शेअर बाजाराच्या संथ गतीने ‘या’ कंपन्यांचे नुकसान तर ‘या’ कंपन्या झाल्या श्रीमंत

Market Capitalisation ।

Market Capitalisation । गेला आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी खराब ट्रेडिंग आठवडा म्हणून पाहायला मिळाला. BSE सेन्सेक्सच्या टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,73,097.59 कोटी रुपयांची घसरण झाली. या टॉप 10 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांना सर्वाधिक तोटा सहन करावा लागला. गेल्या आठवड्यात बीएसईच्या ३० शेअर्सच्या … Read more

दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार हिरव्या चिन्हावर उघडला; सेन्सेक्स-निफ्टीत वाढ

Share Market|

Share Market|  मागील दोन दिवसांपासून शेअर बाजारात घसरण दिसून येत होती. परंतु आज गुरुवारी शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात झाली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. बीसई सेन्सेक्स 260 अंकांच्या वाढीसह 73,203 अंकांच्या पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 64 अंकांच्या वाढीसह 22,212 अंकांच्या पातळीवर उघडला आहे. मध्यम आणि लहान क्षेत्रात आज अधिक … Read more

Share Market: शेअर बाजार निर्देशांक कोसळले; टीसीएस, इन्फोसिस, रिलायन्स पिछाडीवर

मुंबई  – जपानच्या रिझर्व्ह बँकेने 17 वर्षात प्रथमच व्याजदरात वाढ केली आहे. या अगोदर करोनाच्या काळातही जपानमधील रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली नव्हती. यामुळे आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक सकाळी कोसळले. त्यानंतर भारतीय शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री होऊन निर्देशांक कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 736 अंकांनी म्हणजे एक टक्क्यांनी कोसळून … Read more

Share Market | शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टीत घसरण

 Share Market  : गुरुवारी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक मर्यादेत व्यवहार करत आहेत. सकाळी सध्या, सेन्सेक्स 128.87 अंक किंवा 0.18 टक्क्यांच्या कमजोरीसह 72,173.28 वर व्यापार करत आहे आणि निफ्टी 68.90 अंक किंवा 0.31 टक्क्यांच्या घसरणीसह 21,882.25 वर व्यापार करत आहे. बाजार उघडताच, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड … Read more

Market Cap : Sensexमधील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 71414 कोटी रुपयांची घसरण, LICचे सर्वाधिक नुकसान

Market Cap : सेन्सेक्समधील ( Sensex ) टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात एकूण 71,414.03 कोटी रुपयांनी घसरले आहे. या काळात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ( LIC ) सर्वाधिक नुकसान झाले आहे. पहिल्या 10 मोठ्या कंपन्यांमध्ये LIC व्यतिरिक्त, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( TCS ), ITC, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट … Read more

मंगळवारी IT कंपन्यांच्या शेअरची खरेदी; TCS, Infosys, Wipro कंपन्यांचे शेअर वधारले

मुंबई – अमेरिका आणि युरोपातील परिस्थिती सुधारण्याची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी दीर्घ पल्ल्याचा विचार करून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली. अनिश्चित वातावरणातही शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्यास मदत झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 454 अंकांनी वाढून 72,186 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर … Read more

“राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या…”; पेपरफुटीप्रकरणी विजय वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Vijay Wadettiwar : मागील काही दिवसांपासून पेपरफुटीची अनेक प्रकरणे समोर आली. नुकतेच राज्यात झालेल्या तलाठी पेपरफुटीच्या प्रकरणावरून मोठा वाद सुरू झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. यातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. उत्तर पत्रिका मिळवून दहा लाखात तलाठी व्हा, असे आमिष उमेदवारांना … Read more

तलाठी भरती परीक्षेतही गोंधळ; ‘सर्व्हर डाऊन’ प्रकाराची चौकशी केली जाणार

पुणे – तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर सोमवारी तीन सत्रातील परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरू करण्याची वेळ आली. परीक्षेसाठी वेळ वाढवून दिली असली तरी परीक्षार्थींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एका नव्हे, तर सर्वच केंद्रावर सर्व्हर डाउनमुळे तलाठी भरती परीक्षेचा सावळागोंधळ समोर आला आहे. राज्यात दि. 17 … Read more

तलाठी भरतीवर टीसीएस कंपनीसह ‘महसूल’चा वॉच; पेपर कॉपी घटनांनंतर कडेकोट सुरक्षा

पुणे – राज्यात तलाठी भरती परीक्षेला दि.17 ऑगस्टपासून सुरुवात झाली असताना नाशिक आणि नागपूर जिल्ह्यात पेपर कॉपीसंदर्भातील घटना घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन सुरक्षितेबाबत अधिक काटेकोर नियोजन टीसीएस कंपनीकडून केले जात आहे. यात प्रामुख्याने परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परीसरात जॅमर यंत्रणा बसविण्यात आली आहे. इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, घड्याळ, मोबाइल, हेडफोड किंवा इतर वस्तूदेखील केंद्रावर नेहण्यास … Read more

दुय्यम निबंधक कार्यालयात संथगतीने काम; नागरिक त्रस्त

पुणे – नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याची समस्या मागील दोन ते तीन दिवसांपासून येत आहे. या समस्यांमुळे दस्त नोंदणीचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आलेल्या नागरिकांना तासनतास वाट पहावी लागत आहे. राज्यात 500 पेक्षा अधिक दुय्यम निबंधक कार्यालये असून या … Read more