पिंपरी | तळेगाव, चाकण परिसरात दीड तास वीजपुरवठा खंडित

पिंपरी, (प्रतिनिधी) – पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) तळेगाव अतिउच्चदाब 400 केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी (दि.26) पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, चाकण, तळेगाव, वडगाव, कामशेत, मरकळ, आकुर्डी या परिसरातील सुमारे 1 लाख 32 हजार 900 ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी 1.49 ते 3.30 या कालावधीत खंडित झाला होता. याबाबत माहिती अशी की, तळेगाव … Read more

पुणे जिल्हा : तळेगावात स्टेट बँकेची बांधिलकी गरजूंना साहित्यांचे वाटप

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे एसबीआय बँक शिक्रापूर शाखेच्या वतीने गरजूंना साहित्यांचे वाटप करण्यात आले. तळेगाव ढमढेरे येथे गीताई विष्णू मंगल कार्यालयात एसबीआय बँकेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. ज्ञानवर्धिनी विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक अंगणवाडी व ज्ञानवर्धिनी … Read more

पिंपरी | भर उन्‍हाळ्यात तळेगावातील हरितछत्र धोक्‍यात

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – भर चौकातील सावली देणारी अनेक झाडे अज्ञाताने कापल्यामुळे भर उन्‍हाळ्यात तळेगावातील हरितछत्र धोक्‍यात आले आहे. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे. माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छ तळेगाव ,सुंदर तळेगाव, हरित तळेगाव, पर्यावरण पूरक तळेगाव आदींसाठी नागरिकांकडून शपथ घेतली जाते. परंतु तळेगाव दाभाडे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगरपरिषदेच्या भिंतीला लागून असलेल्या मारुती … Read more

पिंपरी | तळेगावमध्‍ये सायकल महारॅलीचे आयोजन

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानाची माहिती व प्रसार करण्याच्या हेतूने सायकल महारॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी रॅलीमध्ये मंजू फडके, उपमुख्याधिकारी ममता राठोड, गीतांजली होणमने, सिद्धेश गायकवाड, सुरेश शेंडे, किरण ओसवाल, भगवान शिंदे, दीपक फलले, निलेश … Read more

पुणे जिल्हा | महावितरणकडून चाकण उपविभागाचे विभाजन

चाकण, (वार्ताहर) – महावितरणकडून चाकण एमआयडीसीसह उपविभागातील सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याच अनुषंगाने चाकण उपविभागाचे महावितरणने विभाजन केले आहे. या नव्याने स्थापित केलेल्या चाकण एमआयडीसी उपविभाग आणि अंतर्गत वासूली व निघोजे या दोन शाखा कार्यालयांची निर्मिती केली आहे. नवीन उपविभाग व दोन शाखा कार्यालयांसाठी एकूण 36 तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर … Read more

पुणे | महावितरणकडून चाकण उपविभागाचे विभाजन

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – उद्योगांसह घरगुती, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील सर्व ग्राहकांना आणखी दर्जेदार ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणने चाकण उपविभागाचे विभाजन केले आहे. नव्या रचनेत चाकण एमआयडीसी उपविभाग आणि अंतर्गत वासुली व निघोजे या दोन शाखा कार्यालयांची निर्मिती केली आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले. नवीन उपविभाग व दोन शाखा कार्यालयांसाठी एकूण ३६ तांत्रिक व अतांत्रिक … Read more

पुणे जिल्हा : तळेगावात विष्णू पिंगळेंना अभिवादन

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) जिल्हा पुणे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत यांच्या वतीने विष्णू गणेश पिंगळे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली. याप्रसंगी सरपंच अंकिता भुजबळ, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, … Read more

पुणे जिल्हा : तळेगावात रवींद्र काळे यांचा सन्मान ; जिल्हा नियोजन समितीवर निवड

तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शिफारशीने नुकतीच पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे. नवनियुक्त जिल्हा नियोजन समिती सदस्य काळे यांचा शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तळेगाव ढमढेरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथे कृषी उत्पन्न उपबाजार … Read more

पुणे जिल्हा : तळेगावात कचरा व्यवस्थापनासाठी वाहन खरेदी

आठ लाखांची तरतूद : समस्यांचे निराकारण होणार तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगांमधून गावातील कचरा व्यवस्थापनासाठी नुकतेच ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केली आहे. वाहनाचे लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. आठ लाख वीस हजार रुपयांची खरेदी केली आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनास मदत होेईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी दिली. तळेगाव ढमढेरे … Read more

पुणे जिल्हा : तळेगावमध्ये मतदानावर बहिष्कार

भैरवनाथनगरमधील ग्रामस्थांचा इशारा : मूलभूत सुविधांची वाताहत तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथनगरमधील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधा पुरवा, अन्यथा ग्रामपंचायतीचा कर भरणार नाही. आगामी काळातील सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, समस्यांनी त्रासलेल्या संतप्त नागरिकांनी याबाबतचे निवेदन पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथनगरमधील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या … Read more