संयुक्त जनता दलाच्या उमेदवारावर गोळीबार

इंफाळ, (मणिपूर) – मणिपूरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केशेत्रिगाव या मतदारसंघातील संयुक्त जनता दलाच्या उमेदवारावर काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी काल गोळीबार केला. रोहित वाहेंगबाम यांच्यावर हा गोळीबार झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. बाहेंबान यांच्यावर हा गोळीबार कोणी केला हे समजू शकलेले नाही. मात्र या हल्लेखोरांना पकडण्यात यायला हवे. … Read more

भाजपने गरीबांकडून पैसा घेऊन श्रीमंत मित्रांचे खिसे भरले : अखिलेश यादव

बलरामपूर, (उत्तर प्रदेश) – गरीबांकडून पैसा काढून घेऊन आपल्या श्रीमंत मित्रांचे खिसे भरणे हेच भाजपचे काम आहे, अशी टीका समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. भाजपच्या या धोरणामुळेच उत्तर प्रदेशातील जनता आता भाजपला कंटाळली आहे आणि निवडणूकीत समाजवादी पार्टीला विजयी करणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील प्रचार … Read more

जातीयवाचक वक्तव्य; भाजपच्या उमेदवाराला नोटीस

नवी दिल्ली  – उत्तर प्रदेशमधील विधानसभेसाठीचे भाजपचे उमेदवार रघुवेंद्र प्रताप सिंह यांना जातीयवाचक वक्तव्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. “जे हिंदू दुसऱ्या बाजूला मतदान करतात, त्यांच्या धमन्यांमध्ये मुस्मिमांचे रक्त असते.’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांनी भोजपुरी भाषेतून केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्याची एक व्हिडीओ क्‍लीप व्हायरल झाली आहे. निवडणूक आयोगाने या वक्तव्याचा … Read more

यंदा मुख्तार अन्सारी रिंगणात नाही, पण मुलाच्या माध्यमातून करणार नियंत्रण

मऊ (उत्तर) – उत्तरप्रदेशातील डॉन म्हणून ख्याती असलेला मुख्तार अन्सारी याने अगदी अखेरच्या क्षणी निवडणूक रिंगणातून माघार घेऊन आपल्या ऐवजी आपला मुलगा अब्बास अन्सारीला येथून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तथापि असे असले तरी निवडणुकीची सारी सूत्रे मुख्तार अन्सारीच्याच हातात आहेत. या मतदार संघात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होंणार आहे. अब्बास अन्सारी … Read more

“उत्तरप्रदेशावर 6 लाख 91 हजार कोटींचे कर्ज; 40 टक्के कर्ज योगींच्या काळात”

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी आज आर्थिक आकडेवारीसह उत्तरप्रदेशातील योगी अदित्यनाथ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज उत्तरप्रदेशावर 6 लाख 91 हजार कोटी रूपयांचे कर्ज असून यातील 40 टक्के कर्ज मुख्यमंत्री योगींच्या काळातील आहे. सन 2018 पासून उत्तरप्रदेशातील दर चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती बेरोजगार असून या राज्यातील लाखो … Read more

राममंदिर उभारणीच्या सुरुवातीनंतरही अयोध्येत भाजपला फटका ?

अयोध्या- अयोध्येत होणारे राम मंदिर हा भाजपसाठी संपुर्ण देशभर राजकीय भांडवलाचा विषय ठरला असला तरी खुद्द अयोध्येत मात्र या मंदिराच्या निर्माण कार्याच्यावेळी ठिकठिकाणी जी पाडापाडी केली जात आहे त्यावरून स्थानिक नागरीक, अन्य मंदिरांचे पुजारी आणि व्यापाऱ्यांमध्ये भाजपच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा मोठा फटका यावेळी भाजपला बसू शकतो अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. येथील … Read more

आता पूर्ण क्षमतेने प्रचार करता येऊ शकणार

नवी दिल्ली -निवडणूक आयोगाने मंगळवारी विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारावरील बहुतांश निर्बंध उठवले. त्यामुळे उत्तरप्रदेश आणि मणिपूरमध्ये पूर्ण क्षमतेने प्रचार करणे शक्‍य होणार आहे. निवडणूक आयोगाने मागील महिन्यात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यावेळी करोना संकट विचारात घेऊन प्रचारावर विविध प्रकारचे निर्बंध घालण्यात आले. करोना संकट ओसरू लागल्याने ते निर्बंध टप्प्याटप्प्याने … Read more

राजनाथ सिंह यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न

बलिया – उत्र प्रदेशातील प्रचारसभेमध्ये संरक्षण णंत्री राजनाथ सिंह यांच्या भेषणात आज काही युवकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्वरित हस्तक्षेप करून या युवकाला ताब्यात घेतले. बांशी बझार येथे राजनाथ सिंह यांची सभा सुरू असताना हा प्रकार घडला. लष्करातील भरतीच्या मुद्यावरून एका युवकाने भाषणादरम्यान अडथळा आणला. लष्करातील भरती गेल्या तीन वर्षांपासून स्थगित आहे, असा … Read more

भाजपची डोकेदुखी वाढली ! वाराणसी, गोरखपूरमध्ये शेतकरी नेते करणार विरोधात प्रचार

नोएडा -केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारणारे शेतकरी नेते वाराणसी, गोरखपूर आणि प्रयागराज या उत्तरप्रदेशातील तीन जिल्ह्यांचे दौरे करणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाआधी ते दौरे होतील. त्यामुळे शेतकरी नेते सत्तारूढ भाजपचे बालेकिल्ले ढवळून काढणार असल्याचे सूचित होत आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन केले. त्या मोर्चाचे प्रमुख … Read more

केंद्रीय मंत्र्याची बहिण “सपा”ची उमेदवार

कौशंबी – केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या थोरल्या भगिनी पल्लवी पटेल या उत्तर प्रदेशच्या विदानसबेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र यामुळे अनुप्रिया पटेल संतप्त झाल्या आहेत. त्यांनी आपल्या सख्ख्या बहिणीवर जोरदार टीका केली आहे. आपल्या वडिलांच्या विचारधारेशी कटिबद्ध असतानाही पल्लवी पटेल यांनी समाजवादी पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्‍न अनुप्रिया … Read more