Pune: आरटीई प्रवेशाच्या नियमावलीतील बदलांना न्यायालयात आव्हान

पुणे – राज्य शासनाने आरटीई प्रवेशाच्या नियमावलीत केलेल्या बदलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत राज्य शासनाला येत्या ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य सरकारच्या बदललेल्या आरटीई नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणे कठीण झाले आहे, अशा आशयाची जनहित याचिका … Read more

Pune News : वाघोलीत विद्यार्थ्याचा लैंगिक छळाचा प्रयत्न ; कर्मचाऱ्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीतील एका नामांकित शाळेत एका कर्मचाऱ्याने १० वर्षाच्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विरोधात विद्यार्थ्याच्या आईने लोणीकंद पोलीसात फिर्याद दिली असून कर्मचाऱ्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळेत फिर्यादी यांचा १० वर्षीय मुलगा शिक्षण घेत आहे. १९ एप्रिलला फिर्यादी यांनी … Read more

पुणे जिल्हा | एन.एम. एम. एस. परीक्षेत विद्या विकास मंदिरचे सुयश

मंचर, (प्रतिनिधी) – विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अवसरी बुद्रुक या विद्यालयातील तेरा विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत. त्याचबरोबर सारथी शिष्यवृत्तीसाठी ६२ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अंकुश शिंगाडे यांनी दिली. विद्या विकास मंदिर या विद्यालयाने याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवत सन २०२३-२४ … Read more

पुण्यात दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग

पुणे – बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तर, या प्रकरणात प्रशासन पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. रॅगिंग झालेल्या प्रकरणात एक विद्यार्थिनी क्ष-किरणशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत असून, ती सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आहे. तर दुसरी विद्यार्थिनी … Read more

महत्वाची बातमी ! मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना मिळणार ‘रजा’ ; या राज्याच्या विद्यापीठाचा निर्णय

Periods Leave ।

Periods Leave । मासिक पाळीदरम्यान बहुतांश मुलींना शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. या काळात शरीराला आरामाची आवश्यकता असते. मात्र या काळात मुलींना आराम मिळावा यासाठी पंजाबमधील एका विद्यापीठाने मोठा निर्णय घेतलाय. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा देण्याचा निर्णय पंजाब विद्यापीठाने घेतला आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 साठी विद्यापीठाने हा नवा नियम लागू केलाय. पंजाब … Read more

पुणे जिल्हा | शिक्रापूर शाळेच्या तिघांची नवोदयसाठी निवड

शिक्रापूर, (वार्ताहर)- शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नेहमीच वेगवेगळ्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत असताना या शाळेतील तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापिका साधना शिंदे यांनी दिली आहे. शिक्रापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. निवड … Read more

पुणे | आव्हाने स्वीकारण्याची धमक ठेवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विद्यार्थ्यांनो यशस्वी व्हायचं असेल, तर स्वतःला शिस्त लावा. न्यूनगंड बाळगू नका. स्वतःमधील ‘स्व’ला ओळखा. छोट्या छोट्या संकटांना घाबरून मागे राहू नका. निर्णय कोणताही घ्या चूक असो वा बरोबर; पण निर्णय घेण्याचे प्रयत्न आणि धाडस सतत केले पाहिजे. यातून आयुष्यात आपल्याला स्वतःवर संयम राखता येईल आणि स्वतःवर ताबा ठेवता येईल. यासाठी स्वतःमध्ये … Read more

पिंपरी | अशी पाखरे येती…

कामशेत, (वार्ताहर) – अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती, असे म्हणत आपल्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी परत एकदा शाळेच्या प्रांगणात जमली. निमित्त होते कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयातील २०१० मधील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे. तब्बल १४ वर्षानंतर स्नेहसंमेलनाच्या निमित्त ४५ माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले आणि आठवणीत हरवून गेले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे … Read more

पुणे जिल्हा | विद्यार्थ्यानी प्रामाणिकपणे आभ्यास केल्यास यश निश्चित

मंचर, (प्रतिनिधी) – विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना शिकवा, विद्यार्थ्यांनीही प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश निश्चित आहे, असे मत प्राचार्य मेजर डॉ. शत्रुघ्न थोरात यांनी व्यक्त केले. पारगाव (ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर शिक्षण संस्था संचलित, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय व दत्तात्रेय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व युवक महोत्सवाचे उद्घाटन सरस्वती पूजनाने झाले. भीमाशंकर … Read more

nagar | विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे फलित

निघोज, {कवी हनुमंत चांदगुडे} (वार्ताहर) – आधुनिक भारतासाठी विद्यार्थ्यांचे कलागुण महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे फलित असून त्यांच्यासाठी प्रेरणामय वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे मुलिका महोत्सवानिमित्त विविध दिवस साजरे करून वार्षिक पारितोषिक वितरण व … Read more