nagar | सोनईमध्ये दोन गटांत हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल

सोनई, (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दोन गटांत हाणामारी होऊन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दि. २ जून रोजी नर्मदा विष्णू तागड (वय ५५ रा. सोनई धनगरगल्ली) यांचे गावातील दुकानात दुपारी १ वाजता आरोपी सागर अरुण खोसे, अरुण माधव खोसे, लताबाई अरुण खोसे, सुरेखा सागर खोसे (सर्व रा. मुळा कारखाना) … Read more

nagar | मुळाथडी गावातून वाळूची वाहतूक सुरू

सोनई, (वार्ताहर)- मुळा नदीच्या परिसरातून खेडले परमानंद, करजगाव, पानेगाव, निंभारी आदी गावांच्या भागातून छोट्या वाहनांद्वारे वाळूची वाहतूक सुरू आहे. मुळा नदीकाठच्या गावात वाळू उचलण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने वाळूबंदी असताना चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू असल्याने याला कोणाचा छुपा आशीर्वाद आहे, हे सांगण्याची गरज नाही. रात्रीच्या वेळी या वाहनातून वाळूची वाहतूक केली जात असल्याने रस्त्याच्या परिसरातील नागरिकांची … Read more

nagar | खेडले परमानंद जलजीवन योजनेचे काम रखडले

सोनई, (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील जलजीवन योजनेचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजले आहेत. जलजीवन योजनेची पाण्याची टाकी ग्रामस्थांच्या मागणीनुसार 200 मीटर बदलण्यात आलेली आहे.त्यासंदर्भातली आवश्यक ती कागदपत्रे वेळोवेळी देऊनही अधिकारी पुन्हा पुन्हा कागदपत्र मागत आहेत. संबंधित कागदपत्राच्या पीडीएफ सर्व अभियंत्यांना पाठवलेल्या असतानाही काम मात्र रखडलेले आहे. योजनेचे अभियंते रमेश आंबेडकर,धगधगे व … Read more

nagar | राहुरी-घोडेगाव- शिंगणापूर एसटी बस बंद

सोनई (वार्ताहर) – राज्य परिवहन महामंडळाच्या नेवासा आगाराने नेवासा-राहुरी व घोडेगाव चालणाऱ्या बसेस बंद केल्याने राहुरी-सोनई-घोडेगाव येथे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून तातडीने या बसेस सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. या बस बंद करण्यामागे नेमके कारण काय आहे हे जाणण्याची उत्सुकता सर्वसामान्य प्रवासी वर्गाला लागली आहे. या मार्गावर जगप्रसिद्ध असे शनिशिंगणापूरचे देवस्थान असल्याने … Read more

nagar | श्री रामनवमी ते हनुमान जन्मोत्सवनिमित्त सप्ताह व यात्रोत्सव

सोनई (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे श्रीराम नवमी ते हनुमान जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ ते २३ एप्रिल या कालावधीत प्रथम दिनी ज्ञानेश्वर महाराज जोशी व रामेश्वर महाराज राऊत (शास्री) यांचेहस्ते ध्वजारोहण व पंढरीनाथ महाराज तांदळे यांचेहस्ते दिप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात होईल. हरिनाम सप्ताहामध्ये १६ … Read more

nagar | अवैधरित्या गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष

सोनई, (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील चांदा, लोहारवाडी व परिसरातून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस गौण खनिजाची ट्रॅक्टर व डंपरच्या सहाय्याने वाहतूक सुरू आहे. भरलेले डंपर व ट्रॅक्टरमुळे परिसरातील रस्ते खराब होत आहेत.ट्रॅक्टर व डंपर चालकांना याबाबत विचारणा केली असता शेतीच्या लेव्हलिंग करता हा मुरुम वापरला जात आहे,असे सांगितले जाते. रात्रंदिवस ट्रॅक्टर, डंपरच्या … Read more

nagar | विजेच्या तारा तुटून अनर्थ होता होता टळला

सोनई, (वार्ताहर )- महावितरणचा प्रवाह सुरू असलेल्या वीजवाहक तारा दि. 4 रोजी सकाळी 8 च्या सुमारास कावळ्याचा जथा बसल्याने दोन तारांचा स्पर्किंग होऊन रस्त्यावरच पडल्या. मोठी रहदारी असलेल्या राहुरी- शनिशिंगणापूर रोडवरील बसस्थानकासमोर हा प्रकार घडला. तेथे उपस्थित असलेले भूषण खंडागळे, भाऊराव चांदघोडे, बापू गवळी यांनी प्रसंगावधान दाखवून तारेच्या आजूबाजूला उभे राहून वाहतूक रोखली, अन्यथा मोठी … Read more

nagar | माका येथे ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू

सोनई (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील माका येथे ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दि. २६ मार्चच्या सकाळी १० वाजेच्या सुमारास कार्तिकी गोकुळ भताणे (वय १२) ही पांढरीपूल ते शेवगाव रोडवरून शाळा सुटल्यावर सायकलवरून घराकडे जात असताना ट्रक ( १४ ई एम ७९२७) ने मागील बाजूने जोराची धडक दिल्याने यात ती गंभीर जखमी होऊन … Read more

nagar | सोनई पोलिसांकडून 40 दुचाकीवर कारवाई

सोनई, (वार्ताहर) – सोनई पोलीस ठाण्याकडून सध्या विनानंबर प्लेट, कागदपत्रांची तपासणी, परवाना, ट्रिपल सीट अशा दुचाकीस्वारावर वाहतूक कर्मचाऱ्यांकडून कारवाई सुरू आहे. सोन‌ई कॉलेज रोड परिसर, घोडेगाव रोड आणि चांद्यामध्ये कारवाई करत 40 दुचाकी स्वारावर केसेस करून त्यांच्याकडून वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात विशेष करून कॉलेजमधील युवकांचा समावेश आहे. कॉलेजमधील युवक ट्रिपल सीट … Read more