मंत्रिमंडळ विस्तार होणार ? शिंदे-फडणवीस यांचा पुन्हा दिल्ली दौरा

मुंबई – दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप या दौऱ्याचे मूळ कारण समोर आले नाही आहे. पण … Read more

Sanjay Raut : “राज्य सरकार आणखी किती लोकांचा बळी घेणार आहे?” ; मराठा आरक्षणावरून संजय राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)मागणीने राज्यात जोर धरला आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत देऊन आपलं उपोषण मागे घेतलं होतं. परंतु, ही मुदत संपत आली तरीही या प्रकरणात तोडगा निघाला नाही  त्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे … Read more

Muslim reservation : मुस्लिम आरक्षणासाठी मुंबईत परिषद; शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाकडे लागले लक्ष

मुंबई – स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत प्रत्येक मागासलेल्या आणि इतर समाजांमध्ये विकास झाल्याचे दिसून येत आहे. मात्र मुस्लिम समाज हा स्वातंत्र्याच्या काळात जेवढा विकसित होता. त्यापेक्षाही अधिक आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मागासलेला झालेला आहे. देशाचा विकासाचा वेग वाढविण्यासाठी मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण आवश्‍यक झालेले आहे. या मुस्लिम आरक्षणासाठी आगामी 21 ऑक्‍टोबरला पहिली मुस्लिम परिषदेचे आयोजन करण्यात आहे. … Read more

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा – CM सिद्धरामय्या

सांगली : भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी … Read more

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले,”…तर हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल”

मुंबई –   छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टिका केली होती. यावरुन आता राजकारण तापायला सुरवात झाले असून अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. अशातच  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. … Read more

बोम्मई कर्नाटकसाठी आक्रमक भूमिका घेतात.. शिंदे-फडणवीस महाराष्ट्रासाठी का घेत नाहीत ? अजित पवार यांनी उपस्थित केला सवाल

नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरून चांगलीच खडाजंगी झाली. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ज्या आक्रमकतेने कर्नाटकची भूमिका मांडतात त्या आक्रमकतेने आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची बाजू का मांडत नाहीत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. आजचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध … Read more

शिंदे-फडणवीस सरकारकडून ‘दिवाळी पॅकज’ची घोषणा ; 100 रुपयात मिळणार रवा, डाळ, साखर आणि तेल

मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करण्यात येणार आहे. कारण राज्यातील जनतेला सरकारकडून केवळ १०० रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल मिळणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तब्बल एक कोटी 62 लाख 42 हजार शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले … Read more

कटाक्ष : महाराष्ट्राचाही विचार व्हावा!

महाराष्ट्रातील प्रास्तावित प्रकल्प गुजरातला हलवण्यात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे-फडणवीस यांच्या विरोधात विरोधकही आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, ते केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात, संपूर्ण देशाचे पंतप्रधान म्हणून वागत नाहीत, असा आरोप गेल्या आठ वर्षांत अनेक वेळा केला गेला आहे. मग अगदी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमधील कार्यक्रमात गुजराथी भाषेचा किंवा गरबा … Read more

बारामतीत “त्याच’ बॅनरची चर्चा ; शिंदे- फडणवीसांचे छायाचित्र लक्षवेधी

बारामती – शहरामध्ये गांधी चौक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे व मंडळाचे स्वागत केले. याप्रसंगी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर उभारण्यात आले होते. स्वागत कक्षात उभारलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा होती. स्वागत कक्षामध्ये येणाऱ्या सर्व मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात … Read more

“गद्दारांना भाजपची ताट वाटी…चलो गुवाहाटी” विरोधकांची शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी

  मुंबई – पावसाळी अधिवेशननाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी देखील विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर एकजुटीने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांच्या निशाण्यावर शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेले आमदार असल्याचे पाहायला मिळाले. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी ५० खोके एकदम ओक अशी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. आज मात्र ही … Read more