उत्साह, कुतूहल आणि रुढींचे पालन

पुणेकरांनी घेतला सूर्यग्रहणाचा अनुभव : शहरात पाहण्यास मिळाले ग्रहणाचे खंडग्रास स्वरूप पुणे – शहरातून दिसणारे सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. अनेकांनी आपल्या घराच्या गच्चीवरून, मोकळ्या जागेतून सूर्यग्रहण पाहिले. त्याचबरोबर विविध संस्थांतर्फे आयोजित ऑनलाइन प्रक्षेपणाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रहण काळात अनेकांनी घराबाहेर न पडण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे ग्रहण सुरू झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर बरीच … Read more

ढगाळ हवामानामुळे खगोलप्रेमींच्या आनंदाला ग्रहण

नवी दिल्ली – वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आलेल्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचे निरीक्षण करण्याचा खगोलप्रेमींच्या उत्साहाला ढगाळ हवामामुळे ग्रहण लागले. राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्येच कंकणाकृती सूर्यग्रहण दिसू शकले. तर देशाच्या उर्वरित भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसले. खंडग्रास सूर्यग्रहणाची सुरुवात सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी झाली आणि दुपारी 3 वाजून 4 सेकंदांनी ग्रहण सुटले. ज्या भागांमध्ये कंकणाकृती … Read more

सांगलीत गर्भवतीकडून ग्रहणातील अंधश्रद्धांना मुठमाती

सांगली – जिल्ह्यातील इस्लामपुरात एका गर्भवती महिलेने ग्रहणाच्या काळातील अंधश्रद्धांना मुठमाती दिली आहे. या महिलेने ग्रहण काळात भाजी चिरणे, फळे कापणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह अनेक शारीरिक हालचाली केल्या. तसेच प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून ग्रहणाचाही आनंद घेतला. समृद्धी जाधव असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी ग्रहणाच्या काळात अंधश्रद्धेतून निषिद्ध ठरवलेल्या … Read more

ग्रहणाच्या काळात भाजीपाला सुरीने चिरत गर्भवतीने झुगारल्या विविध अंधश्रद्धा

इस्लामपूर : महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नाने इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला सौ. समृद्धी चंदन जाधव या तरुणीने आज पिढ्यान पिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर केल्या. ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे फळे कापणे, झाडांची फळे पाने तोडणे, अन्न खाणे,पाणी पिणे,हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत … Read more

‘कंकणाकृती सूर्य’दर्शनाला ढगांचे ‘ग्रहण’?

खगोलशास्त्रातील अद्‌भूत घटनेला पुणेकरांना मुकावे लागण्याची चिन्हे पुणे – भारतात येत्या रविवारी (दि.21) कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून, सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रातील अद्‌भूत घटना असून, खगोलप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र, यावेळी ढगाळ वातावरणामुळे कदाचित हे ग्रहण पाहण्यास अडचणी येऊ शकतील, असा अंदाज खगोल शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. हे ग्रहण सुरक्षा साधनांचा उपयोग करून पाहता येईल. सूर्यग्रहण म्हणजे … Read more

महापालिकेलाही उपस्थितीचे “ग्रहण’

ग्रहण संपल्यानंतरच अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती पुणे – बुधवारी असलेल्या सूर्यग्रहणामुळे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती रोडावल्याची बाब समोर आली. हे ग्रहण 11 वाजता संपल्यानंतर अनेक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर घरून आंघोळ करून आल्यानंतरच महापालिकेची पायरी चढणे पसंत केले. त्यामुळे एरवी गजबलेली महापालिका दुपारी 12 पर्यंत ओस पडल्याने अधिकारी आणि कर्मचारीही गायब असल्याने … Read more

साताऱ्यात सूर्यग्रहण दर्शनाला ढगाळ हवामानाचा अडथळा

सातारा – या वर्षाच्या अखेरचे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची सातारकरांची इच्छा ढगाळ वातावरणामुळे पूर्ण झाली नाही. सकाळी 9 ते 11 या वेळेत झालेल्या सूर्यग्रहणाचा खगोलीय आविष्कार ढगांच्या आड लपल्याने सर्वांचा हिरमोड झाला. या कंकणाकृती सूर्यग्रहणाची सातारकरांना, विशेषतः युवा वर्गाला उत्सुकता होती. ग्रहण पाहण्यासाठी थ्रीडी गॉगलची व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, पश्‍चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार … Read more

सूर्यग्रहणानंतर मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया 

नवी दिल्ली –  खगोलीय अविष्कार कंकणाकृती सूर्यग्रहण आज झालं. भारतासह जगभरात अनेक ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसलं. खगोलप्रेमींसह सर्वांनीच हे विलोभनीय दृश्य पाहिलं. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे हे सूर्यग्रहण दिसू शकलं नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सूर्यग्रहण पाहिलं. मात्र ढगांमुळे सूर्य दिसला नाही असं ट्विट मोदींनी केलं आहे. Like many Indians, I was enthusiastic about #solareclipse2019. … Read more

#LIVE : कंकणाकृती सूर्यग्रहणाचा विलोभनीय नजारा

पुणे – मार्गशीर्ष दर्श अमावस्या म्हणजेच 26 डिसेंबर 2019 तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजेच 2010 सालानंतर कंकणाकृति सूर्यग्रहणाचा अविष्कार नभांगणात दिसत आहे. आज सकाळी 8 ते 11.30 या वेळेत हे ग्रहण दिसणार आहे. सूर्योदयाच्या वेळेस हे ग्रहण सौदी अरेबिया मध्ये सुरू होत असून तिथून चंद्राची सावली पृथ्वीवर पडण्यास सुरूवात झाली. ही सावली सकाळी 8 च्या सुमारास … Read more

सूर्यग्रहण पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी; ढगाळ वातावरणामुळे निराशा

पुणे – सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यात नियमितपणे होणाऱ्या प्रकाश आणि सावलीच्या लपंडावामुळे 2019 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज दिसणार होते. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांची निराशा झाली आहे. यामुळे निसर्गाच्या अद्‌भुत घटनेचा आनंद घेण्याची पुणेकरांची संधी हुकली. “नवनिर्मिती लर्निग फाउंडेशन’ने गुरुवारी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी “सूर्यग्रहणासोबत चहापान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त सकाळी 8 … Read more