लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्त्वाची बातमी; ‘नोवोव्हॅक्‍स’ला क्‍लिनिकल चाचणीस मिळाली परवानगी

नवी दिल्ली – देशभरात 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लसीकरण सुरू होणार आहे. त्याआधीच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण वृत्त समोर आले आहे. लहान मुलांना आता सीरमची इन्स्टिट्यूटची नोवोव्हॅक्‍स लसही दिली जाणार आहे. भारतात या लसीच्या क्‍लिनिकल चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. सध्या देशात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सिन लशीला लहान मुलांवर चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. … Read more

झेड प्लस सुरक्षेसाठी आदर पूनावाला यांची याचिका?

मुंबई, दि. 6- कोविशिल्ड या करोना लसीचे उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरविली जावी यासाठी मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे. पूनावाला सध्या ब्रिटन मध्ये आहेत आणि तेथून लवकर भारतात परतण्याची शक्‍यता नाही असे समजते. एका वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट व सरकार नियमन … Read more

Updated News : करोना लस बनविणाऱ्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला भीषण आग; दोन तासाच्या प्रयत्नानंतरही आग नियंत्रणाबाहेर

पुणे –  मांजरी बुद्रुक येथील सिरम इन्स्टिट्युट कंपनीला मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने एक तास झाली तरी आग आटोक्यात येत नाही. बीसीजी लस बनवण्याच्या युनिटला आग लागली असून  करोना लस सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. मध्ये एक मोठा ब्लास्ट ही झाला … Read more

Breaking News : पुण्यातील करोना लस बनविणाऱ्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला आग

पुणे – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. बीसीजी लस बनवण्याच्या युनिटला आग लागली असून अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मांजरीच्या साईडला असणाऱ्या सिरमच्या नवीन इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे समजते. आग कशी लागली हे अद्याप समजलेले नाही. करोना लस सुरक्षित असल्याची माहिती समोर … Read more

करोना लसीबाबत झाला मोठा करार; भारत बांगलादेशला देणार 3 कोटी डोस

नवी दिल्ली – करोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी शेजारी बांगलादेशला भारत तीन कोटी डोस देणार आहे. भारत, बांगलादेश, सीरम इन्स्टिट्यूट आणि बेक्‍सिम्को फर्मास्युटिकल्स यांच्यात याबाबत समझोता करार करण्यात आला. ऍस्ट्राझिंका लसीचे तीन कोटी डोस खरेदी करण्यासाठी बांगलदेशने सीरमसोबत गुरुवारी करार केला होता. करोनाविरोधातील युद्धात सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच … Read more

कोरोना विषाणूवर लस कधी येणार? आदर पुनावाला म्हणतात…

पुणे – चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना विषाणूने आता संपूर्ण जगाला ग्रासले आहे. अतिशय संसर्गजन्य असलेल्या या कोव्हीड – १९ महासाथीची बाधा जगाच्या पाठीवरील १ कोटीहून अधिक लोकांना झाली असून यामुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या या कोरोना विषाणूवर कधी एकदाची लस येते आणि आपण पुन्हा एकदा स्वछंदी जीवन जगू … Read more