पिंपरी | पीसीसीओई मध्ये राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेला प्रारंभ

पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटना व विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वी वरीष्ठ गट (पुरुष व महिला) राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्‍पर्धेचे २७ ते २९ एप्रिल या कालावधीत पीसीसीओईच्‍या मैदानावर करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील … Read more

पिंपरी | संजय खांडेभरड यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

कार्ला, (वार्ताहर) – वरसोली गावचे लोकनियुक्त सरपंच संजय बबन खांडेभरड यांना सोमवारी (दि. १२) राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. यावेळी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहित संजय पवार, राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. स्वराज्य सरपंच … Read more

पुणे जिल्हा : राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने काळेंचा गौरव

तळेगाव ढमढेरे  – राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे यांना नुकतेच गौरविण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ तसेच काव्य संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासा (जि. नगर) येथे शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना त्या … Read more

पुणे जिल्हा : जितेंद्र गवळी याची राज्‍यस्‍तरीय किक बॉक्सिंगची निवड

पिंपरी – आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थी जितेश गवळी याची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. राज्य क्रिडा विभागांतर्गत सोलापूर येथील कुमठा नाका जिल्हा क्रीडा संकुलात विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १७ वर्षांखालील वयोगटातील सलग दोन सामन्यांत विजय मिळवत सुवर्णपदक मिळवले. विजेते खेळाडू जितेश गवळी याची नांदेड येथे होत असलेल्या … Read more

नगर : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत त्रिमूर्तीच्या संघाला सुवर्णपदक

नेवासा – शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री.दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकींदपूर येथील १९ वर्ष वयोगटातील संघाने सुवर्ण पदक पटकावले. वीर सावरकर (रंगोली) मैदान, यवतमाळ येथे शालेय १९ वर्ष मुले व मुली यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील विद्यालयाच्या संघाने पुणे … Read more

पुणे जिल्हा : निकिता रानवडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

पिरंगुट – नांदे (ता. मुळशी) येथील सरपंच निकिता चंद्रशेखर रानवडे यांना सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण, आमदार अभिमन्यू पवार, सुनील शेळके, कृष्णा गजबे … Read more

नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत यश

नांदेड : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव (ता. नांदेड ) येथील विद्यार्थिनी आरोही श्रीराम मोगले हिने सिंधुदुर्ग येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत १३ वा क्रमांक मिळवून कौतुकास्पद यश संपादन केले आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अक्वेटिक असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा मालवण येथे संपन्न झाल्या. या जलतरण स्पर्धेत विविध वयोगटामध्ये 500 मीटरपासून ते 5 … Read more

ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना राज्यस्तरीय ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ जाहीर

हडपसर (प्रतिनिधी) – कै.पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.भास्करराव खांडगे पुरस्कार लावणी गायिका व नृत्यांगना पुष्पा सातारकर यांना तर तमाशा साहित्यिक बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार गझलकार व शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांना देण्यात येणार आहे.अशी माहीती … Read more

ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेसाठी शनिवारी निवड चाचणी

पुणे – 23 वी वरिष्ठ महिला व 24 वी वरिष्ठ ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहराची निवड चाचणी येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ पुणे येथे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली. निवड चाचणीच्या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेत वजने घेण्यात येतील. परतीच्या पावसाचा अंदाज … Read more