यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीने उधळला गुलाल; भाजपा आणि शिंदे गटाला धक्का

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील 7 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीने या निवडणुकीत गुलाल उधळला आहे. तर भाजपा आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. 1) यवतमाळ बाजार समिती- कॉग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या युतीला 11 जागा तर भाजप आणि शिंदे गटला 4 जागा तर 3 अपक्ष विजयी 2) … Read more

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भाजपा, शिंदे गटाला धक्का देत एकनाथ खडसेंनी कायम राखला गड

मुंबई : आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले … Read more

शॉक लागून चार भावंडांचा मृत्यू

संगमनेर – तालुक्‍याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना वीजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पठार भागासह तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे. अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे अशी मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावे आहेत. हे चौघे … Read more

पनवेलमध्ये घाटावर विसर्जनासाठी गेलेल्या ११ जणांना विजेचा धक्का

पनवेल – देशभरामध्ये आज गणेशोत्सवाची सांगता होत आहे. करोना लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करता आल्या नसल्याने यंदा सर्वत्र मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. ठिकठिकाणी गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. अशातच पनवेल शहरामध्ये गणेश विसर्जन घाटावर दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. पनवेल येथील कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात … Read more

पुणे जिल्हा : माजी आमदार पोपटराव गावडेंना धक्‍का

दामूअण्णा घोडे यांच्याकडे एकहाती सत्ता शिरूर/ सविंदणे – राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शिरुर तालुक्‍यात प्रथमच निवडणूक झाली आहे. यात माजी आमदार पोपटराव गावडे यांना धक्‍का बसला आहे. माजी सरपंच दामूअण्णा घोडे यांचे पॅनल विजयी झाले. शिरूर तालुक्‍याचे दोनवेळा प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार गावडे यांच्या बेट भागातील वर्चस्वाला ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने जबर हादरा बसला. टाकळी हाजी … Read more

गोव्यात कॉंग्रेसला आणखी एक हादरा

पणजी – गोव्यात कॉंग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक राजकीय हादरा बसला. कॉंग्रेसच्या प्रदेश प्रवक्‍त्या राखी प्रभुदेसाई-नाईक यांनी पक्षातून बाहेर पडत तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. नाईक यांची कॉंग्रेसमधील कारकीर्द अत्यल्प काळचीच ठरली. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्या शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्या. मात्र, प्रदेश नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करत त्यांनी कॉंग्रेसलाही रामराम ठोकला. कॉंग्रेसचे प्रदेश नेतृत्व दिशाहीन … Read more

गेटचे रंगकाम करताना विजेचा झटका; चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

अमरावती – अमरावतीत माजी राज्यमंत्री व भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्या पोटे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेटचे रंगकाम करताना चार कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला चार तास उलटूनही कोणीही मृतदेह पाहायला व नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आले नाही, असा आरोप मृतांच्या नेतेवाईकांनी केला. मरण पावलेल्या चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात … Read more

हृदयद्रावक ! पोलीस मुलाच्या हत्येचं वृत्त कळताच, आईनेही सोडला प्राण; माय-लेकावर एकत्रच अंत्यसंस्कार

पाटना – मुलांवर आईचं जिवापाड प्रेम असतं हे वेगळ काही सांगण्याची आवश्यकता नाही. मुलाचा जीव वाचविण्यासाठी आई वेळप्रसंगी आपला जीवही धोक्यात घालते. अशा अनेक घटना आहेत. मात्र बिहारमध्ये मुलांच्या मृत्यूचं वृत्त कळताच आईने आपला प्राण सोडल्याचं समोर आले आहे. पोलीस मुलगा मरण पावल्याचे कळताच आईने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या माय-लेकावर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. … Read more

पुणे भाजपला सांगलीचा धसका? “स्थायी’साठी सदस्यांना बजावला “व्हिप’

पुणे – सांगली महापालिकेत घडलेल्या राजकीय घडामोडींचा धसका घेत, भाजपने स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी पुण्यात सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. स्थायी समिती अध्यक्षपदावरून समिती सदस्यांमध्ये धूसफूस सुरू असल्याने निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी समितीच्या सर्व सदस्यांना व्हिप बजावण्यात आला आहे.     स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षाकडून याबाबत खबरदारी घेण्यात आली … Read more

मोठी बातमी : ‘कॉमन मॅन’चं बजेट कोलमडणार; घरगुती सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

नवी दिल्ली – एकीकडे देशात सर्वसामान्य जनता पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण होत आहे तर दुसरीकडे आता आणखी एक मोठा झटका नागरिकांना बसला आहे. इंधन दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता  25  रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे  घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने  सामान्यांचे एकंदरित महिन्याचे बजेट … Read more