सातारा | माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, (प्रतिनिधी) – माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्डाच्या माजी सैनिक वेलफेअर फंडातून आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकार्‍यांनी केले आहे. मदतीचा प्रकार – चरितार्थासाठी आर्थिक मदत – अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more

सैनिकाच्या सर्व्हिस रायफलमधून अपघाती गोळीबार

बांदीपोरा  – जम्मू-काश्‍मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात, लष्कराच्या एका जवानाच्या सर्व्हिस रायफलमधून चुकून गोळीबार झाला. यामुळे एक जवान शहीद झाला, तर दुसरा जखमी झाला. या प्रकरणाची माहिती बांदीपोरा जिल्हा पोलिसांनी दिली. अधिक माहितीनुसार, हे प्रकरण 14 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पशी संबंधित आहे. रविवारी कॅम्पमध्ये एका सैनिकाची रायफल चुकून जमिनीवर पडली. त्यामुळे रायफलमधून गोळीबार झाला. यात दोन जवानांना गोळ्या … Read more

Breaking News : पुलवामा कॅम्पमध्ये जवानाची आत्महत्त्या

पुलवामा – जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कॅम्पमध्ये सीआरपीएफचा एक जवान मृतावस्थेत आढळून आला आहे. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे समजते. दक्षिण काश्‍मीर जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील चुरसू येथे पहाटे 4 वाजताच्या सुमारास कॉन्स्टेबल अजय कुमार मृतावस्थेत आढळून आला. त्यापूर्वी गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या जवानाने आत्महत्या केली असावी, असा तपास पथकाचा अंदाज आहे. पोलिसांनी … Read more

पुणे : सैनिकाला मिळाले नवे हृदय ; नागपूर येथून ग्रीन कॉरिडॉरने आणले पुण्यात

पुणे विभागातीलसहावे हृदयरोपण पुणे – पुण्याच्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) मध्ये दाखल झालेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याला नागपूरमधील एका 31 वर्षीय मेंदूमृत महिलेचे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. बुधवारी हे हृदय विमानाने पुण्यात आणण्यात आले. हवाईदलातील 39 वर्षीय जवान हा चार महिन्यांपासून हृदयाच्या आजाराने “एआयसीटीएस’ दाखल होता. नागपूरहून या महिलेचे हृदय “आयएएफ एएन-32′ या विमानातून … Read more

जम्मू-काश्मीर: मुसळधार पावसामुळे नदीला पूर; प्रवाह ओलांडताना दोन जवान गेले वाहून

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे इथल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू-कश्मीरमधील पुंछमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचा प्रवाह ओलांडताना भारतीय लष्कराचे दोन जवान वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये पेट्रोलिंग दरम्यान ओसंडून वाहणारी नदी पार करण्याच्या प्रयत्नात नायब सुभेदारसह दोन जवान वाहून … Read more

करंदोशी येथील जवानाचा कर्तव्य बजावताना मृत्यू

कुडाळ, दि. 14 (प्रतिनिधी) -जावळी तालुक्‍यातील करंदोशी गावचे जवान तेजस लहूराज मानकर (वय 22) यांना पंजाबमधील भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावत असताना डोक्‍याला गोळी लागली होती. त्याला उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. या उमद्या जवानाच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यासह संपूर्ण जावळी तालुक्‍यावर शोककळा पसरली. तेजस यांना गोळी कशी लागली … Read more

वडिलांच्या निधनानंतर पुन्हा सेवेवर परतत असताना जवानाचा अपघातात मृत्यू

सातारा – नागेवाडी (भाडळे) येथील अंकुश संपतराव माकर या जवानाचे अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांचे निधन झाल्याने अंकुश हे आठ दिवसांची सुट्टी घेऊन घरी आले होते. मात्र सुट्टी संपल्यानंतर ते सेवेवर रुजू होण्यासाठी निघाले होते. मात्र  बुधवारी राजस्थानमध्ये रेल्वे अपघातात त्यांचे निधन झाले. जम्मूतील कालचुक या सैन्य दलाच्या मुख्यालयात आपल्या सेवेवर हजर … Read more

देशात तीन वर्षांत 436 जवानांची आत्महत्या

नवी दिल्ली, दि.15- देशाचा सैनिक हा आपल्या सर्वांसाठी आपल्या आत्मसन्मानाचा, आत्मियतेचा विषय आहे. एखादा सैनिक सिमेवर देशाचे रक्षण करताना शहिद झाल्यानंतर त्याच्या बलिदानाबद्दल देशभरात हळहळ व्यक्त होत असते. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत देशभरातील तब्बल 436 सैनिकांनी आत्महत्या करत आपला जीव दिला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने धक्कादायक आकडेवारी सादर … Read more

प्रॅक्टिस करताना घोड्याची धडक बसून पुणे जिल्ह्यातील जवानाला वीरमरण

पुणे – ग्वाल्हेर येथे स्पर्धेसाठी गेले असता प्रॅक्टिस करताना घोड्याची धडक बसून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवानाला वीरमरण आले आहे. सुधीर पंढरीनाथ थोरात (वय 32) असे अपघातात मृत्यू पावलेल्या जवानाचे नाव आहे. थोरात हे भारतीय सैन्यात सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत होते. रविवारी (दि. 13) घोड्याने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (दि. … Read more

सैनिक होण्याचे स्वप्न अधुरे राहिले; भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद – केंद्र सरकारच्या अग्नीवीर सैन्य भरतीच्या 1600 मीटर धावण्याच्या चाचणी दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नामदेव पवार (वय 20, विठ्ठलवाडी, ता. कन्नड) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. औरंगाबाद येथे अग्निपथ योजनेसाठी अग्निवीरांची भरती सुरु आहे. याभरतीसाठी नामदेव औरंगाबाद येथे आला होता. कन्नड तालुक्यातील नामदेव पवार 1600 मीटर धावण्याची चाचणी देत … Read more