प्रियंका गांधींना नाकारले; “लडकी हूँ, लढ सकती हूँ’ला सपशेल अपयश

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळविण्यासाठी प्रियंका गांधींना नेतृत्व द्यावे यासाठी कॉंग्रेस पक्षात जबरदस्त घमासान सुरु होते. किंबहुना ती कॉंग्रेसची शेवटची आशा होती. मात्र तीच आशा उत्तर प्रदेशच्या निकालाने घोर निराशेत रूपांतरित झाली. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये “लडकी हूँ, लढ सकती हूँ’ची झालेली अवस्था सबंध देशात कॉंग्रेस पक्षाला घोर निराशा देणारी आहे. 2022च्या यूपी विधानसभा … Read more

अखिलेश यादवाचं दमदार कमबॅक; मतांमध्ये 10 टक्क्यांनी भरघोस वाढ

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजप सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. या ट्रेंडमध्ये भाजपने 250 चा टप्पा ओलांडला आहे. भाजपचे स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. मात्र त्याचवेळी अखिलेस यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत भाजप 271 जागांवर तर … Read more

UP Election: उत्तर प्रदेशात योगीचं जोरदार पुनरागमन, तिकडं पाकिस्तानात संताप

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या निकालावरून हे स्पष्ट होतय की, सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी यूपीची सत्ता काबीज करणार आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचा गदारोळ देशातच नाही, तर पाकिस्तानातील जनतेच्याही नजरा या निवडणुकीकडे लागल्या होत्या. निवडणूक निकालांच्या ट्रेंडमध्ये योगी आदित्यनाथ … Read more

मोठा धक्का ! भाजप खासदाराचा पुत्रच समाजवादी पक्षात दाखल

लखनौ – उत्तर प्रदेशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचे पुत्र समाजवादी पक्षात सामील झाल्याची माहिती सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी दिली. ते आझमगडमधील रॅलीला संबोधित करत होते. अखिलेश यादव म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी आज … Read more

‘डीएनए’मध्ये सेवा मूल्य असलेल्या उमेदवाराला निवडावं; अमित शहा यांचं आवाहन

जौनपूर – “डिएनए’मध्ये सेवा मूल्य असलेल्या उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आड उत्तर प्रदेशातील मतदारांना केले. 10 मार्च रोजी उत्तर प्रदेशात भाजपचे राज्य पुन्हा एकदा स्थापन झाले की जे एक – दोन गॅंगस्टर आता तुरुंगाबाहेर आहे, त्यांनाही तुरुंगात टाकले जआल, असेही त्यांनी सांगितले. मल्हानी विधानसभा मतदार संघात आयोजित प्रचार सभेमध्ये … Read more

मनमोहन, ठाकरे, मुलायम गुण्यागोविंदाने राहतात एका घरात!

नवी दिल्ली – मनमोहन सिंग, बाळ ठाकरे, मुलायम सिंह, राजनाथ सिंह गुण्यागोविंदाने एकाच घरात राहत असल्याचे सांगितल्यास सगळेच अचंबित होतील. पण, ते खरे आहे. उत्तरप्रदेशातील एका शेतकऱ्याच्या घरात ते राहतात. सध्या विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या उत्तरप्रदेशच्या आंबेडकर नगर जिल्ह्यात हैदराबाद नावाचे गाव आहे. त्या गावात मिठाई लाल (वय 57) नावाचा शेतकरी राहतो. त्याला सात अपत्ये … Read more

उत्पन्न दुप्पट करणार होते,आता शेतकऱ्यांना खते मिळणेही अवघड : अखिलेश यादव

बलिया – भारतीय जनता पक्षाचे सरकार देशातील शेतकऱ्यांचे सन 2022 मध्ये उत्पन्न दुप्पट करणार होते. आज उत्पन्न दुप्पट होणे तर दूरच पण शेतकऱ्यांना साधी खतेही बाजारात मिळेनाशी झाली आहेत अशा स्थितीत शेतकरी शेती तरी कशी करणार आणि त्यांना उत्पन्न कोठून मिळणार असा सवाल करीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी येथील प्रचार सभेत भाजपवर … Read more

विरोधकांनी कोविड लसीविषयी अफवा पसरवल्या; मोदींची प्रचारसभेत टीका

महाराजगंज – विरोधकांनी देशात नकारात्मक राजकारण चालवले आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विरोधकांनी कोविड लसींबाबतही लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले आहे असा आरोप त्यांनी आज येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना केला. पंतप्रधान म्हणाले की, असंख्य भारतीयांना लसी भारतात बनवल्या गेल्या हे जाणून अभिमान वाटला, पण त्यांना डोस न घेण्यास विरोधकांनी चिथावले. … Read more

उत्तरप्रदेशात एकूण चार अखिलेश यादव रिंगणात

लखनौ  – उत्तरप्रदेशाच्या निवडणुक रिंगणात सध्या अखिलेश यादव नावाचे एकूण चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यातील प्रमुख उमेदवार आहेत. तथापि या निवडणूकीत अन्य तीन अखिलेशांचे काय होणार हा औत्स्युक्‍याचा विषय आहे. समाजवादी पक्षाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त, बिकापूरमधून कॉंग्रेसचे उमेदवार, गुन्नौरमधील अपक्ष आणि मुबारकपूरमधील सपा उमेदवार यांचे नाव अखिलेश यादव असे आहे. … Read more

उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यात 53 टक्के मतदान

लखनौ, – उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाले. राज्यातील 12 जिल्ह्यांमधील 61 जागांवर हे मतदान झाले. प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा विधानसभा मतदार संघाव्यतिरिक्त अन्यत्र मतदान शांततेत पार पडले. कुंडा मतदार संघातील समाजवादी पार्टीचे उमेदवार गुलशन यादव यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काही लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात यादव किरकोळ जखमी झाले, … Read more