेक ठिकाणी तापाच्या आजाराने नागरिक ग्रासलेले असून काही नागरिकांना डेंग्यू आजार झाल्याबाबत अहवाल प्राप्त झालेले असताना डेंग्यूसदृश आजारांच्या रुग्णांची संख्या वाढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने परिसरात फवारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. शिक्रापूर परिसरामध्ये सध्या स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात अभाव होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या हेतूने कोणत्याही उपाययोजना करण्यात … Read more

शिक्रापूर परिसरात दोन दिवसात ४८ रुग्णांची वाढ

शिक्रापूर (प्रतिनिधी) : शिक्रापूर (ता. शिरूर) सह परिसरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना तसेच काही कोरोना बाधितांचा मृत्यू होत असताना आता दोन दिवसात शिक्रापूर सह परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल अठ्ठेचाळीस कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. शिक्रापुरात एका कोरोना बाधित कंपनी कामगाराच्या घरातील चौघांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती शिरूर तालुका … Read more

करोना सोडेना शिक्रापूर परिसराची पाठ

तळेगाव ढमढेरे/शिक्रापूर (वार्ताहर) –येथून जवळच असणाऱ्या शिवतक्रार म्हाळुंगी येथील एका युवकाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या दहावर पोहोचली आहे. शिवतक्रार म्हाळुंगी येथील एका 24 वर्षीय युवकाला काही कारणास्तव उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दहा मे रोजी दाखल केले होते. त्याच्यावर येथे चार दिवस उपचार करण्यात आले. फरक न पडल्याने त्याला पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असताना तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी या रुग्णाची करोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे समोर आले आहे. यानंतर शिक्रापूरसह संपूर्ण शिरूर तालुका हादरून गेला आहे. याबाबत माहिती प्राप्त होताच शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रज्ञा घोरपडे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, बाजार समितीचे संचालक विकास शिवले, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार वैद्य, तलाठी अमोल थिगळे यांसह आदींनी शिवतक्रार म्हाळुंगी येथे धाव घेत परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी सुरु केली. या युवकाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. करोना बाधित युवक आढळून आलेल्या ठिकाणाजवळील काही परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी देखील औषध फवारणी करण्यात आली आहे. येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार असून नागरिकांचा सर्वे करण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.