श्रीगोंदा: खरेदी-विक्री संघावर राष्ट्रवादीचा झेंडा

श्रीगोंदा – येथील छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी सुभाष मच्छिंद्र काळाणे यांची तर उपाध्यक्षपदी शरद शंकर जमदाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, वर्षानुवर्षे स्व. शिवाजीराव नागवडे यांचे वर्चस्व राहिलेल्या संघावर आता माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. संघाच्या पदाधिकारी निवडीसाठी आज (दि.17) संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. … Read more

श्रीगोंद्याच्या “दादां’चा वाद पोहोचला बारामतीच्या दरबारात!

श्रीगोंदा – माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे या श्रीगोंद्याच्या दोन्ही “दादां’मधील राजकीय दरी प्रचंड वाढली असून त्यांच्यामध्ये आता उघड राजकीय संघर्ष पेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथील छत्रपती शिवाजी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतील पाडापाडीच्या तक्रारी थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या दरबारात मांडण्यात आल्या आहेत. संघाच्या निवडणुकीत नागवडे-जगताप गट … Read more

Sad News: शेततळ्यात बुडून चिमुकल्या भावंडांचा मृत्यू, मुलांचे मृतदेह पाहून आई-वडीलांनी फोडला हंबरडा

श्रीगोंदा – खेळताना घरासमोरील शेततळ्यात पडून आर्यन बंडोपंत साळुंखे (वय 9) आणि अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय 8) या दोन चिमुकल्या भावंडांचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्‍यातील लोणी व्यंकनाथ शिवारात आज दुपारी घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, बंडोपंत साळुंखे हे लोणी व्यंकनाथ शिवारातील खामकरवाडी येथे राहतात. बंडोपंत साळुंखे व त्यांच्या पत्नी हे दोघेही … Read more

Pune Crime: 50 लाखांच्या खंडणीसाठी तिघांचे अपहरण; काही तासांत श्रीगोंद्यातून आरोपी जेरबंद

पुणे – 50 लाखांच्या खंडणीसाठी मार्केटयार्ड येथून तिघांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही तासांत श्रीगोंदा येथून तिघांना ताब्यात घेतले. तर अपहरण झालेल्या व्यक्तींची सुटका करण्यात आली. प्रवीण शिर्के, विजय खराडे आणि विशाल मदने (रा. तिघेही नगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचे इतर साथीदार … Read more

आ. पाचपुतेंना पुतण्याकडून पुन्हा धोबीपछाड! ‘प्रभात’चे फोडाफोडीच्या राजकारणाचे भाकीत ठरले खरे

श्रीगोंदा – तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीत विरोधी गटाचा एक सदस्य गळाला लावत लोकनियुक्त सरपंच साजन पाचपुते यांनी चुलते आ. बबनराव पाचपुते यांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिली. तर पारगाव सुद्रीक येथेही विरोधी पाचपुते-नागवडे गटाचे तीन सदस्य फुटल्याने तिथे जगताप गटाचा उपसरपंच झाला. दरम्यान, उपसरपंच निवडीत फोडाफोडीचे राजकारण रंगण्याचे ‘प्रभात’ने वर्तवलेले भाकीत आज (दि.२९) खरे ठरले. … Read more

अंधारात दुचाकी ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून तीन तरूणांचा मृत्यू, गावावर शोककळा

श्रीगोंदा – अंधारात दुचाकी ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने तालुक्यातील काष्टी येथील तीन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 13) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दौंड-पाटस रस्त्यावर घडली. ऋषिकेश महादेव मोरे (वय 26), स्वप्निल सतीष मनुचार्य (वय 24), गणेश बापू शिंदे (वय 25, तिघे रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) या तीन युवकांचा मृत्यू झाला. मयत झालेले तीन तरुण … Read more

महिलेची ‘टुटू’ हम ले जायेंगे’ची भूमिका…अन् ‘टुटू’ पोलीस ठाण्यात हजर!

श्रीगोंदा – ‘टुटू हम ले जायेंगे’ म्हणत त्या हिंदीभाषिक महिलेने श्रीगोंद्यातच ठाण मांडले अन् आपल्या मालकिणीच्या विरहाने सैरभैर झालेला तो पर्शियन बोकाही शुक्रवारी(दि.१९) रात्री पोलीस ठाण्यात हजर झाला. एका हिंदीभाषिक महिलेचा ‘टुटू’ नावाचा बोका शुक्रवारी(दि.१९) दुपारी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारातून पसार झाला होता. चार तासांच्या शोधमोहिमेनंतरही तो सापडला नव्हता. ‘टुटू’च्या परतीच्या अपेक्षा सोडून त्या महिलेचे … Read more

‘नाशिक’चा बोका श्रीगोंद्याच्या ‘मांजरी’ला भाळला?

श्रीगोंदा (समीरण नागवडे) – एका महिलेसोबत नाशिकहून श्रीगोंद्यात आलेला पर्शियन ‘बोका’ श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारातून पसार झाला. या बोक्याच्या शोधार्थ पोलीसही चार तास राबले, मात्र त्या बोक्याचा शोध काही लागला नाही. येथील पोलिसांच्या लसीकरणासाठी एक चमू आज (दि.१९) नाशिकहून चारचाकीने श्रीगोंद्यात आला होता. त्या चमूतील एका महिलेने ‘टुटू’ नावाचा पर्शियन बोका आपल्या सोबत आणला होता. … Read more

श्रीगोंदा : पेट्रोल दरवाढीचा गांधीगिरी करत निषेध

श्रीगोंदा – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्यात युवक काँग्रेसच्या वतीने उपहासात्मक आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल व डीझेल दरवाढीविरोधात पेट्रोल पंपावर येणार्‍या ग्राहकांना गुलाब पुष्प देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वाबळे म्हणाले, देशात काँग्रेसचे सरकार असताना कच्चा पेट्रोलचा प्रतिबॅलर 100 ते 120 डॉलर भाव असताना दर … Read more

अहमदनगर: श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षांची खुर्ची धोक्‍यात !

राष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची तक्रार ः सोमवारी अर्जावर सुनावणी अर्शद शेख श्रीगोंदा – नगराध्यक्षा शुभांगी मनोहर पोटे व राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे गटनेते मनोहर पोटे यांना अपात्र ठरवावे, यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऍड. हृषीकेश गायकवाड, माजी नगरसेवक अख्तर शेख व सतीश बोरुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. यावर सोमवारी (दि. 7) … Read more