#IPL2022 : आयपीएल 2022 मध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ सदस्य पॉझिटिव्ह

मुंबई – आयपीएलच्या 15 व्या हंगामात कोरोनाने प्रवेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट असलेले फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आयपीएलने याबाबत एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे. शनिवारी (16 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे.  हा सामना रद्द केला जाऊ शकतो अशा बातम्या सोशल मीडियावर … Read more

शरद पवारांना कोरोनाची लागण, पुढील 7 दिवस सर्व कार्यक्रम आणि भेटीगाठी रद्द – नवाब मलिक

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर ते घरीच क्वारंटाईन असून त्यांची तब्येत उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी उपचार सुरु केले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. पुढे मलिक म्हणाले की, गेल्या दोन-चार दिवसांत जे लोक संपर्कात आले होते, … Read more

सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला करोनाची लागण; अंत्यसंस्कारावेळी होत्या उपस्थित

पुणे :  ‘अनाथांची माय’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ  यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांची मुलगी ममता सिंधुताई यांना करोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ममता या सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असल्याने चिंता वाढली आहे. ममता सिंधुताई यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली … Read more

CoronaNews : करोना पॉझिटीव्ह आलेल्या पत्नीची पतीकडून हत्या

पटना – संपूर्ण देशात करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी जीव सोडत आहेत. करोना महामारी आता धडकी भरवणारी झाली असून त्यातच बिहारमधील पटना येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन मास्तर असलेल्या पतीने करोना बाधित झालेल्या आपल्या पतीचा गळा कापून हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: घराच्या छतावरून उडी … Read more

सचिन पायलट यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली –  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिने जग कोरोनाशी दोन हात करत आहे. सहा महिने झाले आता तरी कोरोना जाईल या उद्देशाने सगळे काम करत आहेत.  तसंच दिवाळीनंतर देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  देशातील काही दिग्गज आणि राजकीय नेत्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. आता काँग्रेसमधील नेते सचिन पायलट … Read more

हरियाणाचे उपमुख्यमंत्री कोरोना पाॅझिटिव्ह

नवी दिल्ली – देशात कोरोना विषाणूचे संकट सतत वाढत आहे. मंगळवारी हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी राज्यात अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि आता त्यात दुष्यंत यांचे देखील नाव जोडले गेले आहे. Haryana Deputy CM Dushyant Chautala says, he has tested positive … Read more

बापरे! आरोपी पकडायला गेले अन् करोना पॉझिटिव्ह झाले

सातारा : पोलीस दलातील करोना बाधितांचा आकडा आता वाढताना दिसू लागला आहे. आत्ता तर सोलापूर जिल्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकालाच करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पकडलेला आरोपीही करोना बाधित असल्याचे समोर आले आहे. याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुरकवडी (ता.खटाव) येथे काही दिवसापूर्वी एक विवाह झाला होता. … Read more

राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्य जनतेसह कोरोना योद्धे म्हणून काम करणारे देखील येत आहेत. आता राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात अस्लम शेख यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून … Read more

कर्नाटक ; दहावीची परीक्षा देणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

बेळगाव : कर्नाटकात दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील 80 विद्यार्थ्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षा हॉलमध्ये जाताना विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले होते. शिवाय वर्गात सगळीकडे सॅनिटायझेशन करत फवारणी करण्यात आली होती. तसेच कन्टेंन्मेंट झोनमधून आलेल्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वेगळी … Read more

भारताचा माजी बॉक्सिंगपटू डिंको सिंहला कोरोनाची लागण

नवी दिल्ली – आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा माजी बाॅक्सिंगपटू डिंको सिंह याला कोरोनाची लागण झाली आहे. अर्जुन आणि पद्म पुरस्कार प्राप्त इंफाल येथील 41 वर्षीय डिंको सिंह हा लिव्हर कॅन्सरने सुध्दा त्रस्त आहे. काही दिवसापूर्वीच त्याला उपचारासाठी इंफाल येथून दिल्ली येथे आणण्यात आले होते. Asian Games gold medal-winning former boxer Dingko Singh … Read more