पुणे जिल्हा | चैतन्य बावधने याने पटकाविला शिवतेज वक्तृत्व करंडक

भोर, (प्रतिनिधी) – भोर येथील वाघजाई सांस्कृतिक सभागृहात शिवजयंतीच्या निमित्ताने शिवतेज युवा प्रतिष्ठान भोर यांच्या वतीने शिवतेज करंडक राज्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. लक्ष्मण अवघडे, राजेंद्र चौघुले यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. माधवी कडू, समृद्‌धी गोळे, प्रा. संगीता कामठे यांनी काम पाहिले. प्रा. सोमनाथ कुंभार, प्रा. सुभाष भेलके, … Read more

राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ मोफत; मंत्रिमंडळ बैठकीतील धडाकेबाज निर्णय वाचा….

Maharashtra Cabinet Decision : भारताच्या इतिहासात २२ जानेवारी २०२४ चा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतिक्षेनंतर भव्य राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा एक दिव्य अनुभव असेल, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल. प्राचीन मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीपप्रज्वलन … Read more

#मंत्रिमंडळनिर्णय : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ला राज्यगीताचा दर्जा; शिवजयंतीपासून अमलबजावणी

मुंबई – शाहिर साबळे यांच्या आवाजातील “जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवून देणाऱ्या राजा बडे लिखित या गाण्याला शाहिर साबळे यांचा भारदस्त आवाज लाभलेला आहे. शाहिर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित “महाराष्ट्र शाहिर’ हा सिनेमा … Read more

मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी; शर्मिला ठाकरेंची शिवसेनेवर टीका म्हणाल्या,”सत्तेत गेल्यापासून शिवसेनेला”

 मुंबई :  आज संपूर्ण राज्यभरात शिवजयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत शिवाजी पार्कमध्येही  शिवजयंती साजरी केली जात आहे. या कार्यक्रमासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. तसेच राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शपथ दिली. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेदेखील यावेळी उपस्थित होत्या. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी … Read more

Shivjayanti 2022 : हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी तर, बाईक रॅली; मनसेकडून अशी साजरी होणार शिवजयंती

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांची आज 21 मार्च रोजी राज्यभर तिथीने जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर मधील किल्ले शिनेरीवर मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित झाले आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुद्धा शिवजयंतीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती जोरात आणि उत्साहात … Read more

Shivjayanti 2022 ; ‘अमित ठाकरे’ यांच्या हस्ते किल्ले शिवनेरीवर महाअभिषेक

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांची आज 21 मार्च रोजी राज्यभर तिथीने जयंती साजरी केली आजच्या आहे. या निमित्ताने शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर मधील किल्ले शिनेरीवर मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित झाले आहे. यावेळेस किल्ले शिवनेरीवर शिवकालीन पालखीचे आगमन झाले. दरम्यान, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष ‘अमित ठाकरे’ व आमदार ‘राजू पाटील’ हे देखील आज छत्रपतींचा आशीर्वाद घेण्यासाठी … Read more

मंचर मध्ये ‘शिवजयंतीसाठी 500 जणांना परवानगी’

मंचर  – शिवज्योत वाहण्याकरिता 200 भाविकांना आणि शिवजयंती उत्सवाकरिता 500 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. अटी व शर्तींच्या आधिन राहून करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी न करता छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी केले आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथील पोलीस ठाण्याच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शांतता कमेटी, मोहल्ला … Read more

Shivjayanti 2022 : शिवजयंतीबाबत पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना

कोरेगाव भीमा -राज्य सरकारने निश्‍चित केल्यानुसार (दि. 19) रोजी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शक सूचना पत्रकाद्वारे केले आहे. करोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शिवजयंती साजरी करत असताना शिवज्योत आणण्याकरिता 200 भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता 500 भाविकांना परवानगी देण्यात येत आहे. यावर्षी … Read more

गडपुजन, शिरकाईच्या गोंधळाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरवात

– सतेज औंधकर रायगड –  किल्ले रायगडावर युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गडपुजन करून गडपुजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली. सांयकाळी गडदेवता शिरकाई देवीसमोर पारंपरिक गोंधळ घालण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या नामघोषाने आणि शिवकालीन मर्दानी खेळाने गडावरील वातावरण शिवमय झाले होते. उद्या ६ जुन या मुख्य दिवशी सकाळी ध्वजारोहन, पालखी सोहळा आणि राजसदरेवरील मेघडंबरीतील ऐतिहासिक … Read more

सिद्धीविनायक ग्रुपकडून शिव जयंतीच्या पुर्वसंस्थेला उबदार ब्लॅंकेटचे वाटप

धनकवडी – महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कात्रज येथील सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीने अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यविषय जनजागृती, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियमांचे पालन त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांनी ग्रुपच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. तर पूर्व संध्येला पुणे रेल्वेस्थानकावरील बेघरांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. हे वाटप पोलीस अधिक्षक(लोहमार्ग) सदानंद … Read more