कोल्हापूर | पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून सोशल डिस्टसिंगचा फज्जा

कोल्हापूर – केंद्रातील भाजप सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली. मात्र गेल्या सात वर्षात केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक वस्तूची दरवाढ करून आणि शेतकरी तसंच कामगार विरोधी कायदे करून सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याच काम केलं. या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतींन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दारात जोरदार निदर्शन करण्यात आली. केंद्रातील … Read more

Video : करोनामुळं नवरदेव-नवरीने काठीच्या सहाय्याने घातल्या वरमाला

मुंबई :  देशात करोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम, विवाह-सोहळे यावर बंधन आली आहेत. त्यातच लग्नसोहळे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक नियम त्यासाठी लागू करण्यात आले आहेत. या नियमांचं पालन करणारा एक लग्नसोहळा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या लग्नात नवरदेव-नवरीने काठीच्या सहाय्याने एकमेकांना वरमाला घातल्या. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर … Read more

खरेदीसाठी वाट्टेल ते..! मार्केट यार्डसह सर्वच बाजारपेठा फुल

पुणे – पुण्यासह राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. यामुळे नागरिकांनी बुधवारी सकाळपासून मार्केट यार्डमध्ये फळ, भाजीपाला आणि भुसार बाजारात किराणा खरेदीसाठी गर्दी केली होती, तर शहरातील विविध पेठा, उपनगरांतही जवळपास सर्वच पुणेकर जणू बाजारात आले की काय, असेच दृश्‍य होते. त्यामुळे करोना प्रतिबंधक नियम आपोआपच पायदळी तुडवले गेले. आजपासून पुढील 16 दिवस संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना … Read more

काही सांगायला गेले की, उच्चशिक्षित कायदा शिकवतात…

वीकेंड लॉकडाऊनवेळी निर्दशानातून पोलीस यंत्रणेची प्रतिक्रिया सहकारनगर – करोना बाधित रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाकडून निर्बंध लादले जात आहे. परंतु, उच्चशिक्षित नागरिकच पळवाट काढून घराबाहेर पडत असल्याचे वीकेंड लॉकडाऊन मधील नोंदी तसेच गुढीपाडव्या निमित्त बाहेर पडलेल्या गर्दीवरून निदर्शनास आले आहे. जे लोक नियम पाळत आहेत त्यांच्या जीवाला अशा लोकांकडून धोका संभवत असल्याने असे लोक पोलिसांसाठीही डोकेदुखी … Read more

‘सोशल डिस्टन्स’ला हरताळ खासगी कंपनीला 87 हजारांचा दंड

महापालिकेची कारवाई पुणे – जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी येथील एका खासगी ऑफिसमध्ये तब्बल 87 कर्मचारी “सोशल डिस्टन्स’ न ठेवता कामावर असल्याने महापालिकेच्या घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून या कंपनीकडून तब्बल 87 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच पुन्हा नियमभंग झाल्याचे आढळल्यास कंपनी सील करण्याचा इशारा दिला आहे. वाकडेवाडी येथील अत्यावश्‍यक सेवां अंतर्गत परवानगी दिलेल्या … Read more

नियमभंग करणाऱ्या मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्सवर कारवाईची मागणी

पुणे – सोशल डिस्टनचा फज्जा उडवणाऱ्या व नियमांचे पायमल्ली करणाऱ्या पुण्यातील मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्स् , या ठिकाणी कॉविड 19 च्या काळात लग्न समारंभासाठी 50 लोकांची परवानगी असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे. तरी पोलीस आयुक्त पुणे शहर व आयुक्त पुणे महानगरपालिकाने लक्ष घालावे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आरोग्य बाबत खबरदारी घेतली … Read more

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कार्यालयीन कामकाज सुरु

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले आहे. तरीही ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.  शासकीय वस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व … Read more

बिहार निवडणुकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पाटणा – करोनाव्हायरसच्या साथीचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होण्याचा इशारा केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेला असताना बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचारसभांदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजद आणि जदयुच्या नेत्यांच्या मोठ्या सभा पार पडत आहेत. लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही सुपुत्र निवडणुकीत मोठं यश मिळविण्याच्या दृष्टीने प्रचार सभांचं आयोजन … Read more

राजकीय पक्षांनी.., खुंटीला टांगले सुरक्षा नियम

सोशल डिस्टन्सिंगचा उडला आंदोलनांवेळी पुरता फज्जा पुणे – हाथरसपासून ते मंदिरे खुली करा…, अशा सर्वच विषयांवर शहरात विविध ठिकाणी सगळ्याचे राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात असताना करोना नियमांतर्गत सुरक्षिततेचे नियम नेतेमंडळींनी राजकीय खुंटीला अडकवून ठेवले होते. सर्वच ठिकाणी सुरक्षेच्या नियमांची “ऐशी तैशी’ करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. “सामाजिक अंतर म्हणजे काय रे भाऊ’, असे विचारण्याचीच वेळ … Read more

इचलकरंजी पाणी योजनेला कोल्हापूर जिल्ह्यात कडाडून विरोध ; बिद्री पुलावर 4 तास रास्ता रोको

कोल्हापूर : दुधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्यास आता विरोध वाढतोय. कागल तालुक्यातील बिद्री या ठिकाणी नदीकाठावरील नागरिकांनी सुमारे 4 तास रास्ता रोखून धरला. इचलकरंजीला पाणी देण्यावरून नवा वाद निर्माण झाला असून या आंदोलनात कागल ,राधानगरी, करवीर आणि भुदरगड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला. इचलकरंजीला पाणी देण्यावरून … Read more