पुणे जिल्हा | जातेगाव दरोड्यातील सराईत जेरबंद

शिक्रापूर, (वार्ताहर)- जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे (दि.२३) रोजी मध्यरात्री पडलेल्या दरोेड्यात ज्येष्ठ महिलेवर प्राणघातक हल्ला करीत खून करुन चोरी केल्याप्रकरणी फरार सराईताला पाठलाग करुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. अविनाश उर्फ लंगड्या रमेश काळे (रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. जातेगाव बुद्रुक येथील कृष्णाबाई इंगवले या घरात … Read more

कोरेगाव भीमात पोलिसांनी पकडलेल्या “त्या’ तिघांना एक वर्ष कारावासाची शिक्षा

शिक्रापूर –  कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १० ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास चोरी करण्यासाठी आलेल्या तिघा सराईतांना शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने हत्यारासह पकडत जेरबंद केले होते. या गुन्ह्यातील हुकुमसिंग रामसिंग कल्याणी, लखनसिंग राजपूत सिंग व रवीसिंग श्यामसिंग कल्याणी या तिघांना शिरूर न्यायालयाने एक वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे … Read more

पुणे जिल्हा: बेपत्ता मायलेकी आढळल्या मृतावस्थेत, परिसरात खळबळ

शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथून शनिवारी (दि. 26) एक महिला व मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. त्या मायलेकींचे मृतदेह गणेगाव खालसा येथील एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रांजणगाव एमआयडिसी पोलीस स्टेशन येथे याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर येथील मलठण फाटा येथील लता शिवाजी घोडे ही महिला तिची मुलगी … Read more

शिक्रापूर | क्रिकेट सामना विजयाचा जल्लोष ‘भोवला’; जिल्हा परिषद सदस्यासह 15 जणांवर गुन्हे

शिक्रापूर – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे सुरु असलेल्या धर्मवीर संभाजी राजे करंडक २०२१ स्पर्धेच्या दरम्यान विजयी संघाने सदर ठिकाणी डीजे वाजवून विना मास्क आनंदोस्तव साजरा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता बगाटे यांच्या सह तब्बल पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वढू बुद्रुक ता. शिरूर येथे सुरु असलेल्या … Read more

एटीएम फोडणाऱ्या परप्रांतीय टोळीचा शिक्रापूर पोलिसांकडून पर्दाफाश

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेशहून घेतले आरोपी ताब्यात शिक्रापूर (प्रतिनिधी) : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील चौफुला परिसरात अज्ञात चोरट्यांनी पाच नोव्हेंबर रोजी आयडीबिआय बँकेचे एटीएम फोडून त्यातील २१ लाख ८४ हजार ६०० रुपये लांबविले असताना शिक्रापूर पोलिसांनी या गुन्ह्याचा महिनाभरात तपास करून या गुन्ह्यातील आरोपींना मध्यप्रदेशहून ताब्यात घेत जेरबंद केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे … Read more

रिव्होल्व्हरचा धाक दाखवत प्लॉटिंग व्यावसायिकास खंडणीची मागणी

शिक्रापूर : प्लॉटिंग व्यावसायिकास रिव्होल्व्हरच्या धाकाने दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे . शिक्रापूर (ता. शिरूर) येथील काही युवकांनी काही जमीन प्लॉटिंग साठी विकत घेतली आणि त्यातून प्लॉटिंग व्यवसाय सुरु केला. परंतु सदर जमिनीमध्ये जमिनीच्या मूळ वारसदारांनी आक्षेप घेतल्याने त्याचा दावा न्याय प्रविष्ट असताना जमिनीमध्ये पैसे गुंतविले असताना देखील एकाने प्लॉटिंग … Read more

शिक्रापूर पोलिसांचा डॉक्टरांच्या पार्टीवर छापा !

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका वाढदिवसाच्या पार्टीवर आणि एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीच्या मिरवणुकीवर कारवाई करत गुन्हे दाखल केल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्रापूर पोलिसांनी डॉक्टरांच्या एका पार्टीवर कारवाई करत 11 डॉक्टरांसह मोठ्या हॉटेलच्या 2 मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमाशेत येथील एका हॉटेलमध्ये काही … Read more

शिक्रापुरात पोलिसांसह भूमापक अधिकाऱ्याला मारहाण !

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे जमिनीची मोजणी आणि हद्द कायम करण्याचे काम सुरु असताना जमीन मोजणी भूमापक अधिकाऱ्यासह बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये दोन महिला पोलीस देखील किरकोळ जखमी झाल्या असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महिला व पुरुषांसह नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात … Read more

मास्क न वापरणाऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

शिक्रापूर (प्रतिनिधी) – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिक्रापूर पोलीस व परिसरातील ग्रामपंचायतींनी अंमलबजावणी सुरू केली असून त्यानुसार अनेकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, किरण भालेकर, पोलीस हवालदार संजय ढावरे तसेच सणसवाडीचे ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे, पोलीस पाटील दत्तात्रय माने, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे सागर दरेकर … Read more

‘पुणे ग्रामीण’या नावात शिक्रापूर पोलिसांकडून बदल

अखेर बहुचर्चित बॅरिकेट्‌सची दुरुस्ती शिक्रापूर – येथील पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त व नाकाबंदीसाठी वापरण्यात येणाऱ्या एका बॅरिकेट्‌सच्या फोटोने पुणे जिल्ह्यासह इतर ठिकाणी धुमाकूळ घालत त्या बॅरिकेट्‌सवरील नाव वाचून दाखविणाऱ्यास एक लाख रुपयांहून अधिक बक्षीस देण्याचे जाहीर झाल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली होती. “शिक्रापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण’ असे नाव झालेले होते. याबाबतची बातमी “प्रभात’मध्ये … Read more