नगर | आदिवासी बांधवांनी योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी

राहाता, (प्रतिनिधी) – प्रत्येक आदिवासी बांधवांनी आपल्या घरापासूनच व्यसन, अंधश्रद्धा याला फाटा देत शिक्षणाच्या माध्यमातून व आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधली पाहिजे, असे आवाहन आदिवासी नेते शिवाजीराव गांगुर्डे यांनी केले. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदिवासी एल्गार महिला मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. … Read more

काळजाचा थरकाप उडवणारी घटना; पोटदुखीमुळे पाच दिवसाच्या बाळाने फोडला टाहो ; आई-वडिलांकडून चिमुरड्याला बिब्बा गरम करुन चटके

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी घटना उघडकीस आली आहे.  पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत होते. मात्र त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यापेक्षा जन्मदात्या आई-वडिलांनी त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले, ज्यात बाळाची प्रकृती आणखी बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. घाटंजी तालुक्यातील … Read more

अबाऊट टर्न : कीड

विवेक आणि विज्ञाननिष्ठेचा मार्ग सांगण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं, त्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या आसपास पुणे आणि सातारा या त्यांच्या कर्मभूमीत काय घडलं? शिक्षणाशी संबंध नसलेल्यांची बातच सोडा; परंतु सुशिक्षितांनी तरी अंधश्रद्धेचा पदर सोडला का? व्यवसायाची भरभराट व्हावी आणि घरात सुख-शांती नांदावी, यासाठी शिकली-सवरलेली माणसं काय करताहेत? घरात जिच्यामुळे सुख-शांती येते, तिलाच मांत्रिकाच्या सांगण्यावरून … Read more

क्रिकेट काॅर्नर : हवामान खाते ही अंधश्रद्धा आहे का?

बीसीसीआय किंवा आयपीएल समितीत जे थिंकटॅंक म्हणून बसले आहेत, त्यांना भारतीय हवामान खाते ही अंधश्रद्धा वाटते का? हा प्रश्‍न पडण्याचे कारण म्हणजे जेव्हा बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेच्या साखळी सामन्यांनंतर प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर केले तेव्हाच एका प्रसिद्ध संकेतस्थळावर एक वृत्त वाचनात आले होते. पश्‍चिम बंगालमध्ये मे महिन्याच्या 15 तारखेनंतर जवळपास 30 तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तवली गेली … Read more

अंधश्रद्धा ! अमर झाल्याचं म्हणत, महंतांनी शिष्याला सांगितलं माझ्यावर वार कर अन्…

अहमदाबाद – जन्म आणि मृत्यू यावर आतापर्यंत अनेक अंदाज बांधण्यात आले आहेत. मात्र मृत्यूचं कोडं अद्याप माणसाला उमगलं नाही. शास्त्रात अनेकठिकाणी अमरत्वाचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे अनेकांना अमर व्हाव अर्थात मृत्यूवर विजय मिळवावा वाटतो. आध्यत्म त्याचा मार्ग असू शकतो, अशीही अनेकांची भावना आहे. मात्र याच अंधश्रद्धेतून गुजरातमध्ये एका महंताला आपला जीव गमवावा लागला. भावनगरच्या गडा … Read more

#ENGvIND 3rd Test : कोहलीची अंधश्रद्धा संघाला भोवली

हेडिंग्ले – विजयी संघ कायम ठेवायचा ही भारतीय कर्णधार विराट कोहलीची अंधश्रद्धा संपूर्ण संघाला भोवली. नाणेफेक करण्यापूर्वी खेळपट्टी पाहिल्यावर तसेच संघात चार वेगवान गोलंदाज असताना आणि वातावरणही वेगवान गोलंदाजीला मदत करणारे असतानाही कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याऐवजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका संघाला बसला. तिसऱ्या सामन्यापूर्वी कोहलीने खेळपट्टी पाहिली होती. खेळपट्टीवर फारसे गवत राखलेले नव्हते, … Read more

पाचव्या मुलाच्या इच्छेपोटी अंधश्रद्धेतून 8 वर्षीय मुलीची बापानेच केली हत्या; आधी काढले डोळे नंतर…

पाटणा – अंधश्रद्धेतून बापानेच 8 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मुलीचे डोळे काढून त्यापासून ताईत बनविला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील पदम गावातील सफियाबाद पोलिस स्टेशनच्या हद्दित घडली आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. दिलीप कुमार असे आरोपी वडीलाचे … Read more

ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर लिहून झाडावर लटकवली; जादूटोण्याचा धक्‍कादायक प्रकार

टाकवे बुद्रुक – राज्यात अनेक ठिकाणी समाजसुधारक सामाजिक संघटना अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करीत आहेत. तर दुसरीकडे झाडावर व्यक्तींची नावे लिंबावर लिहून खिळा लावून झाडाला लटकवला. हा धक्‍कादायक प्रकार आंदर मावळातील टाकवे गावाजवळील इंद्रायणी नदीजवळील भैरवनाथ मंदिराच्या ठिकाणी घडला. सोमवारी (दि. 9) ही बाब निदर्शनास आली. या प्रकरणी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य अविनाश मारुती असवले यांनी … Read more

मेळघाटात अंधश्रद्धेतून बाळाला गरम विळ्याचे चटके

अमरावती – अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी गावात झालेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याचे चटके दिले आहेत. अंधश्रद्धेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरून आई-वडिलांनी बाळाच्या पोटावर विळ्याने शंभर चटके दिले. या प्रकारामुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. चिखलदरा पोलिसांनी मांत्रिक आणि बाळाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक … Read more

अंधश्रद्धेचा कहर; ८ महिन्याच्या बाळाच्या पोटावर गरम विळ्याने चटके

अमरावती : ८ महिन्याच्या बाळाच्या पोटावर  १०० चटके दिल्याची धक्कादायक घटना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आदिवासी भागात घडली आहे. बोरदा गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तांत्रिकाच्या सांगण्यावरून आजारी बाळाच्या पोटावर आई वडिलांनी गरम विळ्याने एक दोन नाही तर तब्ब्ल १०० चटके दिले. एका ८ महिन्याच्या बाळाला अंधश्रद्धेला बळी पडावे लागले आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात … Read more