उन्हाळा आणि आयुर्वेद

आयुर्वेद शास्त्र हे निसर्गनियमांना अनुसरून राहणीमान कसे ठेवावे, हे अत्यंत प्रभावीपणे सांगते. पृथ्वीवरील निसर्गाचे चक्र कसे चालते, त्याचे मानवी शरीरावर काय परिणाम घडतात व त्यानुसार आहार-विहार कसा असावा, यासाठी साचेबद्ध असे नियम आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल सध्या वाढणाऱ्या दुपारच्या उष्म्याने येऊ लागली असेलच! त्याची झळ सौम्य व्हावी यासाठी जीवनशैलीत बदल करणे … Read more

उन्हाच्या गरमीत राजकारण तापणार; उष्णतेचा पारा वाढणार, निवडणूक आयोग सतर्क

Election Commission | Summer Temperature – देशाच्या काही भागांमध्ये येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, याचा मतदानाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम हेाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने सोमवारी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध संबंधीतांची बैठक घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे या बैठकीला उपस्थित … Read more

पिंपरी | बस थांब्याअभावी प्रवासी उन्हात

पिंपरी,(वार्ताहर) – पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश पीएमपी मार्गावर बस थांबे नाहीत. सध्या उन्हाळा सुरू आहे. घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशा उन्हातान्हात शहरातील पीएमपी प्रवाशांना बसची वाट पाहत उभा राहवे लागत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मुख्य रस्त्यांवर जेथे बस थांबा उघडा आहे तेथे नवीन बस थांबा उभारावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. पिंपरी … Read more

पुणे जिल्हा | ओसाड माळरानावर पाण्याची सोय

ऐन उन्हाळ्यात पाळीवप्रण्यासह वन्यप्राण्यांसाठी ठरला नवसंजीवनी गराडे (वार्ताहर)- कानिफनाध गडाच्या खोर्‍यात असलेल्या डोंगर खोर्‍यातील कडजाई पाझर तलाव हा गळाने भरलेला होता. त्या तलावतील पूर्ण गाळ व खोलीकरण करून तलाव मजबूत केला. त्याचबरोबर त्या तलावात दोन ठिकाणी 30 बाय 30 चे खोदकाम करून त्यात पाणी लागले असल्याने ओसाड माळरान व डोंगरी भागात कोठेही पाणी नसल्याने सर्वच … Read more

पिंपरी | ४५ गावांतील ६५ हजार ग्राहक उकाड्याने त्रस्त

पिंपरी,(प्रतिनिधी) – उन्हाची काहीली वाढली असून तापमानाचा पारा ४०च्या पुढे गेला आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले असतानाच महापारेषणच्या वाहिन्यांमध्ये विविध कारणांनी बिघाड होत असून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे अधीच उकाड्याने त्रस्त झालेल्या ग्राहकांना महावितरण वीजपुरवठा खंडित करून झटके देत आहे. महापारेषणची एक वाहिनी तुटल्याने भुकूम, भूगाव, पिरंगुट, कोळवण खोरे, मुठा खोरे आदी मुळशी परिसरातील … Read more

satara | सातारा पालिकेचा जलतरण तलाव बंदच

सातारा, (प्रतिनिधी)- लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासकांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे भवानी तलाव अर्थात सातारा पालिकेचा जलतरण तलाव गेली अकरा वर्ष बंदच आहे. तलावाच्या अद्ययावतीकरणाची इच्छाशक्ती नसल्यामुळे अल्प दरात उपलब्ध होणारा जलतरण तलाव कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. राजवाड्याजवळील नगरपालिकेच्या या तलावात अनेक जण पोहणे शिकले. दरवर्षींच्या उन्हाळ्यात बच्चेकंपनीसह विविध वयोगटातील … Read more

पुणे जिल्हा | उन्हाच्या झळांसोबत प्रचाराचे रण तापले

वडापुरी, (वार्ताहर) – एकीकडे महाविकास आघाडी व महायुती यांची बारामती लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली असून महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध जोरदार रंगल्याने राजकीय वातावरण तापले असताना, उन्हाच्या तीव्र झळा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ‘रण’ अधिकच तापवणार्‍या ठरत आहेत. मार्चअखेर कमाल तापमान 39 अंशांवर पोहोचल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता काय असेल, या विचारानेच उमेदवार, इच्छुक … Read more

पुणेकरांना उन्हाचे चटके ! पारा ४१ च्या पुढे…

उपनगरांतही उन्हाचा चटका वाढला पुणे – शहरातील उन्हाचा पारा पुन्हा वाढू लागला असून शहराच्या मध्यवर्ती भागातील कमाल तापमान ४०च्या उंबरठ्यावर आले आहे. तर शहरातील उपनगर आणि जिल्ह्यातील काम तापमान 42 अंशापर्यंत पोहचल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसात उन्हाचा चटका आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल. काही … Read more

कडक उन्हाळ्यात बंगळुरू शहराला पाण्याच्या संकटाचा सामना

बेंगळुरू – गेल्या काही काळापासून कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहराला पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानामुळे हे पाणी संकट अधिकच गंभीर झाले आहे. अशा परिस्थितीत बंगळुरूच्या जनतेला दुहेरी फटका बसत आहे. बेंगळुरू सध्या विक्रमी उच्च तापमानाशी झुंज देत आहे, ज्यामुळे रहिवाशांना त्यांची दैनंदिन दिनचर्या बदलण्यास भाग पाडले जात आहे. अशा स्थितीत आयटी … Read more

पुणे | उभे राहू पण एसी बसमधूनच जावू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उन्हाचा वाढता चटका आणि उकाड्यामध्ये प्रवाशांना एसी बसचाच प्रवास सुखकर वाटत आहे. त्यामुळेच बसस्टाॅपवर साधी बस आली तरी त्याएवजी एसी बसमध्ये प्रवास करण्यावर प्रवाशांचा भर आहे. एसी बसमध्ये गर्दी असली तरी उभे राहून जावू पण एसीमधूनच जावू, अशा विचारातून साध्या बस मात्र बऱ्यापैकी रिकाम्या धावताना दिसत आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून … Read more