satara | किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या सोसायटी

सातारा, (प्रतिनिधी) – किसन वीर आणि खंडाळा कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या सोसायटी कर्जखाती 30 कोटी रुपये जमा केल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, किसन वीर व खंडाळा कारखान्यात पाच लाख 58 हजार 304 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. दोन्ही कारखान्यांच्या शेतकर्‍यांच्या नावांवर … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; एफआरपीमध्ये 8 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – एमएसपी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (21 फेब्रुवारी) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यात ऊस खरेदीच्या किंमतीत 8 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारची केली आहे. या ऊसाची किंमत … Read more

Narendra Modi on sugarcane farmers | शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान केंद्राची ५ कोटी शेतकऱ्यांना भेट, ऊस खरेदी दरात ‘मोठी वाढ’

Delhi farmers movement

Narendra Modi on sugarcane farmers | शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने निवडणुकीपूर्वी देशातील ५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. हे ५ कोटींहून अधिक शेतकरी दुसरे तिसरे कोणी नसून ऊस पिकवणारे आहे. सरकारने बुधवारी 2024-25 हंगामासाठी उसाची एफआरपी 25 रुपयांनी वाढवून 340 रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली. ऑक्टोबरपासून नवीन उसाचा हंगाम सुरू होतो. रास्त आणि … Read more

अहमदनगर – ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी परिसंवाद व चर्चासत्र

कोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी व ऊस विकास विभागामार्फत कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कामगार पतपेढीच्या कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल परिस्थितीत खोडवा ऊस व्यवस्थापन व जमीन सुपीकता व्यवस्थापन या विषयावर शेतकरी परिसंवाद व चर्चा सत्र पार पडले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ.अभिनंदन पाटील व डॉ. समाधान … Read more

पुणे जिल्हा: ऊस बिलातून वाढीव पाणीपट्टीची नो कपात

ओझर – कुकडी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी दरामध्ये सहापटीने भरमसाठ, अशी दरवाढ केली असून ही पाणीपट्टीची रक्कम ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून कपात करुन मिळणेबाबत कारखान्यास कळविले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी दरामध्ये वाढ करुन या पाणीपट्टीची वसूली कारखान्यामार्फत ऊस बिलातून करण्याच्या शासनाच्या निर्णया विरोधात ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये प्रचंड विरोध आहे. वाढीव दराने आकारलेल्या पाणीपट्टीची वसूली शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार; मजूर, वाहतूकदारांच्या मनमानीला लगाम

पुणे – ऊस तोडण्यापूर्वी शेतकऱ्याकडे रोख बक्षीस, मांसाहाराचे जेवण अथवा मद्याची मागणी करणे, ऊसाची तोडणी व्यवस्थित न करणे, हलगर्जीपणे ऊस पेटविणे, तोडलेल्या ऊसाच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यालाच ट्रॅक्‍टर मागणे अशा विविध अनुचित प्रकारांना पायबंद घालण्यासाठी साखर आयुक्‍तालयाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत ऊसतोडणी व वाहतुकीसंदर्भात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी तेरा सदस्यांच्या … Read more

Agriculture News : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई  : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरऊर्जेवर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे (दि. 29, मंगळवार) बैठक झाली. या … Read more

FRPची रक्कम न दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी संतापले; साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड

सोलापूर – राज्यात अस्मानी संकट आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच सोलापूरमध्ये ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतापले आहेत. संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित बार्शी तालुक्‍यातील उपळाई ठोंगे येथील इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. ऊसाच्या एफआरपीची रक्कम न मिळाल्यामुळे सोलापूरमधील ऊस उत्पादक शेतकरी कमालीचे संतापले आहेत. साखर कारखान्यांकडून … Read more

ऊसकरी शेतकरी हे पंतप्रधानांचे वैरी आहेत काय? 

कोल्हापूर – केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या सवलतीच्या पॅकेजमध्ये ऊसकरी व बागायती शेतकऱ्यांची दखलच घेतलेली नाही. ऊसकरी व बागायती शेतकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे साता -जन्माचे वैरी आहेत काय? असा सवाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून सातत्यपूर्वक ऊसकरी व बागायती शेतकरी बेदखल होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. … Read more

उसाला तुरे आल्याने चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर

जनावरांचे हाल; ऊस उत्पादनातही घट कराड – कराड तालुक्‍यातील बहुतांश परिसरात उसाला तुरे आल्याने उत्पादनात घट होत आहेच, शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. चारा टंचाईमुळे त्रस्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी गुरे विकली आहेत. चारा टंचाईची धग येत्या काळात वाढण्याची शक्‍यता आहे. कराड तालुका हा मुख्यतः ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. यंदा कराड तालुक्‍यात मोठ्या … Read more