हे सगळं भाजपनं केलंय…! उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. मी मोह सोडलाय बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केले ? एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?, नगरविकास खातं दिलं माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली  असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. संजय राठोडांवर वाईट आरोप … Read more

पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा असं म्हटलं नाही, त्याबद्दल राऊतांचे अभिनंदन : सदाभाऊ खोत

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी नाट्यमय रित्या उमेदवारी अर्ज भरला आणि तो नंतर माघारी देखील घेतला. त्यामुळे ते मोठ्या चर्चेत आले. मात्र आता त्यानंतर त्यांचे ट्विट चर्चेत आले आहे. ‘विझलो आज जरी मी ,हा माझा अंत नाही… ‘ अशा आशयाची ‘लढेन नव्या उमेदीने’ ही सुरेश भट यांची कविता … Read more

पवारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ठाकरे सरकारला कोर्टात डेटा देता आला नाही : आरक्षण मुद्द्यावरून गोपीचंद पडळकरांची टीका

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. दिवसा ढवळ्या ओबीसींना फसवलं जातंय. ठाकरे सरकार प्रस्थापितांच्या रिमोट कंट्रोलवर चालतंय हे सिद्ध झालंय. ओबीसी आरक्षण टिकविण्याचा सरकारचा फसवा प्रयत्न मा.सुप्रीम कोर्ट फेटाळण्याची शक्यताये. परत महाराष्ट्राला नामुष्की सहन … Read more

भगवा फडकवण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

बेळगाव : महाराष्ट्रˆ-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी करत बेळगावकडे निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या सीमेतच रोखल्याचा दावा आंदोलकांनी केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडले. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. बेळगाव महापालिकेसमोर … Read more

बावधनमध्ये खाेदकाम अपूर्णच, रस्ते दुरुस्तीचे ‘वावडे’

कोथरूड  – केबल, पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याबाजूला कंपन्यांकडून खोदकाम केले जाते. मात्र, ते काम वेळेत पूर्ण करून आणि खड्डे तात्काळ बुजवून रस्ता व्यवस्थित करण्यात या कंपन्यांना “वावडे’च असल्याचे दिसून येते. मग ते शहरातील रस्ते असो, किंवा महामार्गालगतचे सेवा रस्ते. बावधन येथील सेवा रस्त्यावर खोदकाम करून पंधरा दिवस झाले, तरी त्याचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे याठिकाणी दररोज … Read more

हडपसर, मांजरी परिसरातून बंदला संमिश्र प्रतिसाद; नेत्यांची भाजपवर सडकून टीका

हडपसर – केंद्र सरकारच्या कृषि विषयक धोरणाविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याकरिता पुकारण्यात आलेल्या भारत बंदला हडपसर, मांजरी परिसरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला.   महाविकास आघाडीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या घोषणाबाजीव्यतिरिक्त आंदोलन सर्वत्र शांततेत झाले. हडपसर परिसरात बंदचा परिणाम पाहायला मिळाला. भाजीपाला मंडईत कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे … Read more

एकाकी कॉंग्रेसला मिळाले बळ; भाजप ‘टार्गेट’

पुणे – शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी कॉंग्रेस पक्ष सातत्याने आंदोलन करत आहे. प्रदेश कॉंग्रेसच्या सूचनेवरून पुण्यातही आंदोलन सुरू ठेवण्यात आले होते. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष याबाबत कॉंग्रेसपासून अंतर ठेवून होते. आता तेही आंदोलनात उतरले आहेत. यामुळे इतके दिवस एकाकी लढणाऱ्या कॉंग्रेसला बळ मिळाले आहे. मात्र, शिवसेनेच्या सहभागावरून भाजप … Read more

शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची आवश्यकता

नवी दिल्ली- केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली असून, आज या आंदोलनाचा १३ वा दिवस आहे. आंदोलना दरम्यान केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची पाच वेळा बैठक झाली. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर ठिय्या मांडून आहेत. याच पार्श्वभूमीवर … Read more

विधानपरिषद निकाल म्हणजे महाविकास आघाडीचे यश  : ज्ञानेश्वर कटके

पुणे – विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा भक्कम पाठींबा कलाटणी देणारा ठरला. महाविकास आघाडी सरकार स्थापनेची वर्षपूर्ती होत असताना विधानपरिषद निवडणुकीत मिळालेले यश आगामी निवडणुकांच्या निकालांचा कलही स्पष्ट करतो. यातून आता विरोधकांच्या पोटात पराभवाचे गोळे यायला लागले आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य … Read more

कॉंग्रेस पक्षाला पुण्यात कोणी ‘पालक’ देता का?

पुणे  – राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा पुणे शहरात कॉंग्रेस पक्षाचे पालकत्व कोणाकडे याचे उत्तर अजूनही पक्षाच्या नेत्यांना मिळालेले नाही.   महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्यासाठी “दादा’ उपलब्ध असतात. कार्यकर्ते हक्काने त्यांच्याकडे जातात. आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मात्र … Read more