पुणे जिल्हा | शिवाजीराव आढळराव पाटील स्वत:च्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर

मंचर, (प्रतिनिधी) – महायुतीचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वताच्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर रहावे लागले. महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांना आघाडी मिळाली. त्यामुळे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर रहावे लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार … Read more

पुणे जिल्हा | शिरूरमध्ये घड्याळ की तुतारी?

नारायणगाव, {मंगेश रत्नाकर} – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी पडल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (दादा) गटाच्या आजी-माजी खासदारांमध्ये लढाई रंगली. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे (तुतारी चिन्ह), शिवाजीराव आढळराव पाटील (घड्याळ चिन्ह) दोघांपैकी कोण विजयी गुलाल उधळणार यापेक्षाही शरद पवार की अजित पवार यांचा पठ्ठ्या मंगळवारी (दि. 4) विजयी होणार याकडे शिरूर … Read more

पुणे जिल्हा | शिरूरचा गुलाल कोण उधळणार

नारायणगाव, {मंगेश रत्नाकर} – शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाप्रक्रिया पार पडली असली तरी शिरूरचा लोकसभा मतदारसंघात कोण गुलाल उधाळणार याकडे जुन्नरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणूक जरी शिरूर मतदारसंघाची असली तरी निवडणुकीतील मुख्य दोन प्रतिस्पर्धी उमेदवार शेजारील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील असल्याने निवडणुकीत मोठी रंगत चढली होती. निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघातील महाविकास … Read more

पुणे जिल्हा | मोबाइल हा महाभयंकर आजार

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – मोबाइल हा आजच्या नव्या पिढीला लागलेला महाभयंकर आजार आहे. वेळीच यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सचिन महाराज बेंडे यांनी येथे केले. वाळद येथील श्री गणेश मंदिराचा 20 वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यानिमित्ताने शिवव्याख्याते सचिन महाराज बेंडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला, … Read more

पुणे जिल्हा | रात्र वैऱ्याची आहे

तळेगाव ढमढेरे, (वार्ताहर)- शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार मतदान प्रक्रिया पार पडणार आहे .शरद पवार यांच्या शिरूर येथील सभेमुळे शिरूरचे वातावरण ढवळून निघाले आहे .शिरूर तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु राष्ट्रवादीचा दोन गटात विभागल्याने तालुका नक्की कोणाचा, असा प्रश्न जानकार मतदारांना पडला आहे. गेल्या महिन्यांपासून आरोप- प्रत्यारोपाची राळ उठल्यानंतर आता शिरूरच्या आखाड्यात प्रचार तोफा … Read more

पुणे जिल्हा | राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक

केंदूर, – सोनिया गांधींचा विदेशी असल्याचा मुद्दा पुढे करून पवार साहेबांनी काँग्रेस सोडली. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळत असताना नाकारले. 2019 मध्ये भाजपमध्ये जायचे ठरले आणि त्यांनी माघार घेतली. ही धरसोडवृत्ती राजकीय निर्णयांमध्ये घातक ठरते, असे मी पवार साहेबांना सांगितले. तरीही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता असाउ गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. या … Read more

पुणे जिल्हा | कुणबी मराठा महासंघाचा आढळरावांना पाठींबा

मंचर, – महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठींबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आढळराव यांना पाठींब्याचे पत्र देण्यात आले आहे. महासंघाचे संस्थापक प्रल्हाद गुळाभिले यांच्या सूचनेवरून हा पाठींबा देण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश लोकसभा प्रभारी अनिल ताके पाटील यांनी नमूद केले. जयमल्हार … Read more

पुणे जिल्हा | इंडिया आघाडी कसाबसोबत महायुती विकासासोबत

शिरूर, – इंडिया आघाडी आता अतिरेकी कसाबची भाषा बोलू लागली आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांना टोला लगावला. वडेट्टीवार हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आमची महायुती मात्र कसाबला फाशीची शिक्षा होण्यासाठी न्यायालयीन बाजू लढविणार्‍या उज्ज्वल निकमांसोबत आहे. करकरेंचा मृत्यू कसाबच्या गोळीने नाही तर एका अधिकार्‍याच्या गोळीने झाला, असे वक्तव्य वडेट्टीवारांनी केले होते. त्याचा … Read more

पुणे जिल्हा | डॉ. कोल्हेंनी सादर केले पुरावे

शिरूर – शिरूर लोकसभा मतदारसंघतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथील सभेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लक्ष करत, थेट आरोप केले होते. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुरावे द्या, नाहीतर निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घ्या, असे आव्हान दिले होते. त्यानंतर आता डॉ. कोल्हे यांनी पुरावे सादर केले असून आता … Read more

पुणे जिल्हा | हवेलीतील मताधिक्य तरुणांच्या हाती

लोणी काळभोर (वार्ताहर)- शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात चांगलीच चर्चेची बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी या मतदारसंघात घडताना दिसत आहे. सध्या या मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे. या लोकसभा मतदार संघातील महत्त्वाचा तालुका म्हणून शिरुर विधानसभा … Read more