कर्नाटक: ‘टिपू सुलतान विरुद्ध सावरकर’ पोस्टरवरून वाद; शिवमोग्गा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नवी दिल्ली : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवमोग्गा शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा गोंधळ टिपू सुलतान विरुद्ध स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावावरून … Read more

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येमागे कॉंग्रेसचा हात, भाजप आमदाराचा आरोप

बेंगळुरू – बेंगळुरूमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येमागे कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपचे आमदार एम. के. रेणुकाचार्य यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सरकारने “एनआयए’कडे सोपवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा याच्या हत्येमागे डी. के. शिवकुमार, बी. के. हरीप्रसाद आणि अन्य कॉंग्रेस नेत्यांचा हात असल्याचा आरोप रेणुकाचार्य यांनी केला आहे. या कार्यकर्त्याच्या … Read more

कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर चाकूने वार करत हत्या; प्रचंड तणाव, कलम 144 लागू

कर्नाटकात रविवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवमोगा जिल्ह्यात काल एका 26 वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर तणाव वाढला आहे. ही घटना रात्री 9 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार,हर्षा असे हत्या करण्यात आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. Karnataka | A 26-year-old Bajrang Dal activist Harsha … Read more

Updated News : सुरुंगाची दारू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा स्फोट; 10 जणांचा मृत्यू

शिवमोगा – खाणीसाठी सुरुंगाचा साठा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा स्फोट होऊन किमान 10 जण मरण पावले. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की सभोवतालचा सारा परिसर हादरला. शिवमोगा जिल्ह्यातील अबलगिरी गावात हा स्फोट झाला. या स्फोटामुळे शेजारच्या चिकमंगळूर आणि दावणगिरी जिल्ह्यातील परिसरही हादरला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात झालेल्या या स्फोटातील जीवितहानीबाबत शोक व्यक्त केला. … Read more

कर्नाटकातील भीषण स्फोटात 8 मजुरांचा मृत्यू; रस्त्याला पडल्या भेगा

बंगळुरु : कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री एक मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोटकांनी भरेलल्या एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला. ज्यामुळे या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे स्वरुप इतके मोठे होते, की आजुबाजूच्या परिसरातही याचा हादरा जाणवला. इतकेच नव्हे तर, या शक्तिशाली स्फोटामुळे रस्त्यालाही भेगा गेल्या. नजीकच्या परिसरात असणाऱ्या घरांच्या आणि … Read more