दिव्यांग कर्मचाऱ्यांना मिळणार वाहतूक भत्ता

पुणे – अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षक व कर्मचारी यांना वाहतूक भत्ता लागू केला आहे. यामुळे २१६ दिव्यांग कर्मचारी यांना वाहतूक भत्त्यासाठी ३२ लाख २९ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण … Read more

नगर – २४४ शिक्षक व इतर कर्मचार्यांच्या नियुक्त रद्द

नगर – महापालिकेने शहरातील सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या ९०१ पैकी तब्बल २४४ शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. त्याजागी नव्याने कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना बुधवारी पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागले. मनपा शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले. सर्वेक्षणाच्या कामाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला. आता दुसऱ्या दिवशी नव्याने २४४ जणांच्या … Read more

सातारा – कर्मचार्‍याने मारला कुरियरमधील दहा लाखांच्या साहित्यावर डल्ला

खंडाळा  – शिरवळ, ता. खंडाळा येथे कुरियर कंपनीच्या गोडाऊनमधील मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य, अशा दहा लाख 62 हजार 696 रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याप्रकरणी श्रीकांत घनवट या कंपनीच्या कर्मचार्‍यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, शिरवळ येथे पळशी रोडवर एका अपार्टमेंटमध्ये कुरियर कंपनीचे केंद्र आहे. तेथे कुरियर वितरण व्यवस्था व्यवस्थापक आणि … Read more

कर्मचाऱ्यांची तक्रार निवारण होण्याची चिन्हे; विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतरांना दिलासा

पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांस्तरावर तक्रार निवारण समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये संलग्नित विद्यापीठाचा प्रतिनिधी घेण्याचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तक्रार निवारण होण्याची चिन्हे आहेत. याबाबतचे परिपत्रक तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे. सार्वजनिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सेवा विषयक … Read more

पोलीस निरीक्षकांना निरोप देताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर!

जामखेड  – कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याची बदली हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे. तो सरकारी अधिकारी आहे म्हणजे त्याची बदली ही होणारच. परंतु ज्या भागात तो काम करतो त्या भागासाठी केलेल्या कामाच्या जोरावर तो अधिकारी जनतेच्या गळ्यातीत ताईत बनतो. असाच एक अधिकारी म्हणजे जामखेड स्टेशनचे बदली झालेले पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड. तालुक्‍यात प्रथमच एका अधिकाऱ्यांच्या बदलीने … Read more

पुण्यात शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या समस्यांना फुटली वाचा

    प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याबाबतचे गाऱ्हाणे मांडण्यात आले आहे. त्यावर योग्य त्या समस्या सोडवण्याबाबतचे आश्‍वासनही संघटनेला देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या आग्रहामुळे पुणे विभागीय शिक्षण … Read more

अधिकारी, कर्मचारी वर्षानूवर्षे तळ ठोकून

पुणे – राज्यातील शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिक्षक, विभागीय शिक्षण उपसंचालक या कार्यालयांत वर्षानूवर्षे काही अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून आहेत. त्यांच्या बदल्या करण्याचे धाडसी पाऊल शालेय शिक्षण विभागाकडून कधी टाकण्यात येणार आहे. असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तीन वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर एकाच टेबलचे काम करणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. या कार्यालयात विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, … Read more

कोपरगाव | आगारातील कर्मचाऱ्यांचा पत्त्यांचा डाव अन् खेळ मात्र प्रवाशांच्या जीवाचा…

कोपरगाव (प्रतिनिधी ) : कोपरगाव बसस्थानकाच्या आगारातील कर्मचारी गाडयांची देखभाल दुरुस्ती करण्या ऐवजी खुलेआम आगारात पत्ते खेळत बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कोपरगाव आगारातील कर्मचारी रातोरात चर्चेत आले.  या घटनेची अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान शहादा आगाराची एक बस पुण्यावरून शहाद्याकडे प्रवाशी घेवून जात असताना बसच्या चाकात हवा कमी असल्याचे व … Read more

वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप

वाघोली (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला  ७ वर्षे पूर्ण  झाले आहेत. या 7 वर्षात नरेंद्र मोदी यांनी  देशात आमुलाग्र बदल घडविले व देशाला प्रगतीपथावर नेले. हे करत असताना नरेंद्र मोदी यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. आज केंद्रातील भाजप सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने भाजप महाराष्ट्र प्रदेश … Read more

करोनाचा सुप्रीम कोर्टालाही फटका; ५० टक्के कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

नवी दिल्ली : देशात करोनाचा हाहाकार दिवसेंदिवस वाढतच जात आहे. सर्वोच्च न्यायालयदेखील यातून सुटू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांच्या हवाल्याने याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. कर्मचारी करोनाबाधित असल्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज … Read more