तहसीलदाराचे मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन

नगर – कोपरगाव तहसीलदाराने शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबर व उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णांबरोबर गैरवर्तन केले. मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा विरोध दर्शवत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात आज निदर्शने केली. गैरवर्तनप्रकरणी तहसीलदारांना अटक न केल्यास सोमवारपासून जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा, परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष सुरेखा … Read more

तहसीलदारांच्या गाडीचा लाल दिवा उतरवला

सातारा -महाबळेश्‍वरच्या तहसीलदारांच्या खासगी गाडीवरचा लाल दिवा माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर वाहतूक विभागाकडून उतरविण्यात आला. या कारवाईमुळे बैठकीसाठी तेथे आलेल्या अनेक तहसीलदारांच्या लाल दिव्याच्या गाड्या तिथून तातडीने गायब झाल्या. या अचानक कारवाईची घटनास्थळावर जोरदार चर्चा झाली. शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या गाडीवर लाल दिवा लावणे आता प्रतिबंधित करण्यात आले आहे. केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 च्या नियम … Read more

Ahmednagar: तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा

कर्जत – तालुक्यातील कापरेवाडी शिवारात शुक्रवारी संध्याकाळी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि भरारी पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने वाहन पळवून नेण्याच्या उद्देशाने अंगावर डंपर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत वाहन बाजूला केल्याने तहसीलदारासह पथकातील कर्मचारी बचावले. डंपरचा पाठलाग करून पथकाने त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी चालक, मालक व क्लीनर यांच्या विरोधात गुन्हा … Read more

दुसरे तहसीलदार आल्यावर तुमचे काम करून घ्या; शिरूरच्या प्रभारी तहसिलदारांचा शेतकऱ्यांना अनाहूत सल्ला

सविंदणे – शेतकरी अनेकदा वारंवार हेलपाटे मारत असून तहसीलदार त्यावर दुसरे तहसीलदार आल्यावर काम करुन घ्या, असा अजब सल्ला देत आहे. तहसिलदार हया शेतकऱ्यांना तारीख पे तारीख देत असून योग्य ती कार्यवाही करत नसल्याचे शेतकरी बाबूराव चव्हाण व दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले आहे. शिरूर तहसिलदार कार्यालयात गेले सहा महिन्यांपासून प्रभारी तहसीलदार म्हणून रंजना उंबरहांडे ह्या … Read more

सव्वा लाखांची लाच घेताना तहसीलदारासह शिपायाला रंगेहाथ पकडलं

कल्याण – शिक्षणअधिकारी महिलेने लाच घेण्याचं प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक बडा आधिकारी आणि शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. या प्रकरणातील आरोपी तहसीलदार दीपक आकडे आणि शिपाई बाबु उर्फ मनोहर हरड यांना अटक करण्यात आली आहे. जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी एक लाख 20 हजार रुपयांचा लाच घेताना आकडे आणि हरड या … Read more

प्रतिबंधात्मक आदेश असूनही यात्रा भरवली?

वाई – राज्यात करोनाविषाणूमुळे पसरत असलेल्या कोव्हिड-19ची दुसरी लाट थैमान घालत असून देशात सर्वाधिक रुग्ण पुन्हा एकदा महाराष्ट्रात आढळून येत आहेत. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्याही वाढते आहे. मात्र, राज्याच्या ग्रामीण भागात अद्यापही नागरिकांमध्ये या साथीच्या रोगाबाबत जनजागृती नसल्याचे दिसून येत आहे, राज्य सरकारने कोणतेही धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम करण्यास बंदी घातलेली असताना, हे आदेश धुडकावून गावोगावी यात्रा … Read more

तहसिलदाराकडून काम करून घेण्याच्या बहाण्याने लाच मागणाऱ्याला जामीन

पुणे – तहसिलदाराकडून काम करून देतो, असे सांगत सहा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्या खासगी व्यक्तीला सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. राजेंद्र बाळासाहेब मोरे (रा.फुरसुंगी) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. चार महिने विलंबाने गुन्हा … Read more

तेलंगणात माजी तहसीलदाराची कारागृहात आत्महत्या

हैदराबाद – लाच घेतल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या एका माजी तहसीलदाराने आज येथील मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. बलराजू नागराजू असे या माजी तहसीलदाराचे नाव असून तो 47 वर्षांचा होता. लाचलुचपत विभागाने त्याला 1 कोटी 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्याला चंचलगुडा येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. कोठडीच्या खिडकीच्या … Read more

तहसिलदारांच्या बदलीचे वारे

पुणे- जिल्हा प्रशासनात आता तहसिलदार, उपजिल्हाधिकारी यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहे. प्रामुख्याने हवेली, मुळशी आणि खेड तहसिलदार या तीन तहसिलदारांच्या बदलीची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे. तहसिलदारांच्या कामकाजासंदर्भात स्थानिक आमदारांनी व्यक्त केलेली नाराजी तसेच नागरिकांच्या तक्रारी यामुळे पालकमंत्री अजित पवार याबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. यापार्श्वभूमीवर जे तहसिलदार बदलीच्या प्रतिक्षेत आहेत, त्यांनी पालकमंत्री पवार … Read more

शेवगाव : चिखल तुडवत तर कुठे बैलगाडीतून प्रवास करत तहसीलदारांनी केली पीक नुकसानीची पाहणी

अतिवृष्टीने ढोर जळगाव भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेवगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ढोर जळगाव  भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी तसेच चार रस्त्याच्या वादांचे स्थळ यांचे निरीक्षण एखाद्या बांधावरुन न करता तहसीलदार अर्चना पागिरे यांनी चक्क गुडघाभर चिखल तुडवीत तर कुठे बैलगाडीतून प्रवास करत केले आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने  सर्वजण मेटाकुटीला आले आहेत. पिकाच्या नुकसानी बरोबर  … Read more