हरियाणात काही ठिकाणी हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा बंद

फरीदाबाद  – अग्निपथ योजनेच्या विरोधात हरियाणाच्या पलवलमध्ये झालेल्या तीव्र निदर्शनांतर फरीदाबाद जिल्ह्यातील बल्लभगढ भागात मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित करण्यात आली आहे. तेथे निदर्शकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अफवांचा प्रसार रोखण्यासाठी हरियाणा सरकारने गुरुवारी संध्याकाळी मोबाइल इंटरनेट सेवा आणि मोबाइल नेटवर्कवर प्रदान केल्या जाणाऱ्या सर्व डोंगल सेवा तात्पुरत्या … Read more

“पुन्हा सगळं बंद करण्यासाठी भाग पाडू नका”; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कडक इशारा

नवी दिल्ली : राज्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे   हे आपण सर्वच पाहात आहोत. त्यामुळे नियम पाळले पाहिजेत हे सर्वांनी समजून घ्यायला हवं. करोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झाला आहे. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून … Read more

वीकेंड लॉकडाऊन…अंबानी दाम्पत्याचा वॉक अन् दंडात्मक कारवाई

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू आणि उदयोगपती अनिल अंबानी हे पत्नी टिना अंबानींसहीत महाबळेश्वर येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मात्र लॉकडाउन असतानाही रविवारी सायंकाळी अंबानी दांपत्य आपल्या दोन्ही मुलांसहीत महाबळेश्वरमधील गोल्फ मैदानावर वॉकसाठी आले होते. त्यामुळेच पालिकेने या गोल्फ मैदानाची मालकी असणाऱ्या संस्थेला नोटीस बजावली आहे. तसेच दंडात्मक कारवाईचा इशारा … Read more

चक्‍क गूगल सेवा एवढ्या मिनिटे बंद : जग थांबले?

नवी दिल्ली – एक क्षणही इंटरनेटशिवाय आपण जगू शकत नाही अशी परिस्थिती सर्वत्र आहे. मात्र आज गूगलच्या सेवा काही काळ बंद होत्या. त्यामुळे संपूर्ण जग थांबले होते की काय, अशी परिस्थिती होती. कारण जगात साधारणतः जीमेलचे 180 कोटींपेक्षा अधिक यूजर्स असून यूट्यूबचेही 200 कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत. जगभरात गूगलच्या अनेक सेवा आज सायंकाळच्या सुमारास तब्बल … Read more

मराठा आरक्षणाला स्थगिती प्रकरण चिघळले ;सोलापूर बंदची हाक

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र मराठा संघटनांचे आंदोलन सुरुच आहे. अशातच आज मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात तर रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने निषेध … Read more

करोनाच्या धास्तीने कोपरगाव रात्रीपासून केले बंद

कोपरगाव (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील पाणीपुरी गाडी, बेकरी, पान टपरी, चहा स्टॉल, उपहारगृहे, ज्यूस सेंटर, नाश्‍ता सेंटर, मंगल कार्यालये व आठवडे बाजारासह इतर गर्दी होणारी सर्व कार्यालये हे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवावेत, असे आदेश मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिले आहे. तालुक्‍यातील सर्व सामुदायिक प्रार्थनास्थळे, छोटे उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार … Read more

…तर एअरइंडिया 6 महिन्यात बंद होणार?

नवी दिल्ली : आर्थिक संकटाचा सामना करत असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला जर खरेदीदार मिळाला नाही तर पुढील वर्षीच्या जूनपर्यंत ती बंद करावी लागण्याची शक्‍यता आहे. एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तुकड्या-तुकड्याने मिळालेल्या मदतीवर जास्त काळापर्यंत गाडी चालवली जाऊ शकत नाही, असेही या अधिकाऱ्याने म्हटले. एअर इंडियाच्या भविष्याबाबत वाढत चाललेल्या अनिश्‍चिततेदरम्यान … Read more

गुगल प्लस सेवेचा अलविदा

मुंबई – गुगल प्लसची सेवा 2 एप्रिलपासून बंद होणार आहे. गुगलकडून यावरील सर्व वापरकर्त्यांची माहिती 2 एप्रिलपासून काढण्यात येणार आहे. ही सेवा बंद करण्याची घोषणा गुगलने गेल्या वर्षी केली होती. त्यासाठी गुगलने फेब्रुवारी 2019 पासून गुगल प्लसचे विविध फिचर्स ऑफलाइन करण्यास सुरुवात केली होती. आता कंपनीकडून वापरकर्त्यांची माहिती नष्ट करण्यात येणार आहे. दरम्यान, इंटरनेट अर्काइव्ह … Read more