पुणे | पुण्यात ढगफुटी, तासाभरात पाणीचपाणी!

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात मान्सूनपूर्व पावसाने अवघ्या तासाभरात शहर जलमय केले. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार वडगावशेरीत अवघ्या तासाभरात तब्बल ११४ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे धानोरीत मुख्य रस्त्यावर तब्बल चार फुटांपेक्षा अधिक पाणीसाचून तळी साचली होती. तसेच लक्ष्मीनगर येथे डोंगरावरून आलेले पाणी थेट रस्त्यावर आल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरण्यासह चारचाकी वाहनेही अडकून पडली होती. … Read more

पुणे | मेट्रे स्टेशन नावाबाबत वाद नको : माजी महापौरांची मागणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मेट्रो स्थानकांच्या नावावरून राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आलेला वाद निरर्थक असून या वरून वाद निर्माण करू नये, असे आवाहन माजी महापौर संघटनेने व्यक्त केले आहे. शहरात मेट्रोची सेवा सुरू झाल्यानंतर महामेट्रोने स्थानकांना देण्यात आलेल्या नावांवरून वाद सुरू झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वारगेट ते सिव्हील कोर्ट या मेट्रोच्या भुयारी … Read more

PUNE: ई-शिवाई बसची सेवा स्वारगेट आगारातून

पुणे – शिवाजीनगर पाठोपाठ आता स्वारगेट एसटी आगारातून ई-शिवाई बस सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातून शिवाजीनगर आगारातून नाशिकसाठी १६ ई-शिवाई बस १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली होती. दर एक तासाला शिवाजीनगर येथून ई-शिवाई बस सुरू होती. पण, स्वारगेट येथून नाशिकला ई-शिवाई बस सुरू करावी, अशी मागणी … Read more

गोळीबार करणारा ‘आई’मुळे सापडला; स्वारगेट परिसरात बेछुट गोळीबार करुन चार लाख लूटले

पुणे – स्वारगेट भागात तंबाखू व्यापाऱ्यावर गोळीबार करुन चार लाखांची रोकड हिसकावणाऱ्या चोरट्याला पर्वती पोलिसांना अटक केली. वाहन क्रमांकाच्या पाटीवर लिहिलेल्या नावावरुन पोलिसांनी तपास करुन गोळीबार करणाऱ्या आरोपीला पकडले. सूरज वाघमोडे (21, रा. भुंडे वस्ती, बावधन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाघमोडे मार्केट यार्डात मजूरी करतो. चार दिवसांपूर्वी मंडई भागातील तंबाखू व्यापारी घरी निघाला … Read more

पुणे : स्वारगेट ते कात्रजपर्यंत मेट्रो धावणार

कात्रज/पुणे –पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मेट्रो मार्गिकेचा स्वारगेटपासून पुढे कात्रजपर्यंत विस्तार करण्यास महापालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी दिली अूसन स्वारगेट-कात्रज हा विस्तारित मार्ग भुयारी असेल, पालिकेने मान्य केलेला प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार आहे. याबाबत नगरविकास विभागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचनाही केल्या असल्याने स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो … Read more

स्वारगेट परिसरात वाहतूक मार्गात बदल, ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर

पुणे – स्वारगेट येथे सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामासाठी टिळक रस्त्यावरून सारसबागेकडे जाणारा ए. आर. भट्ट मार्ग पूर्वेकडील गेटपासूनचा रस्ता पुढील आदेशापर्यंत बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. स्वारगेट विभागात मेट्रोतर्फे देशभक्‍त केशवराव जेधे चौक ते सारसबाग रोडदरम्यान वेस्ट सबवेचे काम करण्यासाठी 29 जुलैपासून पुढील आदेशापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर … Read more

Pune Metro : शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि स्वारगेट ते सासवड पर्यंत मेट्रो मार्गांचा होणार विस्तार

हडपसर (विवेकानंद काटमोरे) – शिवाजीनगर ते हडपसर मेट्रो मार्गाचा लोणी काळभोर पर्यंत विस्तार करावा. तसेच स्वारगेट ते हडपसर असा मेट्रो मार्ग करण्याची मागणी गतवर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह आमदार चेतन तुपे पाटील यांनी केली होती. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

स्वारगेट बस स्थानकात आईसोबत झोपलेल्या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

पुणे – स्वारगेट बस स्थानक परिसरात आईसोबत झोपलेल्या एका चार वर्षाच्या मुलीचे गुरूवारी मध्यरात्री अपहरण झाले होते. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ तिचे फोटो आणि माहिती व्हॉट्स ऍपवरून व्हायरल केले. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची दहा पथके मुलीचा शोध घेत असतांना एका तरुणाला फोटत दिसणारी मुलगी सासवड पीएमपी बस स्थानकावर एका व्यक्तीसोबत दिसली. … Read more

उत्पन्न हिस्सा देण्यास महामेट्रोचा महापालिकेला नकार

पुणे – स्वागरेट येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिमॉडेल हबमधील उत्पन्नाचा हिस्सा महापालिकेस देण्यास महामेट्रोने नकार दिला आहे. तूर्तास या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी महामेट्रोचे प्राधान्य आहे. केंद्र व राज्यशासनाने याबाबत निर्णय घेणे उचित होईल, असे महामेट्रोने महापालिकेस कळविले आहे. हा अभिप्राय स्थायी समितीने मान्य केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.  महापालिकेची जागा … Read more

वाहतुकीने स्वारगेटचीच ‘कोंडी’, पुणेकरांच्या डोक्याला ताप

पुणे – स्वारगेटच्या मुख्य चौकात वाहतूक कोंडी हा नित्याचाच प्रश्न झाला आहे. स्वारगेटहून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेट्रोने बॅरिकेडिंग केले आहे. यातच एसटी आणि पीएमपी बसेसच्या रांगा आणि खासगी वाहनांची गर्दी यामुळे केवळ गर्दीच्या वेळातच नव्हे, तर भर दुपारीदेखील कोंडी होत आहे.   कात्रज रस्त्यावरील एसटी आगाराजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. तीन मार्गांनी चौकात येणाऱ्या दुचाकी … Read more