पुणे जिल्हा | शिरूरचा गुलाल कोण उधळणार

नारायणगाव, {मंगेश रत्नाकर} – शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाप्रक्रिया पार पडली असली तरी शिरूरचा लोकसभा मतदारसंघात कोण गुलाल उधाळणार याकडे जुन्नरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणूक जरी शिरूर मतदारसंघाची असली तरी निवडणुकीतील मुख्य दोन प्रतिस्पर्धी उमेदवार शेजारील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील असल्याने निवडणुकीत मोठी रंगत चढली होती. निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघातील महाविकास … Read more

पुणे जिल्हा | खेडमध्ये महिलांचा प्रचंड निरुत्साह

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघात खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात 1 लाख 83 हजार 57 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 16 हजार 131 मतदारांनी तर 1 लाख 69 हजार 567 महिला मतदारांपैकी 87 हजार 736 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 50 टक्के महिला वर्गाने मतदानाकडे पाठ फिरवली त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली तर यामुळे कोणत्या उमेदवाराला फटका बसणार … Read more

पुणे जिल्हा | जांबूतमध्ये मत उत्सवावर कोसळधारा मतदानांची टक्केवारी घटली

जांबूत, (वार्ताहर)- शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना बेट भागातील जांबूत, चांडोह येथे संध्याकाळी पाचच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानावर परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. जांबूत येथे ६८ टक्के मतदान झाले शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी होत असलेल्या मतदानासाठी बेट भागातील काठापूर, पिंपरखेड, जांबूत, चांडोह, फाटके, वडनेर सर्वच मतदान … Read more

पुणे जिल्हा | अवसरी बुद्रुक येथील केंद्राचे संचालन महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळले

मंचर, (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बुद्रुक येथील मतदान केंद्राची पूर्णपणे जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळून यशस्वी केली आहे. मतदान केंद्राला फुग्यांची सजावट आणि सेल्फी पॉईंट मतदारांचे आकर्षण ठरले. अवसरी बुद्रुक येथे उभारण्यात आलेले मतदान केंद्र पूर्णतः महिला कर्मचाऱ्यांनी हाताळले असून महिला मतदान केंद्र उभारले … Read more

पुणे जिल्हा | खेडमध्ये एकही मतदानकेंद्र संवेदशील नाही

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील 385 मतदान केंद्रासाठी साहित्य पाठविण्याची तयारी पूणर्र् झाली आहे. खेड तालुक्यातील 385 मतदान केंद्रापैकी एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. रविवारी (दि. 12) हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलातुन मतदान साहित्य घेऊन 64 एस.टी.बसेस आणि 8 खासगी जीपमधून कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक … Read more

पुणे जिल्हा | मतदान झाले, कालव्याचे पाणी थांबले ?

लोणी काळभोर, (वार्ताहर) – बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान नुकतेच संपले असून शिरुर लोकसभा मतदार संघातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यावर लगेचच आज नवीन मुठा उजव्या कालव्याचे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे हवेली तालुक्याचा पूर्व भाग, दौंड व इंदापूर तालुक्यातील 66 हजार हेक्टर शेतीला व या भागातील नागरिकांना पिण्याच्या … Read more

पुणे जिल्हा | भोसरीत देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा

भोसरी, – शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत उद्या (दि. 10 मे) भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा होणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील तोफ धडाडणार आहे. भोसरी विधानसभेतील भाजपाचे आमदार आणि शिरुर लोकसभा … Read more

पुणे जिल्हा | डॉ. कोल्हेंनी सादर केले पुरावे

शिरूर – शिरूर लोकसभा मतदारसंघतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथील सभेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लक्ष करत, थेट आरोप केले होते. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुरावे द्या, नाहीतर निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घ्या, असे आव्हान दिले होते. त्यानंतर आता डॉ. कोल्हे यांनी पुरावे सादर केले असून आता … Read more

पुणे | आढळराव कुटुंबीयांकडे 39 कोटींची संपत्ती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ता मिळून एकूण 26 कोटी 94 लाख 69 हजार रुपयांची मालमत्ता आहे, तर पत्नीकडे 11 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता आहे. आढळराव पाटील यांच्यावर 1 कोटी 51 लाख रुपयांचे कर्ज आहे. आढळराव पाटील यांच्या कुटुंबीयांकडे एकून 39 कोटी … Read more

पुणे | जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी ; सामान्य नागरिकांना फटका

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्य़ाचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री येणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना आज प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. परिणामी, कामानिमित्त बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना पुन्हा … Read more