अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादनात घट

औरंगाबाद – गतवर्षी देशात कमी पाऊस झाल्याने अनेक राज्यात दुष्काळ पडला. याउलट महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम राज्यातील उसाच्या उत्पादनावर झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादनात घट झाली आहे. महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन 2021-22 मधील 137.28 लाख टनांवरून चालू गळीत हंगाम 2022-23 मध्ये 124 लाख टनांपर्यंत घसरले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्‍टर जमिनीवरील … Read more

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा; मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई – राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. 15 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री … Read more

जागतिक बाजारात साखरेचे उत्पादन कमी झाल्याने भारतीय साखरेला चांगला भाव

मुंबई – ऊस उत्पादक आणि साखर उत्पादकांना या वर्षी बऱ्यापैकी फायदा होण्याची शक्‍यता वाढली आहे. जागतिक बाजारात साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे भारतीय साखरेला चांगला भाव मिळणार आहे. यावर्षी साखर निर्यात वाढेल. देशांतर्गत मागणीवर कसलाही परिणाम झालेला नाही. त्यामुळे साखर कारखान्याकडील अतिरिक्त साखर साठा या वर्षी कमी होईल. त्याचबरोबर साखर कारखान्यांना साखर कमी दरात निर्यात करण्याची … Read more

साखर उत्पादनात वाढ 24 टक्के वाढ; महाराष्ट्रात वाढ होऊन आतापर्यंत…

नवी दिल्ली – 15 नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भारतात साखर उत्पादनात 24 टक्के वाढ होऊन 21 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचे उत्पादन वाढत असल्यामुळे साखरेची निर्यातही वाढत असून 25 लाख टन साखर निर्यात करण्याचे कॉन्ट्रॅक्‍ट झाले असल्याची माहिती साखर उत्पादकाच्या संघटनेने दिली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसह दक्षिणेतील राज्यात गाळप लवकर सुरू झाल्यामुळे साखरेचे उत्पादन … Read more

साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे : गृहमंत्री वळसे- पाटील

पुणे  :  राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती, आसवनी प्रकल्प, औद्योगिक रसायने आदींच्या उत्पादनातून कारखान्यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केले. कासारसाई (ता. मुळशी) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या चोविसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या … Read more

इथेनॉलचे उत्पादन वाढणार; साखरेच्या उत्पादनावर होणार अल्प परिणाम

नवी दिल्ली- आगामी काळात साखरेचे उत्पादन काही प्रमाणात कमी होणार आहे. साखरेसाठी लागणाऱ्या उसाचा वापर इथेनॉल निर्माण करण्यासाठी वाढणार असल्यामुळे हा परिणाम होणार असल्याचे केंद्रीय अन्न सचिव सुबोध कुमार सिंह यांनी सांगितले. ब्राझीलनंतर भारत जगातील साखर उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारत आपल्या गरजेपेक्षा जास्त साखर निर्माण करतो. त्यामुळे साखरेला भाव मिळत नाही. यासाठी … Read more

उसाच्या दरावर परिणाम शक्‍य

साखरेच्या दराच्या प्रमाणात उसाचे दर ठरविण्याची शिफारस साखर कारखाने नफादायक करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न नवी दिल्ली – साखर उद्योगाची निकोप वाढ होण्यासाठी उसाचे दर साखरेच्या दराशी संलग्न करण्याची गरज असल्याची शिफारस निती आयोगाच्या कृती समितीने केंद्र सरकारला केली आहे. त्यामुळे साखरेच्या दराच्या प्रमाणात उसाच्या दरावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. साखर उद्योगावर अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी रमेशचंद्र … Read more

साखर उत्पादन वाढणार 12 टक्‍क्‍यांनी

मुंबई – ऑगस्ट 2020 ते सप्टेंबर 2021 या साखर वर्षांमध्ये साखरेचे उत्पादन 12 टक्‍क्‍यांनी वाढून 30.5 दशलक्ष टन होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उसाचे उत्पादन जास्त झाल्यामुळे साखर उत्पादन वाढणार आहे. इथेनॉलसाठी ऊस उपलब्ध होऊनसुद्धा साखरेचे उत्पादन वाढेल, असे ईक्रा या संस्थेने म्हटले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उसाचे उत्पादन कमी झाले होते. … Read more

…तर ग्राहकांसाठी साखर ‘कडू’

पुणे – साखरेच्या भावात कारखानदारांनी क्विंटलमागे 50 रुपयांची वाढ केली आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात साखरेचे भाव वाढले आहेत. साखर कारखान्यांकडून शासनाकडे दोन रुपये वाढीची मागणी होत असल्याने साखरेचे भाव 42 रुपयांपर्यंतही जाऊ शकतात, असे साखरेचे व्यापारी विजय गुजराती यांनी मंगळवारी सांगिले. घाऊक बाजारात क्विंटलच्या भावात सुमारे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. या भाववाढीनंतरही … Read more

साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारचा ‘गोड’ निर्णय

किमान विक्री दरात वाढ करण्याचे विचाराधीन पुणे – कोविड-19मुळे देशातील साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांमध्ये झालेले साखरेचे उत्पादन अतिरिक्त ठरले असून निर्यातीचे प्रमाणही कमी असल्याने कारखान्यांकडून साखर पडून असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांची तब्बल 22 हजार कोटींची बिले थकली आहेत, त्यामुळे साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार … Read more