“कतारमधील भारतीयांना मोदींनी नाही तर शाहरुखने सोडवल..” भाजप नेत्याच्या पोस्टने खळबळ.. SRK कडून करण्यात आला ‘हा’ खुलासा

Modi Qatar Shah Rukh Khan Subramanian Swamy

Modi Qatar Shah Rukh Khan Subramanian Swamy : भारत सरकारने कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षित मायदेशी परतण्याची हमी दिली आहे. आधी या माजी नौसैनिकांची शिक्षा कमी करण्यात आली, नंतर त्यांची सुटका करण्यात आली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल … Read more

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा आहेर,’मोदींनी आयुष्यात कधीच प्रभू श्रीरामाच्या तत्त्वांचं पालन केलेलं नाही’

Subramanian Swamy –  पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी होणार आहे. पण पूजेदरम्यान पंतप्रधान म्हणून त्यांचं महत्त्व शून्य असेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रभू श्रीराम यांच्या तत्वांचं पालन केलेलं नाही. विशेषत: त्यांच्या पत्नीविषयीची त्यांची वागणूक पाहाता हे दिसत आहे. शिवाय गेल्या १० वर्षांत पंतप्रधान म्हणून ते रामराज्याप्रमाणे वागलेले नाहीत’ असं म्हणत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी … Read more

‘पंतप्रधान मोदी पत्नीशिवाय अयोध्येत पुजा करू शकत नाहीत…’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान चर्चेत, ट्विटनं वेधलं लक्ष

Narendra Modi – अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा चारही शंकरचार्यांच्या विरोधामुळे वादग्रस्त बनलेला असतानाच भाजपचेच नेते असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘धार्मिक संकेतानुसार पंतप्रधान मोदी आपल्या पत्नी शिवाय अयोध्येतील पुजेला उपस्थित राहू शकत नाहीत’. त्यांच्या या विधानांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वामी यांनी आज ट्विटवर एक पोस्ट … Read more

“मोदी रिकाम्या हातांनी मायदेशी परतणार..” ‘या’ भाजप नेत्याची टीका

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने कितीही ही यात्रा यशस्वी झाल्याचे ढोल वाजवले तरी वास्तव एकच आहे की अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मोदींच्या या दौऱ्यात चीनबाबत चकार शब्द काढलेला नाही. चीनने भारताचा 4026 किमीचा भूभाग बेकायदा बळकावला असूनही … Read more

“अमित शहांना क्रीडा मंत्रालयात पाठवा” मणिपूर हिंसाचारावरून भाजप नेत्यानं पक्षाला सुनावलं

नवी दिल्ली – मणिपूर येथे गेला महिनाभरापेक्षा जास्त काळ हिंसाचार सुरू आहे. त्यावरून सगळ्याच विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने मणिपूर हिंसाचारावर भाष्य करत अमित शहांवर निशाणा साधला आहे. मणिपूर हिंसाचार प्रकरणी बोलताना भाजप नेते डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला सुनावत घरचा आहेर दिला आहे. राज्यातील सरकार बरखास्त करून तेथे केंद्रीय … Read more

Maharashtra Politics : ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीला माझा पाठिंबा; भाजपाच्या बड्या नेत्याच्या पोस्टने खळबळ

मुंबई – सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गट  विरुद्ध ठाकरे गट वाद सुरु असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयानंतर शिंदे गटाने आनंदोत्सव साजरा केला असला तरी ठाकरे गटाने या निर्णयावरुन संताप व्यक्त करताना सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असतानाच निर्णय घेतल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळं ठाकरे आणि शिंदे … Read more

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक; भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींची टीका

पंढरपूर – वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच पंढरपूर कॉरिडॉर होणार, असे वक्तव्य केले आहे. या कॉरिडॉरचा आराखडा देखील जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. मात्र, या कॉरिडॉरला पंढरपूरातील स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात काही नेत्यांनी भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची मुंबईत येथे जाऊन … Read more

तवांगच्या मुद्द्यावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींकडून घरचा आहेर,’पंतप्रधान मोदींना..’

नवी दिल्ली – तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेराव घालण्यात व्यस्त आहेत. विरोधकांसोबतच त्यांच्या पक्षाचे नेतेही पंतप्रधान मोदींना गोत्यात उभे करत आहेत. प्रत्येक मुद्द्यावर बिनधास्तपणे मत मांडणारे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा तवांगच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 9 डिसेंबरच्या रात्री … Read more

Subramanian Swamy | आता भाजपाचे नेते स्वामींनीच केली मोदींची रावणाशी तुलना; म्हणाले “मी लवकरच…”

नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना केली होती. आता निवडणूक झाल्यानंतर (Subramanian Swamy on PM Modi)भारतीय जनता पार्टीचेच नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी यांची रावणाशी तुलना केली आहे. रावणाप्रमाणे धार्मिक असल्याचा दावा करत मोदी एकतर मंदिरे तोडत आहेत किंवा त्यांच्यावर कब्जा … Read more

2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

नवी दिल्ली – महाराष्ट्रात अलिकडेच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अध्यक्षपदाची एकही जागा पटकावता आली नाही. त्यांचे जास्त सदस्यही निवडून आले नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपसाठी हा एक इशारा असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला हार पत्करावी लागू शकते, असा इशारा भाजपचेच माजी राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. उद्धव ठाकरेंनी फोन … Read more