पुणे जिल्हा : खेडमधील गावगाडा ठप्प

ग्रामपंचायतींचे कारभारी संपात सहभागी : नागरिकांची कामे खोळंबली शेलपिंपळगाव  – राज्यातील ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सोमवार पासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत आहेत. पुणे जिल्ह्यातील 1389 ग्रामपंचायतीनचे काम त्यामुळे ठप्प झाले आहे. यात खेड तालुक्यातील …ग्रामपंचायतींचे काम ठप्प झाले आहेत. या आंदोलनात खेड तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक यांच्यासह कर्मचार्‍यांच्या संघटना सहभागी … Read more

पुणे जिल्हा : शेतकऱ्यांची कालवाकालव थांबली

नवीन व जुना मुठा कालव्याला पाणी सोडले : तीन तालुक्यांना दिलासा लोणी काळभोर – तब्बल दीड महिना कालव्याला पाणी नसल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागलेल्या हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडावर हास्य उमटले आहे. नवीन व जुना मुठा अशा दोन्ही कालव्यांना पाणी आल्यामुळे या तीनही तालुक्यातील बळीराजासह लगतची गावेे व वाड्या- वस्त्यांवरील नागरिक सुखावले … Read more

अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी राहुल गांधींनी थांबवला ताफा

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी बुुधवारी अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी संसदेत पोहोचले. मात्र, 10 जनपथ सोडल्यानंतर काही अंतरावरच अचानक त्यांचा ताफा थांबला होता. वास्तविक, वाटेत अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपली कार थांबवली. कार थांबताच व्यक्तीच्या मदतीसाठी राहुल तत्परतेने स्वतः गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. … Read more

पावसाअभावी शिवारे पडली कोरडी; शेतकऱ्यांत चिंता : खरिपाच्या पेरण्या रखडल्या

वाल्हे – जून महिना संपून जुलै सुरू झाला. अद्याप मोसमी पावसाची जिल्ह्यात दमदार हजेरी लागली नाही. जमिनीत चार इंचही ओलावा नाही. परिणामी, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. या महिन्यात पीक कोळपणीला येते.यंदा मात्र उलट चित्र असून, शिवारे पावसाअभावी कोरडी दिसून येत आहेत. यंदाचा बेंदूर कोरडाच गेला आहे. कोरड्या रानाला नैवेद्य दाखवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्रतिवर्षी … Read more

पुरंदरमध्ये रोखले दोन बालविवाह ;पिंपळे येथे गुन्हा तर एक थांबवण्यात यश

सासवड : पुरंदर तालुक्‍यामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये दोन बालविवाह रोखण्यास यश आले आहे. तालुक्‍यातील ग्रामीण भागामध्ये हे विवाह पार पडत असताना एक विवाह रोखण्यात यश आले तर एका ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुरंदरच्या संरक्षण अधिकारी कविता चौरे यांनी दिली. पुरंदर तालुक्‍यातील पिंपळे येथील एक बालविवाह संपन्न झाला होता या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनला … Read more

पुणे जिल्हा : जुन्नरमध्ये 10800 हेक्‍टर भात लागवड रखडली

तालुक्‍यातील स्थिती : काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट हितेंद्र गांधी जुन्नर – भाताचे कोठार आणि पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात वरुणराजा रुसला आहे. त्यामुळे जवळपास 10800 हेक्‍टर क्षेत्रात होणारी भात लागवड रखडली आहे. जून महिन्याच्या सुरवातीला अवकाळी पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्‍यात तुरळक ठिकाणी भात रोपांची पेरणी करण्यात आली होती. मात्र … Read more

खासदार कोल्हेंचा दौरा अन्‌ दोघांना पोलीस ठाण्यात डांबले

आढळराव पाटील यांच्या मध्यस्थीनंतर चार तासांनी सुटका पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून निषेध व्यक्‍त मंचर : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्‍यात आदिवासी भागातील विविध प्रश्‍न यासंदर्भात केलेली पोस्ट व त्या संदर्भात कोल्हे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या दोन आदिवासी बांधवांना घोडेगाव पोलिसांनी ताब्यात घेत चार तास पोलीस ठाण्यात ठेवल्याची घटना … Read more

#VIDEO :”तुम्ही गद्दारी का केली?, ते एका डाकूबरोबर गेले…”; बच्चू कडूंची गाडी आडवून वयोवृद्धाने झापले

मुंबई : काही महिन्यापूर्वी राज्यात शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि ४० आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले. या शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे राज्यातील मविआ सरकार कोसळले. या ४० आमदारांमध्ये प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता.  दरम्यान, त्यांच्या याच सहभागावर नागरिकांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. असेच एका वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंची गाडी आडवून त्यांना झापल्याची … Read more

जुन्नर तालुक्‍यात लम्पीमुळे लाखोंची उलाढाल ठप्प

जनावरांचा बाजार बंदच : शेतकरी, व्यापारी धास्तावलेले बेल्हे : जनावरांत लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने गोपालक शेतकरी व बैल व्यापार करणारे चिंतेत असून या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील प्रशासन सतर्क झाले असून त्या पार्श्‍वभूमीवर जुन्नर तालुक्‍यातील जनावरांचा बाजार अनेक दिवसांपासून बंद असल्याने जनावरांच्या बाजारातील लाखो रुपयांची उलाढाल थंडावली आहे. तसेच या बाजारावर अवलंबून असणाऱ्याची … Read more

देश सोडून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता श्रीलंकन राष्ट्रपतींचा भाऊ; संतप्त कर्मचाऱ्यांनीच रोखले

कोलंबो : श्रीलंकेत नागरिकांनी सरकारविरोधात मोठे रान उठावले आहे. देशातीलआंदोलनकर्त्यांनी देशाच्याराष्ट्रपतींच्या निवासस्थानावर कब्जा केला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांच्या रागाला सामोरे जावे लागत आहे. त्याचाच अनुभव राष्ट्रपती गोटाबाया यांचा लहान भाऊ बासिल राजपक्षे यांनाहीआला. श्रीलंका सोडून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या बासिल यांना विमानतळ कर्मचाऱ्यांनीच रोखले असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे … Read more