पुणे जिल्हा : भाजपच्या आंदोलनाच्या दणक्याने महावितरण खडबडून जागे

सासवड – भाजप कार्यकर्त्यांनी थेट सासवड (ता. पुरंदर) येथील महावितरण कार्यालयात आंदोलन करताच महावितरण खडबडून जागे झाले आणि पारगाव मेमाणे येथे 100 केव्हीची डीपी मंजूर करण्यात आला. पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील नागरे वस्तीतील डीपी बंद पडल्यानंतर महावितरण तक्रार केली असता आठ दिवसांनी 100 केव्ही डीपीची गरज असताना अधिकार्‍यांनी 60 केव्हीचा रहित्र पाठवून दिला व … Read more

पुणे जिल्हा : अजित पवार गटास खेडमध्ये धक्का

आमदार मोहिते यांचे पुतणे शैलेश मोहितेंचा ठकरे गटात प्रवेश शेलपिंपळगाव – लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत … Read more

पुणे जिल्हा : भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने बहिणीचाही अंत

सासवडमधील घटना : परिसरात शोककळा सासवड – पुरंदर तालुक्यातील सासवड येथील रहिवाशी व किराणा दुकानदार वसंत अशोक जाधव (वय 33 रा. सासवड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या बहिणीचाही अंत झाल्याने परिसरात शोककळा पसलरली. जाधव यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची बहीण प्रमिला माने (वय 29 रा. पुणे) या अंत्यविधी उरकून आल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर अचानकपणे बेशुद्ध पडल्याचे नातेवाइकांनी … Read more

पुणे जिल्हा : सोने-चांदीला झळाळी; खरेदीदारांना झटका!

ऐन लग्नसराईत भावात वाढ झाल्याने बजेट बिघडले नारायणगाव – सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईची झळ आता लग्नसराईला बसू लागली आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने लग्न समारंभ असलेल्या कुटुंबांवर आर्थिक बोजा वाढला आहे. सराफा व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट विस्कळित झाले आहे. त्यामुळे ग्राहकांचे पुन्हा … Read more

सातारा : बॅंडच्या गाडीचा शॉक बसल्याने युवक ठार

बिचुकले येथील दांडिया कार्यक्रमातील घटना वाठार स्टेशन – बिचुकले (ता. कोरेगाव) येथे नवरात्रोत्सवात गाणी वाजवण्यासाठी आलेल्या बॅंडच्या गाडीत विजेचा शॉक लागल्याने वाठार स्टेशन येथील ओंकार विजय लोंढे (वय 23) हा युवक ठार झाला. वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशन येथील तुकाराम माने यांची बॅंडची गाडी शुक्रवार, दि. 20 रोजी सायंकाळी सहा वाजता बिचुकले येथे नवरात्र … Read more

पुणे जिल्हा : ग्राहकांना महावितरणकडून “शॉक’

ऐन सणासुदीत वीजदरवाढीला जावे लागणार सामोरे पुणे – वीज खरेदी खर्चात वाढ झाल्याने आता विजबिलांत इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना प्रति युनिट 35 पैसे जादा द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ऐन सणासुदीत ग्राहकांना वीजदरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबतचे आदेश महावितरणच्या मुख्य अभियंतांनी (वीज खरेदी) काढले आहे. ही … Read more

पावसाळी पर्यटन जीवावर; चार जणांचा बुडून, एकाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू

पुणे – सलग पाच दिवसांच्या सुट्या आल्याने पावसाळी पर्यटनासाठी भोर, वेल्हे, मुळशी धरण आणि गड-किल्ले क्षेत्राजवळ पर्यटकांची शनिवार (दि. 12) ते बुधवार (दि. 16) गर्दी होती. मात्र, या तीन तालुक्‍यांत वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांवर काळाने झडप घातल्याच्या घटना घडल्या असून, भोरमधील दोन, वेल्ह्यात एक आणि मुळशीत एकाचा बुडून, तर एकाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला आहे. … Read more

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; विजेच्या धक्क्याने 15 जणांचा मृत्यू

चमोली (उत्तराखंड) – चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर असलेल्या नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी वीज ट्रान्सफॉर्मरच्या दुर्घटनेत 15 जणांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन होमगार्ड आणि एका पोलिसाचा समावेश आहे. चमोलीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एनके जोशी यांनी सांगितले की, मंगळवारी उशिरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या एका व्यक्तीचा … Read more

सोलापुरात राष्ट्रवादीला धक्का; भगीरथ भालके करणार बीआरएसमध्ये प्रवेश

सोलापुर : तेलंगणातील बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीने सोलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्‍क दिला आहे. तेथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. अभिजीत पाटील यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी तर्फे विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याचे संकेत पवारांनी दिले होते. तेव्हापासून … Read more

वीज दुरुस्ती करताना विजेच्या खांबाला चिकटून वायरमनचा मृत्यू, कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

पारनेर – तालुक्‍यातील वाडेगव्हाण बेलवंडी फाटा शिवारात काल (सोमवार) सायंकाळी 6 वाजता वायरमनचा विजेच्या खांबाला चिकटून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्‍यातील वाडेगव्हाण बेलवंडी फाटा शिवारात अवकाळी वादळी वाऱ्यामुळे परिसरातील वीज खंडित झाली होती. त्यामुळे महावितरणने वीज दुरुस्तीसाठी वायरमन पाठवला. दरम्यान, वीज दुरुस्ती करत असताना वायरमन भरत कोल्हे यांचा विजेच्या खांबाला चिकटून … Read more