फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 8 जणांचा मृत्यू

शिवकाशी – तामिळनाडूच्या शिवकाशीजवळ फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिलांचाही समावेश आहे. विरूधुनगर जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती जिल्हाधिकारी जयसेलन यांनी दिली. स्फोटामुळे लागलेल्या आगीत अन्य १२ जणही भाजून जखमी झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला याची चौकशी केली जाते आहे. शिवकाशी हे ठिकाण भारतातील सगळ्यांत मोठे फटाका निर्मितीचे … Read more

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस उमेदवारांची 6 वी यादी जाहीर, कोणाला कोठून तिकीट मिळाले जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 Congress Candidate 6th List: आज सोमवारी (दि. 25) काँग्रेसने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने राजस्थानमध्ये चार आणि तामिळनाडूच्या एका जागेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या या यादीनुसार, राजस्थानच्या अजमेरमधून रामचंद्र चौधरी, राजसमंदमधून सुदर्शन रावत, भिलवाडामधून डॉ. दामोदर गुर्जर आणि कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी … Read more

अभिनेता थलपति विजयने CAAला विरोध; तमिळनाडू सरकारला केली ‘ही’ विनंती

Vijay on CAA|

Vijay on CAA| rकेंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा अनेकांकडून विरोध करण्यात आला. CAA लागू झाल्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील गैर-मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. केवळ हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन निर्वासितांनाच भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. यातच आता दाक्षिणात्य अभिनेता थलपति विजयने नाराजी … Read more

Tamilnadu: समानता आणि बंधुत्वाच्या सिध्दांतावर द्रमुक सरकार कार्यरत – मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन

चेन्नई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी राज्य सरकारच्या जनकल्याणाच्या धोरणांबाबत माहिती दिली आहे. तामिळनाडू सरकारने द्रविड आणि जनजाती कल्याण विभागाच्या अंतर्गत १७१ कोटी रूपयांच्या योजना तयार केल्या आहेत. या योजनांच्या उदघाटनासोबतच त्यांनी १८४ कोटी रूपयांची मदतही प्रदान केली. तामिळनाडू सरकारने सामाजिक न्याय, समानता आणि बंधुत्वाच्या उत्कृष्ट सिध्दांतावर कार्यरत आहे. राज्याच्या विकासासाठी सरकार नवे परिमाण स्थापन … Read more

Tamil Nadu-keral rainfall : केरळ-तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Tamil Nadu-keral Rainfall :  तामिळनाडू आणि केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे.  या पावसामुळे तमिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दरड कोसळून वाहतूकही विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून दोन्ही राज्यात अर्लट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान विभागाचा इशारा आणि राज्यात … Read more

तामिळनाडू-पुद्दुचेरी आयटीची कारवाई; 60 कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याची नाणी जप्त

IT Raid – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील दोन व्यावसायिक समूहांविरुद्ध प्राप्तिकर विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सीबीडीटीने बुधवारी सांगितले की, 5 ऑक्टोबर रोजी दोन व्यावसायिक समूहांशी संबंधित सुमारे 100 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्या शोध मोहिमेनंतर विभागाने 32 कोटी रुपयांची रोकड आणि 28 कोटी रुपयांची सोन्याची नाणी जप्त केली … Read more

‘या’ राज्यातील मंदिरांमध्ये हत्तींच्या वापरावर बंदी आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती

मदुराई – तामिळनाडूतील मंदिरांमध्ये हत्ती पाळण्यावर बंदी घालण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. वास्तविक, मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे, ज्यामध्ये सिंगल बेंचने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये हत्ती ठेवण्यावर बंदी घातली होती. एचआर आणि सीई (हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोमेंट्‌स) विभागाच्या मुख्य सचिवांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने … Read more

Senthil Balaji : तमिळनाडूच्या ऊर्जामंत्र्याला ईडीकडून अटक; 28 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

चेन्नई :- तामिळनाडू परिवहन विभागातील नोकऱ्यांसाठी रोख रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्याचे वीज आणि उत्पादन शुल्क मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना अटक केली. मुख्यमंत्री एमके स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील सरकारमधील अशा कारवाईचा सामना करणारे सेंथिल हे पहिले मंत्री आहेत. मुुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, बालाजीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, मग, चौकशीची काय गरज आहे. … Read more

शाब्बास! तामिळनाडूतील नंदिनीला 12वीला सर्व विषयांत मिळाले 100 पैकी 100 गुण; देशभरात होतंय कौतुक

चेन्नई – तामिळनाडूतील एका मुलीने बारावीत सर्व विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवून एक अनोखा राष्ट्रीय विक्रम केला आहे. दिंडीगुल जिल्ह्यातील एस नंदिनीने ही कामगिरी केल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारी परीक्षा संचालनालयाने सोमवारी परीक्षेचा निकाल जाहीर केला. नंदिनीने जिल्ह्यातील एका सरकारी अनुदानित संस्थेत शिक्षण घेतले आणि बोर्डाची परीक्षा दिली. तिला तामिळ, इंग्रजी, अर्थशास्त्र, वाणिज्य, … Read more

Tamilnadu: नगरसेवकाच्या हल्ल्यात लष्करातील जवानाचा मृत्यू, राजकारण तापले

चेन्नई – तामिळनाडूच्या कृष्णागिरीमध्ये सत्ताधारी द्रमुकचे (डीएमके) पदाधिकारी चिन्नास्वामी आणि त्यांच्या समर्थकांच्या मारहाणीत एका भारतीय लष्कराच्या जवानाचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तीव्र झाले आहे. तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी द्रमुकवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. के अन्नामलाई म्हणाले की, डीमकेला भारतीय जवानांविषयी आस्था उरलेली नाही. एका लष्करी जवानावर एका नगरसेवकाने हल्ला केला, ज्यात त्या जवानाचा … Read more