nagar | भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी ९५ कोटी निधीस मान्यतेची घोषणा

नगर, (प्रतिनिधी) – नगर शहराचा ५३४ वा स्थापना दिन. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रसिक ग्रुपच्या वतीने पंच शताब्दीचा वारसा लाभलेल्या शहराच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी एका संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन भुईकोट किल्ल्या जवळील आय लव्ह नगर गार्डन येथे केले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी शहरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या विकासासाठी ९५ … Read more

nagar | जिल्ह्यातील पाणी योजनांचा आराखडा तयार करणार

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काही योजना विद्यूत देयक थकीत यासह अन्य कारणामुळे बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम संबंधीत गावांना पाणी पुरवठा करण्यावर होत आहे. त्यामुळे टंचाई आणि निवडणूका संपल्यावर जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामुळे संबंधीत योजनांकडे काय अडचणी आहेत, या समोर येवून भविष्यात येणार्या अडचणी … Read more

nagar | निवडणूक प्रशिक्षणास ९१४ कर्मचार्यांनी फिरवली पाठ

नगर, (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यातील शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. या पहिल्या प्रशिक्षणाला दांडी मारणार्‍या ९१४ कर्मचार्‍यांना लोकप्रतिनिधींत्व अधिनियम १९५१ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रविवारी निवडणूक कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण … Read more

nagar | लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा

नगर (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, दिव्यांग व्यवस्थापक नोडल … Read more

नगर | जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

नगर, (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, तहसिलदार शरद घोरपडे, प्रा. चंद्रकांत जोशी, शिवव्याख्याते प्रा. सीताराम काकडे, शशिकांत नजान आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मराठी गौरव भाषा दिनानिमित्‍त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. … Read more

जिल्ह्यात 40 हजारांहून अधिकांची फसवणूक; जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जांचा ओघ सुरूच

  नगर – आकर्षक व्याजासह परतावा देणाऱ्या विविध कंपन्यांच्या अमिषाला बळी पडून अनेकांनी गुंतवणूक केली. मात्र केलेल्या गुंतवणूकीचा परतावा तर सोडाच पण मुद्दल देखील मिळणे अवघड झाले आहे. अशा फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील 40 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांचे अर्ज सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. बडस्‌ क्‍ट-2019 अन्वये (द बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम बिल- 2019) हे अर्ज … Read more

नगर शहरातील मिरवणूक मार्गात होणार बदल; 30 जूनपर्यंत हरकती मागविल्या

नगर – नगर शहरात भविष्यकालीन मिरवणुकांसाठी प्रशासकीय सोईच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – इंपिरियल चौक – माळीवाडा वेस – आयुर्वेद कॉर्नर – अमरधाम समोरून- नेप्तीनाका- दिल्लीगेट असा मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून या मार्गाच्या निश्‍चितीसाठी सूचना अथवा हरकत मागविण्यात आला आहेत. येत्या 30 जूनपर्यंत लेखी स्वरूपात गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे समक्ष सादर करण्याचे आवाहन … Read more

आवर्तनापासून अनेक गावे वंचित राहणार, पाण्याचे योग्य नियोजन करा; आ. रोहित पवार यांची मागणी

कर्जत/ जामखेड – उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कुकडी आणि सीना कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करा, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही भरले जातील आणि आवर्तनाचा कालावधी वाढविण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना भेटून पत्र दिले … Read more

वाळूचा पहिला डेपो नगर जिल्ह्यात; 1 मेपासून 600 रुपयांत घरपोच वाळू

नगर – अवैध वाळू उपसा व यातून वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्याबरोबरच नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी, यासाठी तेलंगण राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने वाळूचे नवीन धोरण आणले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आघाडी घेतली आहे. राज्यात पहिले वाळू गट आणि डेपो सर्वात प्रथम मंजूर झाले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय वाळूचे नियंत्रण समितीने नऊ वाळू … Read more