nagar | मेंढपाळांची व्यापार्यांकडून १८ लाखांची फसवणूक

नगर, (प्रतिनिधी) – राहता तालुक्यातील मेंढपाळांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई करावी व त्यांच्याकडून मेंढपाळांची रक्कम परत मिळवून द्यावी, अन्यथा ७ जून रोजी राहता येथे धनगर समाज बांधव रस्त्यावर मेंढ्या सोडून रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे … Read more

पुणे | चुकीचे संदेश, अफवा पसरविल्यास कठोर कारवाई

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – मतदार यादीतील नावावर डिलीट असा शिक्का मारला असल्यास करायच्या कार्यवाहीची चुकीच्या माहितीबाबतचा संदेश व्हॉट्सअपद्वारे प्रसारीत केल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्यादृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. असे चुकीचे संदेश, अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा … Read more

पुणे जिल्हा | शेतकरी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा

मंचर, (प्रतिनिधी) – नागापूर (ता.आंबेगाव) येथे शेतकऱ्याच्या आत्महत्येस दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन माकपच्या वतीने घोडेगाव तहसील कार्यालयात देण्यात आले. नागापूर येथे शेतमजुरी करणाऱ्या एका आदिवासी कुटुंबातील एकनाथ बर्डे या व्यक्तीस शेतमालकाने अपमानास्पद वागणूक देवून व मारहाण केल्यामुळे एकनाथ बर्डे यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. ही घटना अत्यंत … Read more

Lok Sabha Election 2024 : कॉंग्रेसची पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात तक्रार; कठोर कारवाईची केली मागणी

Congress | Narendra Modi | Lok Sabha Election 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानच्या बांसवाडा येथील प्रचारसभेत बोलताना कॉंग्रेस पक्षाच्या संदर्भात एक विधान केले होते. त्याला कॉंग्रेस पक्षाने आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाने पंतप्रधानांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पंतप्रधानांनी विभाजनवादी आणि दुर्भावनापूर्ण वक्तव्य करून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचे … Read more

‘डान्सबारला पोलिसांचेच संरक्षण, कडक कारवाई करावी’; विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई – मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्या आड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलिसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक महिन्याला … Read more

Crop insurance : पीक विमा नोंदणीसाठी जादा रक्कम आकारल्यास कडक कारवाई करावी – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

पुणे :- शेतकऱ्यांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्रांकडून अतिरिक्त रक्कमेची मागणी होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे दिले आहेत. राज्य शासनाने चालू खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत https://pmfby.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पीकाचा विमा … Read more

अखेर कुस्तीपटूंच्या आंदोलनाला यश.! ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लवकरच कठोर कारवाई

नवी दिल्ली – भारताच्या महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाला यश येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्काली अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाउन त्यांची रवानगी कोठडीत केली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचे … Read more

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा, CM शिंदेंचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंबई :- बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. बियाणे विक्रेते योग्य … Read more

Mumbai : अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी – पालकमंत्री लोढा

मुंबई : आरे स्टॉलसमोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रमात कुर्ला (पश्च‍िम) एल वॉर्ड येथे आज 689 … Read more

सांगली : जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावी – पालकमंत्री खाडे

सांगली : जिल्ह्यातील मटका, दारू, जुगार आदी सर्व अवैध धंदे ताबडतोब बंद करावेत. त्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश कामगारमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित केंद्र पुरस्कृत, राज्य सरकार अर्थ संकल्पातून व जिल्हा नियोजन समितीतून घेतलेल्या व घ्यावयाच्या विकास कामांच्या जिल्हास्तरीय … Read more