काश्‍मिरातील हूडहूडी कायम

श्रीनगर- काश्‍मीर खोऱ्यातील थंडीचा कडाका अजून कायम आहे. शनिवारी खोऱ्यातील अनेक ठिकाणचा पारा शून्याच्या खाली गेला होता. हवामान खात्यातील नोंदीनुसार श्रीनगरचे आजचे तापमान उणे 7.2 अंश सेल्सियस इतके होते. तर काझीगंद येथील तापमान उणे 8.8 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. गुलमर्गचे तापमान उणे 10 अंश इतके होते. पहलगाम, कुपवाडा, कोकेर्नग, आदी ठिकाणचे तापमानही शून्याच्या … Read more

शोपियॉंमधील चकमकीत एक दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील चकमकीत सोमवारी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख तातडीने पटू शकली नाही. शोपियॉं जिल्ह्यात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा जवानांनी मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी जवान आणि दहशतवादी आमनेसामने येऊन दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश … Read more

स्फोटके बनवण्यात तरबेज असणारा तोयबाचा दहशतवादी ठार

    श्रीनगर-जम्मू-काश्मीररमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी नासीर नावाच्या खतरनाक दहशतवाद्याला ठार केले. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा सदस्य असणारा नासीर स्फोटके बनवण्यात तरबेज होता. दक्षिण काश्मीठरच्या अनंतनाग जिल्ह्यात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली. एका दहशतवाद्याचा ठावठिकाणा समजल्यानंतर सुरक्षा दलांनी संबंधित परिसराला वेढले. दहशतवाद्याला प्रथम शरण येण्याचे आवाहन करण्यात … Read more

लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घ्यालण्यात यश आले आहे. दुसरीकडे शोपिया येथे सचिवालयात तैनात असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. अबु रिहान आणि अदिल रशिद भट असे ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे नाव आहे. पोलीस … Read more

श्रीनगरमधील चकमकीत हिज्बुलच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर -काश्‍मीरच्या श्रीनगर शहरात मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये एका जहाल विभाजनवादी नेत्याच्या मुलाचाही समावेश आहे. मारले गेलेले दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य होते. श्रीनगरमध्ये एका ठिकाणी काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि स्थानिक पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी सोमवारी रात्री विशेष … Read more