माळशेज घाटात भीषण अपघात ! टेम्पो आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; चार जण ठार

Accident | Malshej Ghat | माळशेज घाटात दुधाची वाहतूक करणारा टँकर टेम्पोला धडकून नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कल्याण-नगर रस्त्यावरील बोरांडे गावाजवळ हा अपघात झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दुधाचा टँकर आणि भाजीपाला भरलेला टेम्पो आळेफाटा येथून कल्याणच्या दिशेने निघाला होता. टँकरने टेम्पोला धडक दिली त्यामुळे … Read more

पिंपरी | नदीपात्रात भराव टाकणा-यांना पालिकेचा दणका

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील हायवा, टिपर, ट्रक, टेम्पो, ढंपरमध्ये भरुन आणलेला राडारोडा राजरोसपणे नदी पात्रात टाकला जात आहे. यामुळे नदीचे पात्र अरुंद होत असून पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका ओढवण्याची भिती वाटू लागली आहे. याकडे राज्याच्या पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने राडारोडा टाकणा-यांना अधिकचे बळ मिळत आहे. याची तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या … Read more

मद्यधुंद पोलिसाची टेम्पोला धडक; आधी सोडले, मग सापळा लावून पकडले

नीरा – नीरा (ता. पुरंदर ) येथे मंगळवारी दुपारी नीरा येथील पोलीस चौकीत रुजू असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या चार चाकी वाहने लोणंद बाजूकडून येणाऱ्या आयशर टेम्पोला समोरून धडक दिली. यामध्ये कर्मचाऱ्याच्या वाहनाचे नुकसान झाले, असताना स्वतःची चूक असल्याने टेम्पो चालकांला जाऊ देण्यात आले. मात्र, नंतर याच टेम्पो चालकला सापळा रचून पुन्हा अडवले. यानंतर कोणताही गुन्हा … Read more

शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला ट्रकची धडक; 32 तरुण जखमी

पिंपरी – शिवजयंतीनिमित्त पुरंदर जवळील मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये ज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांसह 32 जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि. 10) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर ताथवडे येथे घडला. विलास पोपट कोंडभर (वय 23), आदित्य संतोष सातकर (वय 13), विरेन राजू मोरे (वय 14), हर्ष निवृत्ती … Read more

नगर: दुचाकीला टेम्पोची पाठीमागून जोराची धडक; अपघातात पती-पत्नी ठार

श्रीगोंदा  – दुचाकीला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिल्याने जखमी झालेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना आज(दि.21) सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोळगाव शिवारातील कण्हेरमळा येथे नगर-दौंड महामार्गावर घडली. संभाजी मानसिंग मोहिते आणि प्रियंका संभाजी मोहिते (दोघे रा.दौंड) अशी मयतांची नावे आहेत. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रविवारी(दि.21) सकाळी दौंडहून नगरकडे जाणार्‍या प्रियंका मोहिते आणि संभाजी … Read more

नेवासा – टेम्पो पलटी होवून १ जण जागीच ठार तर ८ जण गंभीर जखमी

नेवासा  – श्रीरामपुर राज्य मार्गावरील साईनाथनगर ते नेवासा बुद्रूक येथील मधल्या रस्त्यावर साईनाथनगर शिवारात केळी व्यापाऱ्यांचा टेम्पो पलटी होवून एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार (दि.२४) रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली या अपघाची माहिती मिळताच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय करे व पोलिस नाईक बबन टमनर यांनी … Read more

पत्नीला पोटगी न देणे पडले महागात; न्यायालयाने जप्त केला टेम्पो

पुणे – तब्बल दोन वर्षाच्या कालावधीत पत्नीला पोटगी न देणे पतीला चांगलेच महागात पडले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी पतीचा टेम्पो जप्त केला आहे. पतीने पत्नीला पोटगीची थकीत रक्कम दिली नाही, तर टेम्पोची विक्री करून पोटगीची रक्कम वसूल केली जाणार आहे. संबंधित पती जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून, पाच वर्षांपासून पत्नीला … Read more

पुणे जिल्हा: जीप- टेम्पोची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

ओतूर – नगर कल्याण महामार्गावर वाटखळे गावच्या हद्दीत पीकअप जीप व छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक प्रवासी व छोटा हत्तीचा चालक यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.12) सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. संदीप जयसिंग सुपेकर (वय 41, रा. नांदूर, खंदर माळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), चालक अमर चंद्रकांत रोडे (वय 26, … Read more

Pune Accident : वारजे ब्रिजवर भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; महिला ठार

पुणे – भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांची नात अपघातात जखमी झाली आहे. ही घटना 13 सप्टेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास वारजे ब्रीजवर घडली. मीना राजेंद्र वाघमारे (वय 45, रा. केळेवाडी, कोथरूड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सई वाघमारे असे जखमी झालेल्या नातीचे नाव आहे. याप्रकरणी पती राजेंद्र वाघमारे … Read more

Pune Accident : टेम्पोखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू

पुणे – टेम्पो मागे घेताना फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या वृध्द नागरिकाच्या अंगावर आल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. तुकाराम नारायण शिंदे (70, रा. वैष्णवी हाईट्स, आंबेगाव बुद्रुक) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. भरतकुमार रामकिशन प्रसाद (26, रा. पंचरत्नेश्वर सोसायटी, धनकवडी, मुळ रा. उत्तरप्रदेश) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत … Read more