हृदयद्रावक! सांभाळ करू शकत नाही म्हणत जन्मदात्या आईनेच ९ महिन्याच्या चिमुकलीला फक्त ८०० रुपयात विकले

भुवनेश्‍वर : घरात मुलीचा जन्म झाला म्हणजे घरात लक्ष्मी आल्याचे म्हटले जाते. घरात मुलगी येण्याने आनंदाचे वातावरण असते पण  ओडिशामध्ये एक  हृदयद्रावक घटना घडली आहे, आपल्या लेकीचा सांभाळ करू शकत नाही म्हणत जन्मदात्या आईनेच ९ महिन्याच्या चिमुकलीला  फक्त ८०० रुपयात विकल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. ओडिशामधील मयूरभंज जिल्ह्यातल्या माहुलिया गावातील या महिलेने आपली मुलगी बिपारचरणपूर … Read more

मॅराडोनाच्या ‘त्या’ जर्सीला मिळाली तब्बल ‘इतक्या’ कोटींची किंमत

लंडन – जागतिक फुटबॉलमध्ये 1986 साली इंग्लंडविरुद्धच्या झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा महान खेळाडू दिएगो मॅराडोना याने वापरलेली जर्सी विक्रमी किमतीत विक्री झाली. हॅंड ऑफ गॉड अशा नावाने विख्यात असलेल्या या जर्सीला तब्बल 7.1 मिलियन पाऊंड (जवळपास 68 कोटी रुपये) मिळाले. क्रीडा विश्‍वात जर्सीच्या लिलावात सर्वाधिक रक्कम मिळवण्याचा विक्रम मॅराडोना यांच्या या जर्सीने केला … Read more

क्रिकफ्लिक्‍सद्वारे 1983 सालच्या विश्‍वकरंडकाचा लिलाव

मुंबई -भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारताने 1983 साली एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपद जिंकले होते. याच विजेतेपदाच्या डीजीटल स्वरुपातील चषकाचा नुकताच लिलाव करण्यात आला. त्याला तब्बल 82 लाख रुपयांत खरेदी केले गेले. ऑगमेंटेड रिऍलिटी क्रिकेट एनएफटी प्लॅटफॉर्म क्रिकफ्लिक्‍सचा एका सोहळ्यात शुभारंभ झाला. याच सोहळ्यात विविध ऐतिहासिक क्षणांचे पुरस्कार, सन्मानचिन्हे, चषक व बक्षिसांचा डीजीटल … Read more

मोफत धान्य घेणाऱ्यांची “अशी हि बनवाबनवी”; सरकारलाच पुन्हा विकले तब्बल २०० कोटींचे रेशन

लखनऊ:   देशात मागील २ वर्षांपासून करोनाने धुमाकूळ घातला आहे.  पहिल्या वर्षी तर पूर्णपणे अर्थव्यवस्थाच कोलमडून गेली होती. त्यातच केंद्र सरकारने सर्वसामान्यांना  दिलासा दिला होता. सरकारकडून गरिबांना मोफत धान्य दिले जाते. करोनामुळे अनेक कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर कोसळल्यानंतर केंद्र सरकारने मोफत धान्य वाटपाची व्याप्ती वाढवली  मात्र, मोफत धान्य घेणाऱ्यांकडून आता सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असल्याची धक्कादायक … Read more

‘त्यांनी’ आमचे हात पाठीमागे बांधून ठेवून देश विकला”; अफगाणिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप

काबुल : अफगाणिस्तानवर  तालिबान बंडखोरांनी पूर्णपणे कब्जा केला आहे.  त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सत्ता हस्तांतराबाबत चर्चा करण्यासाठी तालिबानचे मध्यस्थ रविवारी अध्यक्षीय राजवाड्यात पोहोचले. सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला वाटाघाटी करणार आहेत. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी आपण देश का … Read more

बोगस बियाणे विक्री केल्यास शासन कठोर पावले उचलणार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबधित कंपन्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या रब्बी हंगामात एका कंपनीमार्फत सप्टेंबर, 2020 कालावधीत सुमारे 8 टन कांदा बियाणे खरेदी केले … Read more

काल दिवसभरात ‘इतक्या’ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती मुंबई  : राज्यात १५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल (१६ सप्टेंबर २०२०) दिवसभरात ४ हजार १५३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ३ हजार ८५८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क … Read more

अरेरे! जेट एअरवेजची काय ही अवस्था; टॉवेल-ट्रॉली आणि कपबशांचा लिलाव

एक काळ असा होती की, जेट एअरवेज कंपनी विमानातील पहिल्या वर्गातील प्रवाशांना रोझेनथाल क्रोकरी आणि विल्यम एडवर्ड सिरॅमिक वेअर या सुप्रसिद्ध ब्रँडच्या प्लेट आणि कपबशांमधून चहा-कॉफी आणि खाद्यपदार्थ देत असे. आता दिवाळखोरीत निघालेल्या या कंपनीच्या विमानतील क्रोकरी आणि कटलरी तसेच टॉवेल-ट्रॉली आणि अशाच अनेक गोष्टींचा लिलाव केला जात आहे.  नेदरलँडमधील एच. एस्सेर फायनान्स कंपनी आणि … Read more

राज्यात १५ मे पासून आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई :- 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 10 जुलै 2020 या काळात 31 लाख 55 हजार 813 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 28 हजार 683 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. घाऊक … Read more

रेशन धान्य दुकानात गरिबांसाठी आलेला माल खुल्या बाजारात विक्रीला

पावणे तीन लाखांचा माल ताब्यात… सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : सरकारी स्वस्त धान्य दुकानात गरिबांसाठी आलेला माल खुल्या बाजारात विक्रीला घेवून जाणारा टेम्पो बारामती-निरा मार्गावर होळ(ता. बारामती) येथे पकडण्यात आला. या टेम्पोसह २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकट काळात गरिबांच्या तोंडचा घास पळवुन नेत असल्याचा प्रकार जिल्ह्यातील बारामती तालुक्यात … Read more