पुणे जिल्हा : साखर उद्योग प्राप्तीकरातून कायमचा मुक्त

राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा दावा इंदापूर   – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उसाच्या एफआरपीमध्ये भरघोस वाढ करून, इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देणारे धोरण राबविले आहे. तसेच देशातील साखर उद्योग प्राप्तीकरातून कायमचा मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन … Read more

PUNE: साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करा

पुणे – साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. या मागण्यांबाबतचा सविस्तर अहवाल साखर आयुक्त हे राज्य सरकारला सादर करणार आहेत, अशी माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली. साखर आयुक्तालयात साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि ऊस दर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची संयुक्त बैठक … Read more

“साखर उद्योगात संशोधनासाठी गुंतवणूक करावी”; शरद पवार यांचे मत

“डेक्‍कन शुगर टेक्‍नॉलॉजिस्ट असोसिएशन’च्या वार्षिक परिषदेचे उद्‌घाटन पुणे – साखर उत्पादनात जागतिक क्रमवारीत भारत अग्रेसर आहे. तर देशात महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक आहे. साखर उद्योगाशी संबंधित सर्व स्तरांना संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड सातत्याने दिली पाहिजे. साखर निर्मिती उद्योगात जागतिक पातळीवर आपले स्थान आबाधित राखण्यासाठी साखर उद्योगात संशोधन करण्यासाठी गुंतवणूक करण्याची मानसिकता बाळगली पाहिजे, असे … Read more

साखर उद्योगाला इथेनॉलचा दिलासा

नवी दिल्ली – डिसेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 या काळात साखर कारखान्यांनी इंधन कंपन्यांना 170 कोटी लिटर इथेनॉल पुरवण्याचा करार केलेला आहे. त्यापैकी आतापर्यंत 92.5 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत आहे. यासंदर्भात साखर कारखानदारांची संघटना असलेल्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने म्हटले आहे की, अतिरिक्त साखर … Read more

केंद्र शासनाने साखर उद्योगासाठी भरीव पॅकेज द्यावे : शंभूराज देसाई

सणबूर  (वार्ताहर) – राज्यातील अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढणेकरीता केंद्र शासनाने सहकारी साखर उद्योगाला मदत करावी, अशी मागणी माजी केंद्रिय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या मागणीनुसार केंद्र शासनाने यावर धोरणात्मक निर्णय घेवून अडचणीत सापडलेला सहकारी साखर उद्योग सावरण्याकरीता भरीव पॅकेज दयावे, अशी मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज … Read more

साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. लॉकडाउनमुळे हा उद्योग अडचणीत आल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर … Read more

साखर उद्योगाला चालना देण्यासाठी आर्थिक मदत करा

नवी दिल्ली :  सध्या देशात अनेक  ठिकाणी लॉकडाऊन शिथील करण्यात आला असून अनेक उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे देश ठप्प झाला आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद झाले आहेत. यात सरकारकडून काही प्रमाणात उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरातील सर्वाधिक … Read more

साखर उद्योगासाठी ठोस तरतूद नाही- राजू शेट्टी

कोल्हापूर :अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेट वरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बजेटमध्ये नव असं काहीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच साखर उद्योगास संदर्भात देखील कोणतीच ठोस तरतूदी चा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या बाबींवर  घेतलेल्या … Read more

राज्यात 70 लाख टन साखर पडून  

– दोन वर्षे साखर पुरणार – 22 नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगामा सुरु मुंबई : दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे ऊसाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. मात्र, त्यामुळे राज्यात साखरेचा तुडवटा निर्माण होणार असल्याची चिंता नाही. कारण राज्यात दोन वर्षे पुरेल इतकी 70 लाख मेट्रीक टन साखर शिल्लक आहे, अशी माहिती … Read more

एफआरपीत वाढ का नाही- राजू शेट्टी

कोल्हापूर : कृषी मुल्य आयोगाकडून उसदराचे धोरण ठरवित असताना उसाच्या उत्पादन खर्चावर उसदर ठरविला जातो का ? असे असेल तर गेल्या दोन वर्षात उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ होऊनही कृषी मुल्य आयोगाने एफआरपी दरात वाढ का केली नाही. जर साखरेच्या बाजारभावाचा विचार होऊन उसदर ठरत असेल, तर गेल्या वर्षापासून साखरेचे दर 200 रूपये वाढले असतानाही एफआरपी … Read more