अमेरिकेत जहाजावर ‘मारिन इंजिनिअर’ म्हणून निवड झालेला तरुण बेपत्ता; मुलाच्या वडिलांची वारजे पोलिस ठाण्यात तक्रार

पुणे – अमेरिकेत जहाजावर ‘मारिन इंजिनिअर’ म्हणून निवड झालेला पुण्यातील तरुण अमेरिकेहून सिंगापूरच्या दिशेने निघालेल्या जहाजावरून बेपत्ता झाल्याची घटना तक्रार अर्जमुळे समोर आली आहे. याबाबत तरुणाच्या वडिलांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र विभागाशी संपर्क साधून माझ्या मुलाचा शोध घ्यावा, अशी विनंती तरुणाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. प्रणव गोपाळ कराड … Read more

हौथींकडून मारा झालेले जहाज बुडाले

दुबई – हौथी बडखोरांनी मारा केलेले एक जहाज आज लाल समुद्रामध्ये बुडाले. गेल्या काही दिवसांपासून हे जहाज पाण्यावर तरंगण्याच्या प्रयत्नात होते. लाल समुद्राच्या मार्गे प्रवास करणार्‍ या व्यापारी आणि मालवाहू जहाजांना हौथींकडून लक्ष्य केली जाऊ लागल्यामुळे युरोप आणि अमेरिककडून प्रतिक्रीया म्हणून उलट कारवाई सुरू केली गेली आहे. हौथी बंडखोरांनी इस्रायलविरोधातल्या आपल्या भूमिकेतून लाल समुद्रातल्या जहाजांवर … Read more

पाकिस्तानला जाणारे जहाज न्हावा शेवावर रोखले

मुंबई – चीनहून कराचीला जाणारे जहाज भारताने मुंबईतील न्हावा शेवा बंदरात रोखले आहे. भारतीय सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आहे की, या जहाजातील साहित्य पाकिस्तानच्या आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरू शकते. चीनमधून येणाऱ्या मालामध्ये, माल पाठवणाऱ्याचे नाव शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेड असे नमूद करण्यात आले आहे आणि सियालकोटमधील पाकिस्तान विंग्ज प्रायव्हेट लिमिटेड असे … Read more

तीन हजार कार घेऊन जाणारे जहाज उत्तर समुद्रात पेटले; एकाचा मृत्यू

द हेग (नेदरलॅंड) – तब्बल तीन हजार कार घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू जहाजाला नेदरलॅंडजवळ उत्तर समुद्रामध्ये आग लागली आहे. या आगीमध्ये जहाजावरील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे आणि इतर काही जण जखमी झाले आहेत. या जहाजावरील आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे नेदरलॅंडच्या तटरक्षक दलाने सांगितले आहे. या जहाजाला लागलेली आग विझविण्यात अपयश आल्यानंतर आता … Read more

मुंबईच्या समुद्रात बुडलेल्या जहाजेतील मृतांची संख्या वाढली

मुंबई – तौक्‍तेचक्रीवादळामुळे मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात बार्ज भरकटले होते. या दुर्घटनेत आता आणखी 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांची संख्याही 49 वर पोहोचली आहे, तर आणखी 37 जण बेपत्ता असून, नौदलाचे जवान त्यांचा शोध घेत आहेत. मुंबईच्या खोल समुद्रात चार बार्जवर एकूण 707 खलाशी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बार्जचे नांगर … Read more

अग्रलेख : “कोंडी’ फुटली, चिंता मिटली

गेल्या काही दिवसांपासून सुएझ कालवा चर्चेत होता तो तेथे अडकून पडलेल्या एका भल्यामोठ्या जहाजामुळे. या घटनेमुळे जगभरातील व्यापारावर गंभीर परिणाम होऊ लागला होता. हे मालवाहू जहाज चीनहून नेदरलॅंडला निघाले होते. हे अडकलेले जहाज काढण्यास अनेक दिवस लागू शकतात असे सांगितले जात होते. पण अखेर या जहाजाचा मार्ग मोकळा झाला आहे. 400 मीटर लांब आणि 59 … Read more

7 महिन्यांपासून चीनमध्ये अडकलेले 23 भारतीय खलाशी परतले

मुंबई – चीनमधील बंदरामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून जहाजावर अडकून पडलेले 23 भारतीय खलाशी आज मायदेशी परतले. कोचीन विमानतळावर हे सर्व खलाशी परत आले, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. करोनाच्या साथीमुळे चीनमध्ये प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यात आल्याने एमव्ही जग आनंद या जहाजाला गेल्या वर्षी 13 जूनपासून चीनमधील जिंगतांग बेटावरच नांगर टाकून थांबावे लागले होते. जहाजावरील … Read more

भारतात तेल घेऊन येणाऱ्या जहाजाला आग

कोलंबो  – कुवेतहून भारताकडे कच्चे तेल घेऊन येणाऱ्या एका जहाजाला लागलेली आग विझवण्याचे काम आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. श्रीलंका नौदल व भारतीय जहाजांकडून हे काम सुरू आहे. आग लागलेल्या जहाजावर एकूण 23 कर्मचारी होते त्यातील एका कर्मचाऱ्याचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ठार झालेला कर्मचारी फिलिपाईन्स देशाचा होता. जहाजाच्या इंजिन रूमपर्यंत ही आग … Read more

जपानजवळ पशुधन वाहतूक करणारे जहाज बुडाले

टोकियो – जपानच्या दक्षिणेकडील बेटाजवळ जनावरांची वाहतूक करणारे एक जहाज खवळलेल्या समुद्रामुळे आज बुडाले. जपानच्या बचाव पथकाकडून या जहाजातील 42 खलाशांचा शोध सुरू असल्याचे तट रक्षक दलाने सांगितले.  जपानच्या नौदलाच्या पी-3 सी या टेहळणी करणाऱ्या विमानाने दुर्घटनाग्रस्त ‘द फिलीपिनो’ या जहाजावरील एका खलाशाला बघितले आणि त्याला वाचवले. जीवरक्षक जॅकेट घातलेला हा खलाशी विमानाचे लक्ष वेधून … Read more

बांगलादेशाचे जहाज बुडाले

ढाका – बंगालच्या उपसागरात बांगलादेशातील हातीयाजवळ शनिवारी एक हलके जहाज बुडाले. “एमव्ही अख्तर बानो’ या जहाजात असणारे 13 नाविक बेपत्ता असल्याची माहिती आहे. बांगलादेशच्या हातीयाजवळ पटेंगा समुद्र किनाऱ्यापासून 40 सागरी मैल दूर खवळलेल्या समुद्रात हे जहाज बुडाले. हे जहाज 2000 टन गहू घेऊन चालले होते.  हे जहाज बुडाल्यानंतर बांगलादेशचे तटरक्षक दल आणि नौदल शोध मोहीम … Read more