पाटण तालुक्‍यातील 64 ग्रामपंचायतींना विशेष पॅकेज

कोयनानगर – राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 90 पैकी तब्बल 64 ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद सत्ता मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून चोख उत्तर दिले, हे खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या राजकीय उठावाच्या भूमिकेला लोकमान्यता मिळून राजमान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्री शंभूराज यांच्या या देदिप्यमान कामगिरीसाठी पाटण मतदारसंघातील … Read more

…त्यांना कर्ज नव्हे; मदतीच्या विशेष पॅकेजची गरज-प्रियांका गांधी

नवी दिल्ली, दि.27 -फेरीवाले-पथारीवाले आणि छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज नव्हे; तर मदतीच्या विशेष पॅकेजची गरज आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारला लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातील फेरीवाल्यांशी व्हर्च्युअल संवाद साधला. त्याआधी ट्‌विट करून प्रियांका यांनी भूमिका मांडली. लॉकडाऊनच्या काळात फेरीवाले-पथारीवाले आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. उपजीविकेचे साधन … Read more

वाहन क्षेत्राला विशेष पॅकेज द्या!

मंदीत अडकलेल्या कंपन्यांची सरकारकडे मागणी नवी दिल्ली – राष्ट्रीय उत्पन्नात मोठे योगदान देणारा आणि रोजगार निर्मिती करणारा वाहन उद्योग मंदीत अडकला आहे. याकरिता या वाहन क्षेत्राला विशेष पॅकेज देण्याची मागणी या क्षेत्रातील कंपन्यांकडून होऊ लागली आहे. गेल्या वर्षी या क्षेत्राचा महसूल कमी झाला होता. या वर्षी वाहन क्षेत्राचा विकासदर उणे होण्याची शक्‍यता गृहीत धरण्यात येत … Read more

कोकणसाठी स्पेशल पॅकेज! शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

मुंबई- दोन दिवसीय कोकण दौऱ्यानंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत पवारांनी कोकणातील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा लेखाजोखा मांडत कोकणाला पुन्हा उभे करण्यासाठीचा ऍक्‍शन प्लॅनच मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे. तसेच कोकणातील फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी या भेटीत … Read more

स्थलांतरीत मजुरांसाठी मनरेगाच्या माध्यमातून काम ; ४० हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली :  देशभरातून लाखो मजुरांनी घराकडे स्थलांतर सुरू केले  आहे. या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने  विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. त्याचबरोबर या मजुरांना जेवणाची व्यवस्था केली जात असून, घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या रोजगारांसाठी केंद्राने  उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला … Read more

साखर उद्योगाला चालना देण्यासाठी आर्थिक मदत करा

नवी दिल्ली :  सध्या देशात अनेक  ठिकाणी लॉकडाऊन शिथील करण्यात आला असून अनेक उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे देश ठप्प झाला आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद झाले आहेत. यात सरकारकडून काही प्रमाणात उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरातील सर्वाधिक … Read more