पुणे | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणाचा निकाल अकरा वर्षांनी लागला. यात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याने गुन्ह्याचा कट रचल्याच्या संशयाला वाव असला, तरी ते पुराव्याद्वारे सिद्ध करण्यात … Read more

पुणे | साधक निर्दोष असल्याचे सिद्ध

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालातून सनातन या संस्थेचे साधक निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, सनातन संस्था ही हिंदू आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचा अर्बन नक्षलवाद्यांचा डाव फसला आहे, असा दावा सनातन संस्थेतर्फे करण्यात आला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सनातन संस्थेतर्फे पत्रकार … Read more

पुणे | डाॅ. दाभोलकर खून खटल्याचा निकाल दि. १० मे रोजी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला. घटनेच्या तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू झाला. खुनाचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ जणांविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला … Read more

पिंपरी | महिलेच्‍या केसातील जट काढत केले समुपदेशन

पिंपरी, (प्रतिनिधी) – थेरगाव येथील आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या तरुणीच्या पुढाकाराने आईच्या केसात अनेक वर्षे असलेली जट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी काढली आहे. त्यामुळे आठ वर्षे जोपासलेली जट काढल्यानंतर त्या महिलेच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. अॅड. मनीषा महाजन, क्रांती पोतदार, विकास सूर्यवंशी, गणेश तामचिकर, संजय निकम, सायली पांचाळ या … Read more

Pune : हवेली पोलीस ठाण्यापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यव्यापी जनसंवाद यात्रेला सुरुवात

खडकवासला – आज (दि. २१) पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यव्यापी जनसंवाद यात्रेला हवेली पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली. या यात्रेच्या माध्यमातून राज्यात २०१३ साली अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कायद्याची जनजागृती करण्यात येणार आहे. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. भोंदू बाबा कश्या प्रकारे नागरिकांची दिशाभूल करुन फसवतात हे प्रात्यक्षिके प्रशांत … Read more

“ग्रहण हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ असतो; गरोदर महिलेला ग्रहण पाळण्याची सक्ती करू नका” – अंनिस

पुणे – ऐन दिवाळीत 25 ऑक्‍टोबर ला सायं. 4. 50वाजता खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. यावेळी 36 टक्के सूर्य झाकला जाणार आहे. ग्रहण हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी च्या सावल्याचा खेळ असतो. यावेळी ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण’ ही अंनिसने प्रबोधन मोहिम सुरु केली आहे. यामध्ये सांगली मिरज स्रीरोग तज्ञ संघटना ही सहभागी झाली आहे. या दोन्ही संघटनांनी … Read more