nagar | नगरमधून नीलेश लंके तर शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे विजयी

नगर, (प्रतिनिधी)- राज्यात जसे महायुतीचे पतन झाले, त्याच पद्धतीने नगर जिल्ह्यातही धक्कादायक निकाल लागला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नीलेश लंके तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आघाडीचेच भाऊसाहेब वाकचौरे हे विजय झाले आहेत. या दोघांनी विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे व सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. लंके 29 हजार 314 मतांनी तर वाकचौरे 50 हजार 529 मतांनी … Read more

nagar | आज अखेर आचारसंहितेच्या नियंत्रण कक्षात ४७ तक्रारी

नगर (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांतील, आज अखेर आचारसंहितेच्या नियंत्रण कक्षात ४७ तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्या सर्व निकाली काढण्यात आल्या आहेत. केवळ १९ तक्रारींमध्ये तथ्य आढळले. जिल्हा नियंत्रण कक्षाचे प्रमुख तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील आचारसहिताभंगाच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी … Read more

महायुतीमध्ये नव्याने सामिल झालेल्या मनसेला शिर्डी लोकसभा मिळण्याची दाट शक्यता?

Bala Nandgaonkar loksabha election 2024

राजेंद्र वाघमारे  नेवासा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुलख मैदानी तोफ राज्याचे माजी गृहराज्य मंञी तथा मनसेचे जेष्ठनेते बाळा नांदगांवकर यांची अनाहूतपणे महायुतीमध्ये नव्याने सामिल झालेल्या मनसेच्या वाट्याला शिर्डी लोकसभा मतदार संघाची जागा अनपेक्षितपणे मनसेकडे येण्याची दाट शक्यता असून या मतदार संघाची उमेदवारी मनसेचे जेष्ठनेते बाळा नांदगांवकर यांना मिळणार असल्याची खाञी विश्वासनिय सुञांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना … Read more

शिर्डीतून सदाशिव लोखंडेंच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पदाधिकाऱ्यांनी घातले साकडे

SHIVSENA

नेवासा । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकतीच गुरुवारी सकाळी वर्षा निवासस्थानी भेट घेतली.  शिर्डी मतदार संघाची उमेदवारी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना देण्याची मागणी या शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंञी शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे हे या मतदार संघातून दोनदा विजयी आहे. शिर्डी येथे सर्वसामान्य जनतेशी खासदार लोखंडे यांची नाळ जोडली … Read more

धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; एका ओळीचं पत्र लिहीत दिला राजीनामा; शरद पवार गटात जाणार ?

ajit pawar sharad pawar

Ajit pawar । आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. राज्यातील महायुतीमधील भाजप पक्षाने आता पर्यंत उमेदरांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहे. यावरून शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अशात अजित पवार गटातील नेत्याने राजीनामा देत नाराजी व्यक्त केली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे … Read more

nagar | खासदार सदाशिव लोखंडे यांंना विरोध

शिर्डी, (प्रतिनिधी) – ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून सुरू असलेली धुसफूस तर दुसरीकडे महायुतीतील जागा वाटपावरून सुरू असलेला अंतर्गत कलह यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अशातच शिर्डी लोकसभा मतदार संघातून सलग दोनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार सदाशिव लोखंडेंना पहिला … Read more

नगर | शिर्डी ते जेजुरी पालखीचे शिर्डीतून प्रस्थान

शिर्डी, (प्रतिनिधी) – पदयात्रेने देव दर्शनासाठी जाणे हे भाविकांसाठी खरोखर भाग्यवान असून ते नशीबवान आहेत, अशी भावना माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी व्यक्त केली. शिर्डी ते जेजुरी जाणाऱ्या पालखीला कैलासबापू कोते व मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी श्रीफळ वाढवून भाविकांना शुभेच्छा दिल्या. शहरातील गणेशवाडी येथून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त शिर्डी ते जेजुरी पायी पदयात्रा दरवर्षी जात असते. … Read more

नगर | कोयता गॅग लोगो वापरा शिर्डीत कोयता गँगची दहशत

शिर्डी, (प्रतिनिधी) – शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थस्थानी गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचा हैदोस सुरूआहे. विशेष म्हणजे भर चौकात तलवार, चॉपर, कोयता हातात घेऊन काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी खुनी हल्ले, मटका पेढी लुटणे, दुकानदारांच्या बोर्डवर कोयत्याने नुकसान करणे, अशा घटना वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये व व्यापारी वर्गात मोठे दहशतीचे वातावरण आहे. यामागे नेमका कुणाचा हात आहे, हे शोधण्याचं … Read more

‘सर्व देवी-देवतांनी चांगलं करण्यासाठी मोदींची नेमणूक केलीय’ – गायक सुरेश वाडकर

Singer Suresh Wadkar । राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. दरम्यान, 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना नुकतंच प्रदान करण्यात आला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो. तर, दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते … Read more

नगर | शिर्डीत आज साई परिक्रमा सोहळा

शिर्डी, (प्रतिनिधी) : देश-विदेशातील साईभक्तांचा सहभागाने दि. १३ फेब्रुवारी रोजी यंदाचा साई परिक्रमा सोहळा साजरा साजरा होत आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन शिर्डी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. नर्मदा परिक्रमा, ब्रम्हगिरी परिक्रमा आदींच्या धर्तीवर ग्रीन एन क्लीन फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी नगरपरिषद व सांईभक्तांकडून गेल्या पाच वर्षांपासून … Read more