वयाच्या १६ वर्षांनंतर लिंग परिवर्तनाला स्वीडनमध्ये मान्यता

स्टॉकहोम, (स्वीडन) – लिंग परिवर्तन करण्याला स्वीडनच्या संसदेने आज कायदेशीर मंजूरी दिली. लिंग परिवर्तन करण्याची शस्त्रक्रीया करण्यासाठी आवश्‍यक असलेली वयोमर्यादा आता १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्यात आली आहे. आतापर्यंत लिंग परिवर्तन करू इच्छिणार् या १८ वर्षांखालील युवक-युवतींना ही शस्त्रक्रीया करण्यासाठी पालकांची, डॉक्टरांची आणि राष्ट्रीय आरोग्य आणि कल्याण मंडळाची अनुमती घेणे आवश्‍यक होते. मात्र आता १६ … Read more

स्वीडन, कॅनडाकडून गाझातील मदत पुन्हा सुरू

ओटावा, (कॅनडा) – गाझामध्ये कॅनडा आणि स्वीडनने पुन्हा मदत करायला सुरुवात केली आहे. गाझामध्ये मदत वितरीत करणार् या युनायटेड नेशन्स रिलीफ ऍन्ड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन एजन्सीच्या कर्मचार् यांकडून हमासला मदत केली जात असल्याच्या आरोपांच्या पार्श्‍वभुमीवर अनेक देशांनी या एजन्सीला मदत देणे थांबवले होते. मात्र आता ही मदत पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे कॅनडाचे आंतरराष्ट्रीय … Read more

Sweden On Islam: दहशतवादी हल्ल्याबाबत स्वीडन हाय अलर्टवर; म्हणाले,”आम्हाला इस्लामचे शत्रू म्हणून जगासमोर सादर केले”

Sweden On Islam : मागच्या वर्षी मुस्लिम धर्मियांचे पवित्र कुराण जाळण्यावरून युरोपीय देश स्वीडनमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे जगातील अनेक मुस्लिम देशांनी स्वीडनला विरोध दर्शवला होता. दरम्यान, देशात दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम असल्याची माहिती स्वीडिश सुरक्षा पोलिसांनी  दिली आहे. त्यातच स्वीडन आता हाय अलर्टवर गेल्याची माहिती समोर येत आहे. स्वीडिश सुरक्षा सेवेने एक निवेदन … Read more

नाटोतील स्वीडनच्या सहभागाला तुर्कीयेच्या संसदीय समितीची मंजूरी

अंकारा  – स्वीडनला नाटोचे सदस्य करून घेण्यासाठी तुर्कीयेच्या संसदीय समितीने काल मंजूरी दिली. यामुळे आता नाटोमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने स्वीडनचे एक पाऊल पुढे पडले आहे. स्वीडनच्या नाटो प्रवेशाला तुर्कीयेने यापूर्वी विरोध केला होता. आता हा विरोध मावळला आहे. आता स्वीडनला नाटोचे सदस्य देण्याचा ठराव तुर्कीयेच्या संसदेमध्ये मंजूर होणे गरजेचे आहे. मात्र तुर्कीयेच्या संसदेतील ठराव कधी … Read more

चीनपर्यंत पोहोचणाऱ्या क्षेपणास्त्रांवर भारताचा भर ; स्वीडनमधील आंतरराष्ट्रीय अहवाल

स्टॉकहोम : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आपली अण्वस्त्रे वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. 2022 या वर्षामध्ये दोन्ही देशांनी नवीन प्रकारची अण्वस्त्रे विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यात भारत लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचे निरीक्षण स्वीडनमधील एका आंतरराष्ट्रीय निरीक्षक गटाच्या अहवालामध्ये नोंदववण्यात आले असल्याचे “स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने म्हटले आहे. चीन आणि … Read more

Sex Tournament: स्वीडन देशाने सेक्सला एक खेळ म्हणून दिली मान्यता, लवकरच ‘ही’ स्पर्धा सुरू होणार

देशातून आणि जगातून अनेकदा विचित्र बातम्या समोर येतात, पण स्वीडनमधून समोर येणाऱ्या बातम्या खरोखरच आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. खरं तर, जिथे अनेक देशांमध्ये सेक्सबद्दल उघडपणे बोलण्याची परवानगी नाही, तिथे स्वीडन हा खेळ म्हणून सेक्सची नोंदणी करणारा पहिला देश ठरला आहे. अशा परिस्थितीत आता स्वीडिश सेक्स फेडरेशन 8 जूनपासून पहिल्या युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे. ‘रोज … Read more

स्वीडनबरोबर भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध – उपमुख्यमंत्री फडणवीस

पुणे : महाराष्ट्र आणि पुण्यात नवीन तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान, भविष्यातील तंत्रज्ञान असून महाराष्ट्र स्वीडन बरोबर भागीदारी करण्यास आणि राज्यातील गुंतवणूक अधिक सुलभ करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एसकेएफ कंपनीच्या भारतातील शतकपूर्ती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल, … Read more

नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपसाठी स्वीडनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : “स्वीडन हे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअप उद्योगांसाठी आघाडीवर असलेले एक प्रमुख राष्ट्र आहे. सध्या महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर स्टार्टअप धोरण राबविण्यात येत असून स्वीडनने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांना केले. स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या … Read more

स्वीडनच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा

कोपेनहेगन, (स्वीडन) – स्वीडनमध्ये झालेल्या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या गटाला अल्पशा बहुमताने विजय मिळाल्याने सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या पंतप्रधान माग्दालेना अँडरसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संसदेच्या सभापतींना भेटून अँडरसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहणार आहेत. निवडणुकीत विजयी झालेल्या उजव्या गटामध्ये राष्ट्रवादी, स्थलांतरविरोधी विचार असलेल्या … Read more

स्वीडन, फिनलंडच्या प्रवेशाला नाटोची संमती

ब्रुसेल्स – स्वीडन आणि फिनलंड या देशांच्या “नाटो’मधील प्रवेशाला “नाटो’तील सदस्य असलेल्या 30 देशांनी सहमती दिली आहे. या सर्व देशांचे संमती पत्र “नाटो’कडे पाठवण्यात आले आहे. आता “नाटो’च्या मुख्यालयातून या दोन्ही देशांच्या सहभागाला औपचारिक मान्यता दिली जाणे बाकी आहे. “नाटो’ने गेल्या आठवड्यात झालेल्या परिषदे दरम्यान फिनलंड आणि स्वीडनला सहभागी करून घेण्यासाठी निमंत्रण दिले होते. आता … Read more