पुणे जिल्हा | बारामतीत सुपर पेसमेकर शस्त्रक्रिया यशस्वी

बारामती, (प्रतिनिधी)- येथील गिरीराज हॉस्पिटल (डॉ. भोईटे हॉस्पिटल) येथे यशस्वीरित्या पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी पहिल्यांदाच कार्डियाक रेसिन्क्रोनायसेशन विथ डिफिब्रिलेटर (सुपर पेसमेकर) शस्त्रक्रिया पार पडली. याबाबत गिरीराज हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. रमेश भोईटे यांनी माहिती सादर केली. दि. २७ मार्च रोजी गिरीराज हॉस्पिटलमध्ये डॉ. भोईटे यांना डॉ. हरिश्चंद्र अर्जुन ठोंबरे (रा. वाई, सातारा) हे भेटले, त्यांनी व्यथा … Read more

पिंपरी | शस्‍त्रकि्रयेसाठी जास्‍त वाट पहावी लागणार नाही

पिंपरी, (प्रतिनिधी) – अनेकदा रुग्णसंख्या वाढल्यानंतर अत्‍यंत निकडीच्‍या शस्त्रकि्रयांना प्राधान्‍य दिले जाते आणि कमी निकडीच्‍या शस्त्रकि्रयेसाठी आलेल्या रुग्णांना वेदना सहन करत प्रतीक्षा करावी लागते. परंतु आता महापालिकेच्‍या जिजामाता रुग्णालयातील हे चित्र बदलणर असून आणखी दोन शस्त्रकि्रया कक्ष (आॅपरेशन थिएटर) सुरु करण्यात येणार आहेत. सध्या एक शस्त्रक्रिया कक्ष आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता आणखीन दोन विभाग … Read more

पिंपरी | स्पायनल कॉर्ड ट्युमरवर यशस्‍वी शस्त्रक्रिया

पिंपरी, (प्रतिनिधी) – १६ सेंटीमीटर स्पायनल कॉर्ड ट्युमरवर यशस्‍वी शस्त्रक्रिया करून रुग्णाचा जीव वाचविण्यात भोसरीतील मेडिकव्हर हॉस्पिटलच्‍या तज्‍ज्ञांना यश आले आहे. डॉ. निनाद पाटील यांचा सल्ला घेऊन एका रुग्णाचा एमआरआय करण्यात आला. त्‍या वेळी ट्युमर असल्‍याचे स्‍पष्ट झाले. या वेळी सी २ ते डी 6 लॅमिनोप्लास्टी सूक्ष्म शस्त्रक्रिया करून रुग्णाला बरे करण्यात यश आल्‍याची माहिती … Read more

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज; पार पडली शस्त्रक्रिया, वाचा हेल्थ अपडेट

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला काल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेव्हा त्याचे चाहते सतत सैफ अली खानच्या तब्येतीचे अपडेट्स विचारत होते. काल अचानक रुग्णालयात दाखल झाल्यामुळे सगळेच काळजीत पडले होते. मात्र, त्याला शस्त्रक्रियेसाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तो घरी परतला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ … Read more

ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्यावर होणार शस्त्रक्रिया

लंडन  – ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्यावर पुढील आठवड्यात प्रोस्टेट ग्रंथींशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बकिंगहॅम राजवाड्याच्या सूत्रांनी ही माहिती दिली. राजे चार्ल्स यांना होत असलेला त्रास ही एक सर्वसामान्य बाब असून त्यामध्ये काहीही गंभीर नाही.दरवर्षी शेकडो पुरुषांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येत असते, असेही राजवाड्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर … Read more

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर शस्त्रक्रिया; रुग्णालयात केले दाखल

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या डावा गुडघा आणि खांद्याच्या नियमित तपासणीसाठी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला हेलिकॉप्टरमधून उतरताना त्यांना दुखापत झाली होती. एसएसकेएम हॉस्पिटलच्या वुडबर्न ब्लॉकमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्या हेलिकॉप्टरला आयएएफ हेलिपॅडवर (सिलीगुडीजवळ) इमर्जन्सी लँडिंग करावे लागले तेव्हा … Read more

PUNE: प्रोस्टेट ग्रंथीवर अवघ्या दहा मिनिटांत शस्त्रक्रिया शक्य

पुणे – प्रोस्टेट ग्रंथीवर अवघ्या दहा मिनिटांत विना त्रासदायक शस्त्रक्रिया करून काही तासांत डिस्चार्ज देणे आता शक्य आहे. ‘रिझूम थेरपी’ या नव्या तंत्रज्ञानामुळे बाणेर येथील युरोकुल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये भारतातील ही पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामुळे रुग्ण काही तासांत डिस्चार्ज घेऊन घरी गेला, अशी माहिती ‘युरोकुल’चे संस्थापक व युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, प्रख्यात युरॉलॉजिस्ट … Read more

चहा-बिस्किट नाही म्हणून डॉक्‍टरने शस्रक्रिया सोडली; नागपूरमधील धक्कादायक प्रकार

Nagpur – चहा-बिस्किट मिळाले नाही म्हणून डॉक्‍टरांनी ऑपरेशन न केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. यानंतर संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वरिष्ठांनी दुसऱ्या डॉक्‍टरांची व्यवस्था केली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी चौकशी … Read more

मुलाचे अपघातात शरीरापासून वेगळे झाले होते डोके; डॉक्टरांनी चमत्कार घडवत दिले मुलाला जीवनदान

इस्रायली डॉक्टरांनी असा चमत्कार करून दाखवला आहे की, त्याबद्दल सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. खरंतर एका मुलाचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याचे डोके शरीरापासून वेगळे झाले. त्याच्या जगण्याची फारशी आशा नव्हती. त्याचे डोके फक्त त्वचेला चिपकलेले होते, पण खूप प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी सर्जरी करत त्या मुलाचे प्राण वाचवले. टाईम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, पॅलेस्टाईनचा रहिवासी असलेला 12 वर्षीय … Read more

Shahrukh Khan Accident : सेटवर शाहरुख खानचा झाला मोठा अपघात; करावी लागली सर्जरी

मुंबई –  बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा अमेरिकेत अपघात झाला आहे. तो चित्रपटाच्या सेटवर एक सीन शूट करत होता, त्याच दरम्यान ही घटना घडली. या अपघातात शाहरुख खानच्या नाकाला दुखापत झाली. शाहरुखला यानंतर त्वरित जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे शाहरुखवर सर्जरी करण्यात आली. शाहरुखची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगण्यात येत असून तो मुंबईला परतला आहे. शूटिंगदरम्यान … Read more