पिंपरी | पालिकेकडे नाही निवासी शाळांची आकडेवारी

पिंपरी, (प्रतिनिधी) – क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल अत्याचार प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेनंतर शहरातील निवासी शाळांमध्ये मुलींच्‍या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला. यावर चर्चा सुरु होताना आणखी एक धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला तो म्‍हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे शहरातील निवासी शाळांची आकडेवारीच नाही. तसेच अशा शाळांवर कारवाइचे अधिकारही पालिकेकडे नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत रावेत येथील … Read more

अबाऊट टर्न : आकडेमोड

आकडेमोड जोरात चालू आहे. किती लाख कोटी रुपयांचा उद्योग कुठून कुठे आणि का गेला? तो आपल्याकडे आला असता, तर किती तरुणांना रोजगार मिळाला असता? किती हजार कोटी रुपयांची अलाइड इंडस्ट्री उभी राहिली असती? त्यातून किती जणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या? कुणाला, कुणी, किती कोटी रुपयांचं पॅकेज देऊ केलं? उच्चस्तरीय बैठकीची तारीख? प्रकल्पाला किती सवलती देण्याच्या शिफारशी … Read more

अग्रलेख : अर्थव्यवस्था सावरतेय, पण…

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत जी आकडेवारी जाहीर केली ती निश्‍चितच आशादायक आहे. भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सावरू लागली असल्याची लक्षणे दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये केवळ भारतच नव्हे तर जगातील सर्वच अर्थव्यवस्थांना करोना महामारीचा जो फटका बसला होता त्यामधून हळूहळू जग सावरत असताना भारतीय अर्थव्यवस्थाही सावरत आहे.  जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेने भारताचा सावरण्याचा … Read more

ओमायक्रॉनची नागपूरमध्ये एन्ट्री; पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीला संसर्ग

मुंबई : करोनाच्या नव्या विषाणूची अर्थात ओमायक्रॉनची आता नागपूरमध्ये एन्ट्री झाली आहे. बुर्किंना फासो  या पश्चिम आफ्रिकेतील देशातून आलेल्या प्रवाशाला ओमायक्रॉनचा  संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागपुरात पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली आहे. नागपूर विमानतळावर ४० वर्षीय प्रवासी ५ डिसेंबरला आला होता. यावेळी या प्रवाशाचे नमुने जमा करण्यात आले. या नमुन्यांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी … Read more

…म्हणून शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर करता येत नाही

नवी दिल्ली – गेली काही वर्षे सरकारकडून शेतकरी आत्महत्यांची माहितीच प्रसारित केली गेलेली नाही. त्याविषयी काही संसद सदस्यांनी सरकारकडे विचारणा केली असता त्याला सरकारकडून मासलेवाईक उत्तर देण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अनेक राज्यांकडून आणि केंद्रशासित प्रदेशांकडून शेतकरी आत्महत्यांची माहिती आणि अन्य तपशील केंद्र सरकारकडे पाठवण्यात येत नाही. त्यामुळे देशातील शेतकरी आत्महत्यांच्या संबंधातील माहिती … Read more

करोना बाधितांच्या आकडेवारीचा पुण्यात ‘टेक्निकल’ गोंधळ

पुणे- शहरात होम क्वांरटाइन करण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती अपडेट करण्यात येणार आहे. करोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना खासगी रुग्णालये उपचारासाठी घरी पाठवतात. मात्र, त्यानंतर या व्यक्ती बरे झाल्यानंतर त्याची माहिती पालिकेस कळवली जात नाही. त्यामुळे या बाधितांचा आकडा 15 हजारांवर दिसत असून प्रत्यक्षात 7 हजार बाधित सक्रीय आहेत. ही बाब लक्षात घेऊन या व्यक्तींची माहिती … Read more

महाराष्ट्रातील 70 टक्के करोनाबाधित 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे

मुंबई : देशातील सर्वांधिक करोनाबाधित असणाऱ्या महाराष्ट्राबाबत महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, राज्यातील 70 टक्के करोनाबाधित 21 ते 50 वर्षे वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्यांपैकी 2 हजार 330 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 1 हजार 646 रुग्ण 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर 684 बाधितांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. … Read more